शांतिनिकेतन प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका निवेदिता कापडणे यांना ‘आदर्श शिक्षिका पुरस्कार’ प्रदान
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 18 hours ago
भक्तिरसात न्हाऊन निघाले जानवे गाव; आई भवानी मातेच्या अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाची उत्साहात सांगता
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 3 days ago
“जागर स्री शक्तीचा ” (विशेष लेख) ▪️आदिमाता निऋतीच्या लेकींच्या कृतज्ञतेसाठी साजरा होणारा नवरात्रोत्सव!
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 3 days ago
बोरी नदीच्या पात्रात चाकू व लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला:दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 4 days ago
महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
डी. आर. कन्या शाळेची कबड्डीत जिल्हास्तरावर झेप! १४ व १७ वर्षांखालील मुलींच्या संघांचे दुहेरी विजेतेपद; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र
अमळनेर प्रतिनिधी : खान्देश शिक्षण मंडळ संचलित श्रीमती द्रौ. रा. कन्या शाळेच्या विद्यार्थिनींनी शासकीय शालेय कबड्डी स्पर्धेत दमदार कामगिरी करत १४ व १७ वर्षांखालील अशा दोन्ही वयोगटांत विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यांत प्रतिस्पर्धी संघांना पराभूत करून शाळेच्या मुलींनी दुहेरी विजेतेपदाचा मान मिळविला असून, दोन्ही संघांनी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या आयोजनाखाली ही स्पर्धा पार पडली. १४ वर्षांखालील गटाच्या अंतिम सामन्यात डी. आर. कन्या शाळेच्या संघाने ललिता पाटील स्कूलच्या संघावर मात केली, तर १७ वर्षांखालील गटात आश्रमशाळा, रणाईचे या संघाला पराभूत करून विजेतेपद मिळविले. या यशामुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील लौकिकात भर पडली आहे.
दोन्ही विजेत्या संघांतील खेळाडू
१४ वर्षांखालील मुलींचा संघ : कर्णधार जिंकरा शेख शाकिर, भैरवी पाटील, कृतीका वाडेकर, आराध्या पाटील, श्रावणी साळुंखे, लावण्या पाटील, दिव्या पाटील, कावेरी अहिरे, हिमानी पाटील, रीदा फातेमा सादिक आणि हिमानी पाटील.
१७ वर्षांखालील मुलींचा संघ : कर्णधार अश्मिरा शाकिर शेख, कावेरी पाटील, पुनवी निकम, कल्याणी पारधी, केतकी देशपांडे, इशा पाटील, मयुरी पवार, लीना गुरव, कामिनी सोनवणे, वैष्णवी पाटील, समीक्षा जाधव, रिशिका गोयल, स्नेहल पाटील आणि मोनिका भोई.
तहसीलदारांच्या हस्ते खेळाडूंचा सन्मान
दोन्ही संघांनी मिळविलेल्या यशाबद्दल अमळनेरच्या तहसीलदार डॉ. उमा ढेकळे यांच्या हस्ते खेळाडूंना विजयी चषक व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
या संघांना क्रीडा विभागप्रमुख श्रीमती आर. एस. सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या परिश्रमांमुळे आणि खेळाडूंच्या मेहनतीमुळे शाळेला हे दुहेरी यश मिळाले.
शालेय समितीचे चेअरमन भाऊसाहेब जितेंद्र जैन, मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी, उपमुख्याध्यापक श्री. एस. आर. शिंगाणे, पर्यवेक्षक श्री. एस. पी. वाघ, शिक्षक प्रतिनिधी सौ. पी. पी. जोशी, कार्यालयप्रमुख श्री. शाम पवार, श्री. एस. एस. माळी, श्रीमती आर. एस. सोनवणे आणि श्री. किरण सनेर यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले.
