ब्रेकिंग
हिंगोणे खु. प्र. ज. येथे महर्षी वाल्मीक जयंती उत्साहात साजरी  महर्षी वाल्मीक मित्र मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन; प्रतिमापूजन करून अभिवादन

 

हिंगोणे खु. प्र. ज., प्रतिनिधी : हिंगोणे खु. प्र. ज. येथे महर्षी वाल्मीक मित्र मंडळाच्या वतीने महर्षी वाल्मीक जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त महर्षी वाल्मीक यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

 

यावेळी महर्षी वाल्मीक यांच्या जीवनकार्याचा, साहित्यिक योगदानाचा आणि महान विचारांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या आदर्शांचा अंगीकार करून समाजात नैतिक मूल्ये, एकता आणि बंधुभाव जपण्याचे आवाहन उपस्थितांनी केले.

 

महर्षी वाल्मीक जयंतीनिमित्त गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. या कार्यक्रमात महर्षी वाल्मीक मित्र मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, ग्रामस्थ आणि समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 

महर्षी वाल्मीक यांच्या विचारांचा समाजात प्रसार करणे, सामाजिक एकोपा वाढविणे आणि बंधुभाव व सलोख्याची भावना दृढ करणे, हा जयंती उत्सवाचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले. उत्साहपूर्ण वातावरणात जयंती उत्सव साजरा करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *