अमळनेरचे उपक्रमशील शिक्षक पवन पाटील यांना ‘राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्रदान
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 11 hours ago
सुरक्षित बालपण, सुरक्षित कार्यस्थळ! ‘पॉक्सो’ अन् ‘पॉश’ कायद्यांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 3 days ago
सक्षम तरुण, समृद्ध भारत! ‘नशामुक्त युवा’ अभियानांतर्गत व्याख्यान संपन्न
Featured general Latest- Est 0 min
- 0 Views
- 3 days ago
जी. एस. हायस्कूलचा खो-खो संघ जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी रवाना
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 4 days ago
डी. आर. कन्या शाळेत वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा
Featured general Latest- Est 0 min
- 0 Views
- 4 days ago
Top 10 News
मक्याच्या शेताला आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने अनर्थ टळला
अमळनेरचे उपक्रमशील शिक्षक पवन पाटील यांना ‘राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्रदान
सुरक्षित बालपण, सुरक्षित कार्यस्थळ! ‘पॉक्सो’ अन् ‘पॉश’ कायद्यांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
सक्षम तरुण, समृद्ध भारत! ‘नशामुक्त युवा’ अभियानांतर्गत व्याख्यान संपन्न
जी. एस. हायस्कूलचा खो-खो संघ जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी रवाना
महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
मक्याच्या शेताला आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने अनर्थ टळला
अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर शहरातील नांदगाव रस्त्यालगत असलेल्या मक्याच्या शेताला सोमवारी (दि. १९ ऑक्टोबर) सकाळी १० वाजेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग पूर्णपणे आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.
प्रकाश नवलं पाटील, ज्ञानेश्वर बळीराम पाटील आणि सुधाकर काशिनाथ पाटील यांच्या मक्याच्या शेताला आग लागल्याची माहिती नगरसेवक मुक्तार खाटीक यांनी नगरपरिषदेला दिली. माहिती मिळताच अग्निशमन अधिकारी गणेश गोसावी यांनी नगरपरिषदेचे अग्निशमन वाहन तातडीने घटनास्थळी रवाना केले.
अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तत्परतेने प्रयत्न करून आग पूर्णपणे विझवली. परिसरात आजूबाजूला मका पिकासह कुरण असल्याने आग पसरल्यास मोठे नुकसान होण्याची शक्यता होती. मात्र, अग्निशमन दलाच्या वेळीच केलेल्या कारवाईमुळे संभाव्य धोका टळला.
या मोहिमेत वाहनचालक सत्यन संदानशिव आणि फायरमन मच्छिंद्र चौधरी यांनी सहभाग घेतला.

अमळनेरचे उपक्रमशील शिक्षक पवन पाटील यांना ‘राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्रदान
अमळनेर (प्रतिनिधी):येथील साने गुरुजी विद्या मंदिर शाळेचे उपक्रमशील उपशिक्षक श्री. पवन नामदेव पाटील यांना अस्पायर फाउंडेशन आयोजित ‘राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ देऊन गौरविण्यात आले आहे. नाशिक येथील संजीवनी ए. सी. बँक्वेट हॉल अँड लॉन्स (नांदूर नाका) येथे आज, रविवार दिनांक १८ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात हा सन्मान सोहळा उत्साहात पडला.
उल्लेखनीय शैक्षणिक कार्याची दखल
अस्पायर फाउंडेशनतर्फे ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात आलेल्या नामनिर्देशन प्रस्तावांची छाननी करून, पवन पाटील यांनी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांची या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.
पुरस्काराचे स्वरूप
या सोहळ्यात त्यांना शाल, फेटा, श्रीफळ, सन्मानपत्र, ट्रॉफी आणि आकर्षक भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
पवन पाटील यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल पवन पाटील यांचे जळगाव जिल्हा खाजगी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्था चे संचालक स्वप्नील पाटील,आशिष पवार आणि महेंद्र रामोशे आणि साने गुरुजी विद्या मंदिर शाळेचे संस्थाचालक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, तसेच अमळनेर परिसरातील शैक्षणिक व सामाजिक स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सुरक्षित बालपण, सुरक्षित कार्यस्थळ! ‘पॉक्सो’ अन् ‘पॉश’ कायद्यांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
भडगाव प्रतिनिधी : बालकांचे संरक्षण आणि कार्यस्थळावरील महिलांच्या सुरक्षिततेविषयी कायदेशीर जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने भडगाव येथील सौ. र. ना. देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात गुरुवार, दि. १६ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘पॉक्सो’ आणि ‘पॉश’ या महत्त्वपूर्ण कायद्यांवर विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात भडगाव सत्र न्यायालयातील वकील ॲड. नीलेश तिवारी यांनी विद्यार्थ्यांना दोन्ही कायद्यांविषयी सविस्तर व अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. त्यांनी बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण करणारा पॉक्सो कायदा आणि कार्यस्थळावरील महिलांच्या लैंगिक छळास प्रतिबंध करणारा पॉश कायदा यांची माहिती सोप्या व प्रभावी भाषेत समजावून सांगितली. कायद्याच्या तरतुदींसोबतच त्यांचा सामाजिक संदर्भ स्पष्ट करत त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये कायद्याविषयी जागरूकता निर्माण केली.
व्याख्यानादरम्यान विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना ॲड. तिवारी यांनी समर्पक उत्तरे देत त्यांच्या शंकांचे निरसन केले. सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी कायद्याची माहिती असणे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे आणि प्रत्येकाने आपल्या अधिकारांसोबत कर्तव्यांचीही जाणीव ठेवणे आवश्यक असल्याचा संदेश या मार्गदर्शनातून देण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय भैसे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. देवेंद्र मस्की यांनी करून दिला. सूत्रसंचालन डॉ. चित्रा पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. बी. एस. भालेराव यांनी मानले. राष्ट्रगीताने या मार्गदर्शन शिबिराची सांगता झाली.
कायद्याची माहिती, सुरक्षिततेची जाणीव आणि सामाजिक जबाबदारीचा संदेश देणारे हे शिबिर विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरले.