आता दोन्ही संघ जिल्हास्तरीय स्पर्धेत आपले कौशल्य दाखविण्यासाठी सज्ज झाले आहेत. ही स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे होणार असून, शाळेच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

शांतिनिकेतन प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका निवेदिता कापडणे यांना ‘आदर्श शिक्षिका पुरस्कार’ प्रदान
अमळनेर : अस्पायर फाउंडेशनतर्फे धनदाई माता एज्युकेशन सोसायटी संचलित शांतिनिकेतन प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका निवेदिता वसंतराव कापडणे यांना ‘आदर्श शिक्षिका पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
शिक्षण हे केवळ पुस्तकी ज्ञान देण्याचे माध्यम नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचा पाया आहे. विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाची आवड निर्माण करणे, त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देणे, संस्कारक्षम पिढी घडविणे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सातत्याने प्रयत्न करणे, ही शिक्षकांची महत्त्वाची जबाबदारी असते. या कार्यात मुख्याध्यापिका निवेदिता कापडणे यांचे योगदान उल्लेखनीय ठरले आहे.
शाळेच्या शैक्षणिक वाटचालीत मुख्याध्यापिका म्हणून जबाबदारी सांभाळताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणे, शैक्षणिक उपक्रमांना प्रोत्साहन देणे आणि शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न करणे, या बाबींना विशेष महत्त्व आहे. शिक्षकांच्या कार्याचा गौरव करणारा हा पुरस्कार त्यांच्या शैक्षणिक कार्याला मिळालेली महत्त्वपूर्ण पोचपावती मानली जात आहे.
अस्पायर फाउंडेशनने त्यांच्या कार्याचा सन्मान केल्यामुळे शैक्षणिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या पुरस्कारामुळे त्यांना भविष्यातही शिक्षण क्षेत्रात अधिक जोमाने कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
निवेदिता कापडणे यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

जागतिक कृषी महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आबासाहेब मोरे यांचे अमळनेर येथे हितगुज पारायणासोबत आचरण सुधारा; सेवेत भेदभाव नको!
अमळनेर : छत्रपती संभाजीनगर येथे २२ ते २६ जानेवारी २०२७ दरम्यान होणाऱ्या जागतिक कृषी महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अमळनेर येथील श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा केंद्रात आयोजित हितगुज मार्गदर्शन सभेत आबासाहेब मोरे यांनी सेवेकरी व भाविकांना मार्गदर्शन केले. दिंडोरी प्रणित सेवा मार्गात कोणताही भेदभाव न करता एकजुटीने स्वामींचे कार्य करावे. केवळ पारायण करून चालणार नाही, तर आचरणातही सुधारणा झाली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
बुधवारी (दि. २१) सायंकाळी ७ वाजता झालेल्या या सभेत परमपूज्य गुरुमाऊलींचे परमश्रद्धेय शिष्य तथा सुपुत्र आबासाहेब मोरे यांनी आध्यात्मिक साधना, कौटुंबिक संस्कार, सामाजिक सेवा, पर्यावरण संवर्धन आणि शेतीविषयक उपक्रमांवर मार्गदर्शन केले. जागतिक कृषी महोत्सवात परमपूज्य गुरुमाऊली मार्गदर्शन करणार असल्याने सेवेकरी व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
स्वामींचा षडक्षरी मंत्र जपून आध्यात्मिक साधनेला सुरुवात करावी. आई-वडिलांना जिवंतपणी सुख द्यावे, विवाह योग्य वयात करून गुणांना महत्त्व द्यावे, तसेच सेवेकरी परिवाराने समाजात चांगली प्रतिमा निर्माण करावी, असे मोरे यांनी सांगितले.
डीजे, फटाके आणि प्लास्टिकचा वापर टाळून पर्यावरणपूरक उत्सव साजरे करावेत. निर्माल्यापासून खतनिर्मिती करावी, नद्यांचे संवर्धन करावे आणि दुष्काळ टाळण्यासाठी शेताच्या बांधावर वृक्षारोपण करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अमळनेर केंद्रातर्फे सुरू असलेल्या ‘मातोश्री शकुंतलाबाई प्लेट बँक’ आणि ‘शांकभरी सीड बँक’ या उपक्रमांची माहिती देताना गावरान बियाण्यांचे जतन करण्याचे आवाहन त्यांनी केले. अमळनेर तालुक्यातील सुमारे ६० सेवा केंद्रांच्या माध्यमातून जनजागृती करावी, तसेच १ ते ७ जानेवारीदरम्यान ग्राम अभियान सप्ताह राबवून नागरिकांना जोडावे, असे त्यांनी सांगितले.
सभेला केंद्राचे प्रतिनिधी, १८ विभागांचे पदाधिकारी, सेवेकरी आणि भाविक उपस्थित होते.


