कृषी संस्कृतीच्या आदर्श मातांच्या कृतज्ञतेचा महोत्सव म्हणजे नवरात्री महोत्सव
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 11 hours ago
श्री मंगळग्रह मंदिरात विधिवत घटस्थापना आजपासून श्रीयंत्र व भौमयंत्रावर अर्चन; १९ ऑक्टोबरला नवचंडी यज्ञ
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 18 hours ago
महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
सहा महिन्यात अमळनेर बसस्थानकाचा चेहरामोहरा बदलेल-आ.अनिल पाटील बसस्थानकात विकास कामाचा भूमिपूजन सोहळा उत्साहात
अमळनेर:-सुरवातीला एस टी डेपोतील वर्कशॉप व इतर विकासकामांसाठी आठ कोटी निधी मिळाल्याने ती कामे जवळपास पूर्णत्वास आली आहे,आता पुन्हा अडीच कोटी निधीतून संपूर्ण आगारत पेव्हर ब्लॉक आणि रंगरंगोटीची कामे होणार असल्याने येत्या
सहा महिन्यात अमळनेर बसस्थानकाचा चेहरामोहरा बदलेला दिसेल अशी भावना माजी मंत्री तथा आ.अनिल भाईदास पाटील यांनी भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी व्यक्त केली.
आमदार अनिल पाटील यांच्या शुभहस्ते अमळनेर बसस्थानकातील विविध विकासकामांच्या द्वितीय टप्प्याचा भव्य भूमिपूजन सोहळा दिनांक 12 ऑक्टोबर रोजी सकाळी आयोजित करण्यात आला होता.याप्रसंगी ते बोलत होते.
प्रवाशांच्या सोयी-सुविधांना नवी दिशा देणाऱ्या या कार्यक्रमात असंख्य मान्यवर व महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.अमळनेर मतदारसंघात दुष्काळ असल्याने आमदार पाटील यांनी सत्कार स्वीकारणे टाळून शेतकरी बांधवाप्रती सदभावना व्यक्त केली.पुढे बोलताना ते म्हणाले की ग्रामिण जनतेसाठी एस टी चे महत्व किती याची कल्पना मला आहे कारण माझी स्वतःची आई दररोज याच एस टी ने आपल्या गावी शेतात जात असते.याआधी बस डेपोची बरीच दुरावस्था असताना राज्य शासनाकडे पाठपुरावा करून आठ कोटी निधी मिळविला.त्यातून पार्किंग परिसर दुरुस्ती वर्कशॉप नूतनीकरण, मॅनेजर ऑफिस,मॅनेजर निवासस्थान नूतनीकरण आदी कामे मार्गी लागून जवळपास पूर्णत्वासही आलीत.त्यानंतर बस आगाराकडे लक्ष वेधून याठिकाणी संपुर्ण परिसरात काँक्रीटीकरण व पेव्हर ब्लॉक व रंगरंगोटी साठी अडीच कोटी निधी मिळविला त्याचेही प्रत्यक्ष काम आज सुरू झाले आहे.
याशिवाय अमळनेर बस आगारात 100 बसेस ची आवश्यकता असताना केवळ 90 बसेस उपलब्ध होत्या त्यातील बहुतांश दुरावस्था झालेल्या होत्या.त्यामुळे शासनाकडे पाठपुरावा करून 20 ते 22 नवीन बसेस उपलब्ध झाल्या असून अजून किमान 50 नवीन बसेस उपलब्ध करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
यासोबतच बस स्थानकावरून अगदी हाकेच्या अंतरावर नवीन प्रशासकीय इमारत व पंचायत समिती इमारतीचे काम पूर्णत्वास येत असल्याने ग्रामीण भागातील नागरिक बस ने आल्यानंतर पायीच सर्व शासकीय कार्यालयात जाऊन तेथील काम आटोपून सोबतच बाजारही जवळ असल्याने तेथून खरेदी करून बसने लवकर घरी पोहोचू शकेल हेच माझ्यासाठी समाधान असेल असे त्यांनी आवर्जून सांगितले.
यावेळी मंचावर माजी जि प सदस्या सौ जयश्री अनिल पाटील,जेष्ठ नेत्या सौ तिलोत्तमा पाटील,मार्केट सभापती अशोक पाटील,मंगळग्रह संस्थेचे अध्यक्ष डॉ.डिगंबर महाले,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भागवत पाटील,शहराध्यक्ष चेतन राजपूत,सौ रिता बाविस्कर,कामगार नेते एल टी पाटील,युवक जिल्हाध्यक्ष भूषण भदाणे,भाजपचे ऍड व्ही आर पाटील, शीतल देशमुख, उमेश वाल्हे, शहराध्यक्ष योगेश महाजन,शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख सुरेश अर्जुन पाटील,माजी शहर प्रमुख संजय पाटील,आगार व्यवस्थापक राकेश शिवदे,वाहतूक निरीक्षक मुकेश सैदाने,वरिष्ठ लिपिक तुषार साळुंखे, अमोल पाटील यासह राष्ट्रवादी व महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते,आजी माजी नगरसेवक,शेतकी संघ व मार्केटचे पदाधिकारी, पत्रकार बांधव तसेच सर्व रापम कर्मचारी व युनियन पदाधिकारी व प्रवासी उपस्थित होते. सूत्रसंचालन कार्यशाळा अधीक्षक प्रमोद बाविस्कर यांनी केले.
विद्यार्थ्यांना दिला भूमीपूजनाचा मान
यावेळी बस स्थानकात मोठ्या संख्येने ग्रामिण भागातील शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित असल्याने आमदारांनी त्यांना सन्मानाने बोलावून त्यांच्या हस्ते भूमीपूजनाचे नारळ वाढविण्यात येऊन कामाचा शुभारंभ करण्यात आला.
कृषी संस्कृतीच्या आदर्श मातांच्या कृतज्ञतेचा महोत्सव म्हणजे नवरात्री महोत्सव
शेतीचा शोध लावणाऱ्या महान कर्तबगार मातांचा महोत्सव घटस्थापना..
आपली प्राचीन संस्कृती आर्या भारतामध्ये येण्याच्या अगोदर फार प्रगत होती. भारतातील पहिली गण माता निऋती मानली जाते. शेतीचा शोध निऋतीने लावला.सिंधू संस्कृतीच्या खोऱ्यात आपली संस्कृती बहरली. तिचे अवशेष शोधले गेले त्यावेळी अप्रतिम नगर रचना, उत्तम शेती, प्रभावी कला असलेली मानवतावादी संस्कृती दिसून आली. निऋत्तीची कन्या दुर्गा नावाने ओळखली जाते. मातृसत्ताक पद्धती असलेले महान राज्य होते. निऋत्ती ही फार मोठा विस्तार असलेल्या प्रदेशाची राणी होती. ती कृषी कन्या होती.तिने सर्वप्रथम तांदुळाची शेती केली. भारतामध्ये अशा अनेक पराक्रमी महिला झाल्या. त्यामध्ये रेणुका, तुळजा, भवानी, दुर्गा, अंबा, सप्तशृंगी, कालिका, यल्लमा याप्रमाणे विविध नावे आहेत.
भारतातील प्रत्येक भागात विविध गुणसंपन्न अशा माता होऊन गेल्या. त्यात काही कृषी संस्कृतीच्या विविध धान्यांचा शोध त्यांनी लावला. काहींनी विविध औषधींचा शोध लावून लोकांची सेवा केली. काही मातांनी दीन, दुबळ्या, वंचित ,गरीब, नादार लोकांची सेवा केली. त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाचा प्रखर प्रतिकार केला. काहींनी समाजातील दुष्ट प्रवृत्तीचा नायनाट केला. या महामातांना कृतज्ञता व्यक्त करण्याचा महोत्सव म्हणजे नवरात्र महोत्सव होय. पहिल्या दिवसाला मातीचा घट बसवून त्याच्या आजूबाजूला परडीमध्ये माती टाकून विविध धान्य टाकून पुढील हंगाम कोणता का घेता येईल याची चाचपणी घेण्याचा हा महोत्सव होय. पहिला हंगाम आलेला असतो. त्या हंगामाचा आनंद नवरात्र महोत्सवामध्ये घेतला जातो. विविध पक्वान्न बनवून देवीची पूजा केली जाते.हा महोत्सव फार प्राचीन मानला जातो. पश्चिम बंगाल मध्ये फार मोठ्या प्रमाणात देवीचा महोत्सव साजरा होतो. या महान मातांना मनोभावे अभिवादन करण्याचा हा महोत्सव होय. आपले शरीर म्हणजे घट होय. या विश्वामध्ये खूप चांगले असे निर्मिकाने भरुन ठेवलेले आहे.हया उत्तम गुणांची वाटप घट फोडून केली जाते. अशा चांगल्या गुणांची पेरणी आपल्या महान मातांनी करून ठेवलेली आहे. संत कबीराने मानवी रुपी देहाला घट म्हटलेले आहे. ते म्हणतात “सब घट बसै मेरा साइया,सुनी सेज ना कोय”. प्रत्येक घटात ईश्वर बसलेला आहे. घटातील पाणी म्हणजे आत्मा व घटाबाहेरील विशाल पाणी म्हणजे परमात्मा होय.मरणानंतर आतील पाणी बाहेरच्या पाण्याची मिळते .याचाच अर्थ आत्म्याचे परमात्म्याशी मिलन होणे म्हणजे घट फुटणे होय. घटस्थापना ज्या दिवशी केली जायची त्यादिवशी मातीच्या घटामध्ये पाणी वाढलेले असायचे. या घटातील पाणी पाझरल्याने मातीमधील बी नऊ दिवसांमध्ये उमलून मोठे होत होते. याचप्रमाणे सद विचाराची पेरणी करायची असेल तर चांगला विचाराचा घट वाढलेला असला पाहिजे. नवरात्र म्हणजे नवमातांच्या वैचारिक जागरणाचे दिवस होय. आज या महान मातांचा जागत होण्याऐवजी मोठमोठे मंडळ स्थापन करून नवरात्र महोत्सव साजरा केला जातो. आजच्या महिला हा महोत्सव प्रत्येक दिवसाला विविध रंगाच्या साड्या घालून साजरा करीत असतात. खरा महोत्सव चांगला विचाराची रुजवन करण्याचा आहे. महिलांवरील घडत असलेल्या अन्यायाविरुद्ध आजच्या महिलेने आवाज उठवण्याची गरज आहे. महिलेने दुर्गाप्रमाने स्वाभिमानाने जगले पाहिजे. प्रत्येक महिलेत कोणताही भेद न मानता एकत्रित येऊन समतेने वैचारिक जागरण केले पाहिजे. छत्रपती शिवबाची आई माँसाहेब जिजाऊ यांनी आपल्या मुलाच्या मनामध्ये स्वराज्याची ठिणगी पेटवली होती. आजच्या महिला कर्मकांड करण्यामध्ये धन्यता मानत असतात. पूजा पाठा करण्यापेक्षा आपल्या महापुरुषांनी केलेल्या कार्याची उजळणी केली पाहिजे. सावित्रीबाई फुले यांनी सांगितलेला सत्यशोधक समाजाची कास धरली पाहिजे. सावित्रीबाईंनी महिलांसाठी जीवन समर्पित केले. अशा सावित्रीबाई च्या कार्याचे पारायण झाले पाहिजे.आज आमच्या महिला मनुवाद्यांनी रचलेल्या ग्रंथांचे पारायण करत बसतात. त्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन नाही, विवेक नाही, समता नाही अशा विचाराला त्या चिटकून बसलेल्या आहे. सावित्रीबाई फुले यांची मालिका बंद होते त्याबाबत कोणत्याही महिलांनी आवाज उठवल्याचे दिसून येत नाही. ज्यांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या आयुष्य बलिदान केले त्या थोर ज्योती सावित्रीचा विचार तेवत ठेवण्याची गरज आहे. घरामध्ये नऊ दिवस तेलाचा दिवा लावण्यापेक्षा माझ्या परीने महिलांमध्ये वैचारिक जागृती करण्याचा वसा त्यांनी घेतला पाहिजे. आमच्या महिला पूजा पाठ करण्याच्या पलीकडे वैज्ञानिक दृष्टिकोनाकडे पोचल्याच नाहीत. आमच्या पूर्वज असलेल्या महिलांनी आपला वेगळा ठसा उमटवला होता. त्यामुळेच आज त्यांच्या कर्तृत्वाचे आम्ही करीत आहोत. काही महिलांनी ज्योती सावित्री चे विचार आपल्या जीवनात आणून इतरांच्या जीवनामध्ये आणण्याचा प्रयत्न त्या करीत आहेत. खऱ्या अर्थाने त्या अभिमानास पात्र आहेत. आपणही आपल्या महान मातांचा आदर्श घेऊया..
अमळनेरमध्ये कचऱ्याचे ढीग; दुर्गंधीने नागरिक त्रस्त! कचराकुंड्या बसवा, नियमित स्वच्छता करा; खासदार स्मिताताई वाघ यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर शहरातील विविध चौक आणि रस्त्यांवर उघड्यावर टाकला जाणारा कचरा, तो उचलण्यास होणारा विलंब आणि कचराकुंड्यांचा अभाव यामुळे स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेक ठिकाणी साचलेला कचरा तब्बल सात ते आठ दिवसांपर्यंत उचलला जात नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरत असून, डास व माश्यांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी खासदार स्मिताताई वाघ यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.
आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष श्री. महेंद्र (नाना) साळुंके यांच्या माध्यमातून १२ ऑक्टोबर रोजी हे निवेदन सादर करण्यात आले. शहरातील कचऱ्याच्या समस्येबाबत यापूर्वी छायाचित्रांसह नगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. तसेच अधिकृत निवेदन देऊनही ठोस कार्यवाही झालेली नसल्याची बाब निवेदनात नमूद करण्यात आली आहे.
शहरातील अनेक प्रमुख चौकांमध्ये कचरा टाकण्यासाठी पुरेशा कचराकुंड्या उपलब्ध नसल्याने नागरिकांकडून उघड्यावर कचरा टाकला जात असल्याचे चित्र आहे. साचलेला कचरा वेळेत उचलला जात नसल्यामुळे परिसरातील स्वच्छतेचा प्रश्न अधिकच गंभीर होत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असून, नगरपालिका प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
कचराकुंड्या आणि नियमित स्वच्छतेची मागणी
शहरात ज्या ठिकाणी वारंवार कचरा साचतो, त्या चौकांमध्ये तातडीने कचराकुंड्या बसवाव्यात, कचरा दररोज उचलण्याची प्रभावी व्यवस्था करावी आणि उघड्यावर कचरा टाकण्याच्या समस्येवर योग्य उपाययोजना कराव्यात, अशा प्रमुख मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करून शहरातील सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्यासाठीही प्रयत्न करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली आहे.
अमळनेर शहर स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी केवळ स्वच्छता मोहिमा राबविणे पुरेसे नसून, कचरा संकलन आणि विल्हेवाटीची नियमित व्यवस्था प्रभावीपणे राबविणे आवश्यक आहे. खासदार स्मिताताई वाघ यांनी या समस्येची दखल घेऊन नगरपालिका प्रशासनाला आवश्यक त्या सूचना द्याव्यात आणि नागरिकांना दिलासा मिळवून द्यावा, अशी अपेक्षा निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.

