ब्रेकिंग
सरस्वती माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप डॉ. रवींद्र जैन व डॉ. मंजुश्री जैन यांचा स्तुत्य उपक्रम; पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना इंग्लिश ग्रामर पुस्तके व कंपास पेट्यांचे वितरण

 

सडावण, प्रतिनिधी : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जीवनतारा हॉस्पिटल, अमळनेर येथील डॉ. रवींद्र जैन व डॉ. मंजुश्री जैन यांच्या वतीने रुक्मिणीबाई प्रतिष्ठान संचलित सरस्वती माध्यमिक विद्यालय, सडावण (ता. अमळनेर) येथे पाचवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना इंग्लिश ग्रामर पुस्तके व कंपास पेट्यांचे वितरण करण्यात आले.

 

विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध व्हावे, त्यांना अभ्यासाची गोडी लागावी आणि शैक्षणिक वाटचालीत प्रोत्साहन मिळावे, या दृष्टीने हा उपक्रम राबविण्यात आला. शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मदत मिळणार असून, अशा उपक्रमांमुळे शिक्षणाविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होण्यास हातभार लागतो.

 

कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाचे मुख्याध्यापक उल्हास पाटील यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका वैशाली शेवाळे यांनी केले.

 

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी राबविण्यात आलेला हा उपक्रम समाजातील शैक्षणिक जाणीव आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित करणारा ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *