ब्रेकिंग
दहावी पुरवणी परीक्षेसाठी प्रताप हायस्कूल केंद्राची आसनव्यवस्था जाहीर; विद्यार्थ्यांनी वेळेपूर्वी उपस्थित राहण्याचे आवाहन

 

अमळनेर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या जून/जुलै २०२६ दहावी पुरवणी परीक्षेची प्रताप हायस्कूल, अमळनेर (केंद्र क्रमांक ३७१०) येथील आसनव्यवस्था जाहीर करण्यात आली आहे. ही परीक्षा १६ जून २०२६ पासून सुरू होत असून परीक्षेच्या अनुषंगाने सर्व तयारी पूर्ण करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

या केंद्रावर विविध शाळांमधील विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा पार पडणार असून परीक्षेचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध व पारदर्शक पद्धतीने करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या कॉपीमुक्त अभियानांतर्गत सर्व परीक्षा काटेकोरपणे राबविण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षा नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

परीक्षार्थींनी परीक्षा केंद्रावर येताना मूळ हॉलतिकीट व ओळखपत्र सोबत आणणे बंधनकारक असून कोणत्याही प्रकारची गैरसोय टाळण्यासाठी परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान ३० ते ४५ मिनिटे अगोदर केंद्रावर उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

केंद्राध्यक्ष सौ. एस. एस. सूर्यवंशी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना शांत, आत्मविश्वासपूर्ण वातावरणात परीक्षा देण्याचे आवाहन करताना सर्व आवश्यक सूचना वेळेत पाळण्याचे सांगितले आहे. तसेच परीक्षेच्या यशस्वी आयोजनासाठी केंद्र प्रशासन, पर्यवेक्षक व कर्मचारी वर्ग सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दहावीच्या पुरवणी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची संधी असून, विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून परीक्षेला सामोरे जावे आणि उज्ज्वल यश संपादन करावे, अशा शुभेच्छाही यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *