ब्रेकिंग
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात साने गुरुजी कन्या हायस्कूलची गायत्री बोरसे प्रथम

 

अमळनेर : येथील अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित, साने गुरुजी कन्या हायस्कूलची इयत्ता १० वीची विद्यार्थिनी कु. गायत्री धनराज बोरसे हिने ५४ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. भिका यशोद चौधरी हायस्कूल, शिरसाळे येथे या प्रदर्शनाचे शानदार आयोजन करण्यात आले होते.

गायत्रीने ‘शाश्वत आणि विकसित भारतासाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नावोन्मेष’ या मुख्य विषयांतर्गत उत्कृष्ट वैज्ञानिक प्रकल्प सादर केला. तिला या प्रकल्पासाठी मार्गदर्शक विज्ञान शिक्षक श्री. दीपक रामभाऊ महाजन यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. गायत्रीच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

शाळेत आयोजित करण्यात आलेल्या विशेष गौरव सोहळ्यात अमळनेर शिवण प्रसारक मंडळाचे सचिव मा. श्री. दादासाहेब संदीप घोरपडे, उपाध्यक्ष मा. श्री. आप्पासाहेब गुणवंतराव पाटील, संचालक मंडळ सदस्य ॲड. नानासाहेब श्री. अशोक बाविस्कर, शिक्षणतज्ज्ञ मा. श्री. गोकुळ पाटील यांच्या हस्ते गायत्रीचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी साने गुरुजी विद्या मंदिरचे मुख्याध्यापक श्री. संजीव पाटील, साने गुरुजी कन्या हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे आणि ज्येष्ठ शिक्षक श्री. संजय जगताप यांनी गायत्रीला पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन श्री. योगेश मोरे सर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्रदर्शन श्री. किशोर अहिरराव सर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *