गांधली या गावात बाल वाङ्मय विभागाचा शुभारंभ; रोटरीतर्फे विद्यार्थ्यांना वाचनाचे आवाहन
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 17 hours ago
ईद मिलादुन्नबी निमित्त मानवतेचा संदेश; अमळनेरमध्ये रुग्ण व गरजूंना फळवाटप
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 1 day ago
अमळनेरचे सुप्रसिद्ध सर्जन डॉ. अनिल शिंदे यांना ‘आरोग्य रत्न २०२६’ पुरस्कार
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 1 day ago
पै. प्रताप अशोक शिंपी (आबा) यांची कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी निवड
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 2 days ago
Top 10 News
गांधली या गावात बाल वाङ्मय विभागाचा शुभारंभ; रोटरीतर्फे विद्यार्थ्यांना वाचनाचे आवाहन
ईद मिलादुन्नबी निमित्त मानवतेचा संदेश; अमळनेरमध्ये रुग्ण व गरजूंना फळवाटप
अमळनेरचे सुप्रसिद्ध सर्जन डॉ. अनिल शिंदे यांना ‘आरोग्य रत्न २०२६’ पुरस्कार
पै. प्रताप अशोक शिंपी (आबा) यांची कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी निवड
महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
अमळनेरची सुकन्या दियाना(अमृता)खेळणार अंडर 15 क्रिकेट वर्ड कपमध्ये भारतीय संघात महाराष्ट्रातुन एकमेव अमृताची निवड, साऊथ आफ्रिकेत रंगणार वर्डकप
अमळनेर:-येथील सुप्रसिद्ध उद्योजक आर के पटेल परिवारातील सुकन्या दियाना उर्फ अमृता ही अंडर 15 क्रिकेट वर्ड कप स्पर्धेमध्ये खेळणार असुन महाराष्ट्रातुन एकमेव अमृताची भारतीय संघात निवड झाली आहे.साऊथ आफ्रिकेत 21 सप्टेंबर पासून हा वर्डकप होणार आहे.
दियाना ही अमळनेर येथील मुंदडा ग्लोबल स्कुल ची इयत्ता 8 वी ची विद्यार्थिनी असून स्वर्गीय उद्योजक आर.के.दादा पाटील यांची पणती,उद्योजक विनोदभैय्या पाटील व वसंत बापू पाटील यांची नात आणि मितेश पाटील व सौ मोनाली मितेश पाटील यांची कन्या आहे.गेल्या 3 वर्षांपासून ती क्रिकेट खेळत असताना नियमित सरावाने उत्तम खेळाडू ती झाली आहे.क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून जळगाव येथे स्टेट लेव्हल स्पर्धा पार पडल्या होत्या.याठिकाणी राज्यभरातील अंडर 15 मधील क्रिकेट खेळाडू सहभागी झाले होते. तेथे डायना ने चांगल्या व्हीकेट्स व फलंदाजी करत उत्कृष्ठ खेळी करून पात्र ठरल्याने साऊथ आफ्रिका येथे होणाऱ्या अंडर 15 इंनडोअर क्रिकेट वर्डकप स्पर्धेसाठी भारतीय संघात तिची निवड झाली आहे.विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्यातून भारतीय संघात निवड झालेली ती एकमेव खेळाडू आहे.
याआधी धुळे येथे झालेल्या अंडर 19 बॉईझ क्रिकेट सिरीज मध्ये देखील अमृताने धमाकेदार प्रदर्शन करत मॅन ऑफ द सिरिज चा बहुमान मिळविला होता.याशिवाय अनेक स्पर्धेत ती चमकली आहे.क्रिकेट साठी तिला प्रशिक्षक मिलिंद शिंदे व रोनक शेख यांचे मार्गदर्शन तिला लाभले असून वर्ड कप साठी बेंगलोर येथे 10 सप्टेंबर पासून सरावासाठी ती जाणार आहे.व त्यानंतर 21 सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या वर्ड कप साठी साऊथ आफ्रिका येथे ती रवाना होणार आहे.
सदर निवडीबद्दल राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार व कॅबिनेट मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहिल्यानगर येथे दियाना ला शुभेच्छा देऊन कौतुक व सत्कार केला.खासदार स्मिताताई वाघ,माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील व मुंदडा ग्लोबल स्कुलचे चेअरमन ओमप्रकाश मुंदडा यांनी दियाना व तीच्या आईवडिलांचे अभिनंदन केले आहे.सर्वत्र तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त अमळनेरची सुपुत्री राष्ट्रीय खेळाडू नूतन भोईचा गौरव; क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीने शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा!
अमळनेर: राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून अमळनेर शहराचे नाव क्रीडा विश्वात उज्ज्वल करणाऱ्या भोईवाडा येथील गुणी खेळाडू नूतन किशोर भोई हिच्या उज्ज्वल यशाचा आणि क्रीडा प्रवासाचा विशेष गौरव करण्यात येत आहे. नूतनने आपल्या अष्टपैलू क्रीडा कौशल्याच्या बळावर विविध राष्ट्रीय व विभागीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत अमळनेर तालुक्याचा नावलौकिक वाढवला आहे.
नूतन भोई हिने क्रीडा क्षेत्रातील अनेक प्रकारांमध्ये आपली पकड मजबूत केली असून तिच्या प्रमुख यशाचा आलेख खालीलप्रमाणे आहे:

🛑*१० मीटर एअर पिस्तूल स्पर्धा: नाशिक विभाग पातळीवर उत्तम अचूकता आणि एकाग्रतेचे प्रदर्शन करत उत्कृष्ट कामगिरी केली.
🛑* ६३ वी नॅशनल इनलाईन रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप २०२५: विशाखापट्टणम येथे पार पडलेल्या राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत तिने प्रतिनिधित्व करत आपल्या वेगाचा व कौशल्याचा ठसा उमटवला.
🛑* IHAI नॅशनल आईस हॉकी चॅम्पियनशिप २०२६: डेहराडून (उत्तराखंड) येथे आयोजित अत्यंत आव्हानात्मक समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय आईस हॉकी स्पर्धेत उत्कृष्ट खेळ सादर केला.
खेळाडूची प्रतिक्रिया: ग्रामीण खेळाडूंना आधुनिक सुविधा मिळाव्यात
> “ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये अफाट गुणवत्ता व जिद्द असूनही आर्थिक अडचणींमुळे स्वप्ने अपुरी राहतात. मी इनलाइन स्केटिंग, आइस हॉकी आणि रायफल शूटिंगमध्ये राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व केले असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी पदक जिंकण्याचे माझे ध्येय आहे. मात्र यासाठी महागडे क्रीडा साहित्य व प्रवासाचा खर्च मोठा असतो. शासनाने ग्रामीण खेळाडूंसाठी नियमित शिष्यवृत्ती, आर्थिक मदत, दर्जेदार क्रीडा साहित्य आणि तज्ज्ञ प्रशिक्षक उपलब्ध करून द्यावेत. अमळनेरसारख्या भागात आधुनिक क्रीडा संकुले उभारल्यास आमच्यासारखे ग्रामीण खेळाडू ऑलिम्पिकपर्यंत मजल मारून देशाचा तिरंगा नक्कीच उंचावतील.”
नूतन किशोर भोई (राष्ट्रीय खेळाडू, अमळनेर)
भोईवाडा, अमळनेर येथील रहिवासी असलेल्या नूतनच्या या घवघवीत यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त अमळनेरवासीयांकडून व क्रीडाप्रेमींकडून तिला भावी क्रीडा प्रवासासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी भरभरून शुभेच्छा देण्यात येत आहेत.


श्री मंगळग्रह मंदिरात आजपासून रंगणार अमळनेरच्या लेकींचा कौतुक सोहळा माहेरच्या अंगणात मिळणार बालपणीच्या आठवणींची अनुभूती
अमळनेर : माहेरच्या अंगणातील बालपणीच्या आठवणींना उजाळा देत, सासर-माहेर दोन्ही कुटुंबांना आपल्या कर्तृत्वाने आणि मायेने समृद्ध करणाऱ्या अमळनेरच्या लेकींचा आगळावेगळा कौतुक सोहळा ‘माहेरचा पारिजात’ या उपक्रमातून आयोजित करण्यात आला आहे. अमळनेर महिला मंच ट्रस्टच्या वतीने हा विशेष स्नेहमेळा शनिवार, दि. 29 ऑगस्ट ते सोमवार, दि. 31 ऑगस्ट 2026 दरम्यान येथील श्री मंगळग्रह मंदिरात रंगणार आहे. त्यासाठी मंगळग्रह सेवा संस्थेचे विशेष सहकारी लाभले आहे.
पारिजातकाच्या फुलांचा सडा जसा अवघे अंगण सुगंधित करतो त्याचप्रमाणे माहेरची लेकी आपल्या अस्तित्वातून, कर्तृत्वातून आणि मायेतून सासर-माहेर दोन्ही घरे उजळून टाकतात. याच भावनेतून ‘माहेरचा पारिजात’ या उपक्रमाची संकल्पना साकारण्यात आली आहे. माहेरच्या अंगणात पुनश्च बालपण अनुभवता यावे, जुन्या आठवणींना उजाळा मिळावा आणि मैत्रिणींसोबत मनमोकळेपणाने गप्पांची मैफल रंगावी, हा या स्नेहमेळ्यामागील प्रमुख उद्देश आहे.
या स्नेहमेळ्यात भाषण, कविता, गाणी, नृत्य, विनोद, पारंपरिक खेळ, उखाणे, मंगळागौरीचे खेळ यांसह विविध मनोरंजक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री मंगळग्रह मंदिर परिसरातील हिरवाईने नटलेल्या प्रसन्न आणि मंगलमय वातावरणात हा सोहळा आनंद, उत्साह आणि भावनिक आठवणींनी रंगणार आहे.
या उपक्रमासाठीची नोफ्लदणी आता पूर्णत्वास आली आहे. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्षा सौ. कांचनताई शहा, उपाध्यक्षा सौ. तिलोत्तमाताई पाटील व सौ. सरोजताई भांडारकर, सचिव सौ. वसुंधराताई लांडगे, खजिनदार प्रा. सौ. शीलाताई पाटील यांच्यासह महिला मंचच्या कार्यकारी मंडळातील सदस्या आणि मंगळग्रह सेवा संस्थेचे सर्व विश्वस्त व सेवेकरी परिश्रम घेत आहेत. ‘माहेरच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि माहेरच्या लेकींंचा सन्मान अनुभवण्यासाठी सर्व माहेरवाशिणींनी आवर्जून वेळेत उपस्थिती द्यावी, असे आवाहन अमळनेर महिला मंच ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.
स्नेहमेळ्यात आज (शनिवार, दि. 29 ऑगस्ट) होणारे कार्यक्रम
सकाळी 9.00 वाजता माहेरवाशिणींचे स्वागत, हळद-कुंकू लावून औक्षण, गजरे वाटप, ढोल-ताशांच्या गजरात श्री मंगळग्रह देवांची सामूहिक आरती. 9.30 वाजता अल्पोपहार, सर्व माहेरवाशिणींनी हाता-पायाला मेंदी लावणे तसेच हातात बांगड्या भरणे. याचवेळी प्रत्येकीनेे स्वयंपरिचय देणे. दुपारी 12.15 वाजता सामूहिक अभिषेक. 1.10 वाजता सामूहिक भोजन. 2.00 ते 3.00 या वेळेत विविध बैठे खेळ. सायंकाळी 5.30 वाजता सामूहिक चहापान. 5.55 वाजता श्री मंगळग्रह देवांची सामूहिक आरती. 7.30 वाजता दीपप्रज्वलन, माहेरवाशिणींचा सन्मान, मंगळागौर आदी. रात्री 9.30 वाजता रात्रीचे भोजन तसेच विविध खेळ खेळणे.



