आंतरराष्ट्रीय आयटी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअरपदी निवड; मोहित पाटील यांचा मराठा समाजातर्फे गुणगौरव
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 20 hours ago
कृषी संस्कृतीच्या आदर्श मातांच्या कृतज्ञतेचा महोत्सव म्हणजे नवरात्री महोत्सव
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 2 days ago
श्री मंगळग्रह मंदिरात विधिवत घटस्थापना आजपासून श्रीयंत्र व भौमयंत्रावर अर्चन; १९ ऑक्टोबरला नवचंडी यज्ञ
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 2 days ago
महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
सायर देवी बोहरा सेंट्रल स्कूलमध्ये १६ ऑक्टोबरला ‘आर्ट अँड क्राफ्ट एक्झिबिशन’; खासदार स्मिताताई वाघ यांच्या हस्ते उद्घाटन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळणार हक्काचे व्यासपीठ; सर्जनशीलता आणि कल्पकतेचा होणार कलाविष्कार
अमळनेर प्रतिनिधी : विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्यातील सर्जनशीलता, कल्पकता व कलात्मक कौशल्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सायर देवी बोहरा सेंट्रल स्कूलमध्ये शुक्रवार, दिनांक १६ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘आर्ट अँड क्राफ्ट एक्झिबिशन’चे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता शाळेच्या परिसरात या प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार स्मिताताई वाघ यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमाला शाळेचे चेअरमन सुरेंद्र कुमार बोहरा, प्रिन्सिपल जितेंद्र सिंग यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून, शाळेच्या आर्ट डिपार्टमेंटच्या पुढाकारातून या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला सर्जनशीलतेची जोड मिळाल्यास त्यांच्यातील कलागुण अधिक प्रभावीपणे विकसित होतात. चित्रकला, हस्तकला आणि विविध कलात्मक निर्मितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या कल्पना प्रत्यक्ष साकारण्याची संधी अशा प्रदर्शनांमधून मिळते. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या मेहनतीतून आणि कल्पकतेतून तयार केलेल्या कलाकृती त्यांच्या कलात्मक दृष्टिकोनाची, निरीक्षणशक्तीची आणि कौशल्याची ओळख करून देतात.
शालेय शिक्षणासोबतच कला, सर्जनशीलता आणि व्यक्तिमत्त्व विकासाला महत्त्व देण्याच्या दृष्टीने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या आत्मविश्वासात भर पडावी आणि त्यांच्या कलात्मक प्रयत्नांना योग्य व्यासपीठ मिळावे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांना आपल्या कलाकृती सादर करण्याची संधी मिळणार असून, शाळेतील कलाशिक्षणाच्या उपक्रमांना प्रोत्साहन मिळेल. या उपक्रमात विद्यार्थी, पालक आणि कलाप्रेमींनी सहभागी होऊन विद्यार्थ्यांच्या सर्जनशील प्रयत्नांना दाद द्यावी, असे आवाहन शाळेच्या वतीने करण्यात येत आहे.
चांदणी कुऱ्हे येथे सती माता दर्शनासाठी बुधवारी भव्य महिला पायी दिंडी सती माता महिला समितीतर्फे सलग चौथ्या वर्षी आयोजन; पहाटे साडेचार वाजता पाचपावली देवी मंदिरापासून होणार प्रारंभ
अमळनेर प्रतिनिधी : नवरात्रोत्सवानिमित्त चांदणी कुऱ्हे येथील ग्रामदैवत सती माता यांच्या दर्शनासाठी बुधवार, दि. १४ ऑक्टोबर रोजी भव्य महिला पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. सती माता महिला समितीतर्फे सलग चौथ्या वर्षी या दिंडीचे आयोजन करण्यात आले असून, परिसरातील महिलांमध्ये या धार्मिक सोहळ्याबाबत उत्साहाचे वातावरण आहे.
दिंडीला पहाटे ४.३० वाजता पाचपावली देवी मंदिरापासून प्रारंभ होणार असून, राधे डीजेच्या तालावर भक्तिमय वातावरणात ही दिंडी सती माता मंदिरापर्यंत मार्गक्रमण करणार आहे. देवीच्या जयघोषात आणि भक्तिभावात निघणाऱ्या या दिंडीच्या माध्यमातून महिलांना सामूहिक भक्ती, श्रद्धा आणि एकोप्याचा अनुभव घेता येणार आहे.
खाशी मंडळाच्या उपाध्यक्ष माधुरी पाटील व योगिता पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे नियोजन करण्यात येत आहे. महिला समितीच्या पदाधिकारी शीतल सावंत, कोमल बाफना, दिशा संधनशिव, मोहिनी सोनार, भारती कोळी, प्रिया रजाळे, निवेदिता कापडणेकर, सुनिता मोरे रोहिणी शिरसाट, अश्विनी सावंत, प्रतिभा पाटील, अर्चना शाह, अनिता जाधव आणि अनिता चौधरी यांच्यासह समितीच्या सदस्यांकडून दिंडीच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले जात आहेत.
दिंडीत सहभागी होणाऱ्या महिलांसाठी फराळाची व्यवस्था करण्यात आली आहे. या धार्मिक सोहळ्यात जास्तीत जास्त महिलांनी सहभागी होऊन सती मातेचे दर्शन घ्यावे, असे आवाहन सती माता महिला समितीतर्फे करण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय आयटी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअरपदी निवड; मोहित पाटील यांचा मराठा समाजातर्फे गुणगौरव
अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुका मराठा समाजाच्या वतीने आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभेत आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या अॅक्सेंचर (Accenture) कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून उच्च पदावर नोकरी मिळविल्याबद्दल चि. मोहित पंडित पाटील यांचा ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.
मोहित पाटील यांनी आपल्या शैक्षणिक गुणवत्तेच्या आणि मेहनतीच्या जोरावर मुंबई येथील नामांकित अॅक्सेंचर या आंतरराष्ट्रीय आयटी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून नोकरी मिळवली आहे. त्यांचे बी.टेक.चे शिक्षण पुणे येथे, तर सी-डॅकचे शिक्षण हैदराबाद येथे झाले आहे. त्यांच्या या यशामुळे पाटील कुटुंबीयांसह अमळनेर तालुका मराठा समाजाची मान उंचावली आहे.
मोहित पाटील हे प्रा. पी. के. पाटील, प्राचार्य तथा अखिल भारतीय मराठा महासंघाचे माजी तालुकाध्यक्ष, अमळनेर आणि सौ. सीमा पी. पाटील, भिलाली येथील प्रथम महिला उपसरपंच यांचे सुपुत्र आहेत.
या सत्कारप्रसंगी मराठा समाजाचे अध्यक्ष जयवंत मन्साराम पाटील, उपाध्यक्ष राजेंद्र देशमुख, खजिनदार महेंद्र बोरसे, सेक्रेटरी विक्रांत पाटील, एस. के. पाटील, जे. पी. पाटील, प्रा. पी. के. पाटील, चंद्रकांत काटे, संजय पुनाजी पाटील, गौरव उदय पाटील, महावितरणचे पी. एस. पाटील, निवृत्त न्यायाधीश गुलाबराव पाटील, सुनील आहिरराव, प्रा. अशोक पवार आणि के. पी. पाटील यांच्यासह समाजातील मान्यवर उपस्थित होते.

