मक्याच्या शेताला आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने अनर्थ टळला
Featured general Latest- Est 0 min
- 0 Views
- 1 day ago
अमळनेरचे उपक्रमशील शिक्षक पवन पाटील यांना ‘राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्रदान
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 1 day ago
सुरक्षित बालपण, सुरक्षित कार्यस्थळ! ‘पॉक्सो’ अन् ‘पॉश’ कायद्यांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 4 days ago
सक्षम तरुण, समृद्ध भारत! ‘नशामुक्त युवा’ अभियानांतर्गत व्याख्यान संपन्न
Featured general Latest- Est 0 min
- 0 Views
- 4 days ago
जी. एस. हायस्कूलचा खो-खो संघ जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी रवाना
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 5 days ago
Top 10 News
बोरी नदीच्या पात्रात चाकू व लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला:दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
मक्याच्या शेताला आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने अनर्थ टळला
अमळनेरचे उपक्रमशील शिक्षक पवन पाटील यांना ‘राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्रदान
सुरक्षित बालपण, सुरक्षित कार्यस्थळ! ‘पॉक्सो’ अन् ‘पॉश’ कायद्यांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
सक्षम तरुण, समृद्ध भारत! ‘नशामुक्त युवा’ अभियानांतर्गत व्याख्यान संपन्न
महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
बोरी नदीच्या पात्रात चाकू व लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला:दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
अमळनेर( प्रतिनिधी)येथील गांधलीपुरा भागातील आंबेडकर भवनाजवळ बोरी नदीच्या पात्रात दोन तरुणांवर चाकू आणि लोखंडी रॉडने अचानक जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.
दिलेली स्वस्तर माहिती अशी की फिर्यादी आकिब शेख
त्याचा मित्र अल्तमश शेख याच्यासोबत १८ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ११:४५ वाजेच्या सुमारास आंबेडकर चौक येथून घरी जात होता. त्यावेळी शरद उर्फ दादु पारधी याने फोन करून त्यांना बोरी नदीच्या पात्रात बोलावून घेतले.दोघे तेथे गेले असता,कोणत्याही कारणाशिवाय शरद उर्फ दादु याने हातातील चाकूने अल्तमश याच्या पाठीवर वार करून दुखापत केली. तसेच दुसरा मोन्या चंडाले याने त्याच्या हातातील लोखंडी रॉडने आकिब याच्या डाव्या पायाच्या पोटरीवर मारून जखमी केले.या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे आकिब व अल्तमश दोन्ही तरुण घाबरून तेथून पळून गेले आणि त्यांनी अमळनेर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.
या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विनोद भोई करत आहेत.
फिर्यादीच्या जबाबावरून अमळनेर पोलीस ठाण्यात शरद उर्फ दादु वासु पारधी व मोन्या चंडाले
यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विनोद भोई करत आहेत.
या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात दोघा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमळनेरमध्ये मतचोरीच्या आरोपांविरोधात तीव्र निषेध; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन! दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर एनएसयूआयच्या वतीने आंदोलन; निष्पक्ष निवडणूक आयोगाची मागणी
अमळनेर | प्रतिनिधी : लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेच्या मागणीसाठी अमळनेर येथे नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) च्या वतीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
दसरा हा असत्यावर सत्याचा, अन्यायावर न्यायाचा आणि वाईट प्रवृत्तींवर चांगल्या विचारांचा विजय दर्शविणारा सण आहे. याच पार्श्वभूमीवर, ज्याप्रमाणे दसऱ्याला रावणाचे दहन केले जाते, त्याचप्रमाणे निवडणूक प्रक्रियेतील कथित मतचोरी, गैरप्रकार आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीविषयी निर्माण झालेल्या प्रश्नांच्या निषेधार्थ हे प्रतीकात्मक पुतळादहन करण्यात आले.
लोकशाहीचा खरा आधार हा जनतेचा मतदानाचा अधिकार असून, त्या अधिकाराचे संरक्षण करण्याची घटनात्मक जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. मात्र, निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत असेल, तर ही बाब देशाच्या लोकशाही व्यवस्थेसाठी अत्यंत चिंताजनक आहे, अशी भूमिका यावेळी एनएसयूआयच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली.
निवडणूक आयोग ही कोणत्याही राजकीय पक्षाच्या हितासाठी नव्हे, तर देशातील प्रत्येक नागरिकाच्या मताचे संरक्षण करण्यासाठी असलेली स्वतंत्र घटनात्मक संस्था आहे. त्यामुळे मतचोरीच्या आरोपांची स्वतंत्र व पारदर्शक चौकशी करण्यात यावी आणि निवडणूक आयोगाने आपल्या कार्यपद्धतीतून जनतेचा विश्वास कायम राखावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.
“दसऱ्याच्या दिवशी आपण रावणाचे दहन करून अन्याय आणि असत्याच्या अंताचा संदेश देतो. आज त्याच भावनेतून लोकशाहीच्या मूल्यांना बाधा पोहोचवणाऱ्या प्रवृत्तींचा आम्ही निषेध करत आहोत. निवडणूक आयोग हा सत्ताधाऱ्यांचा नव्हे, तर संविधानाचा आणि देशातील सर्वसामान्य जनतेच्या मतदानाच्या अधिकाराचा रक्षक असला पाहिजे. लोकशाहीमध्ये प्रत्येक मत पवित्र आहे आणि त्या मताशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही,” अशी भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.
लोकशाहीचे रक्षण, संविधानिक संस्थांची स्वायत्तता आणि निष्पक्ष निवडणूक प्रक्रिया या मागण्यांसाठी एनएसयूआयच्या वतीने लोकशाही मार्गाने संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या आंदोलनावेळी ॲड. कौस्तुभ पाटील (जिल्हाध्यक्ष, एनएसयूआय), महेश पाटील (जिल्हाध्यक्ष, युवक काँग्रेस), उमेश संदानशिव (तालुकाध्यक्ष, एनएसयूआय), बी. के. सूर्यवंशी (अध्यक्ष, तालुका काँग्रेस कमिटी), गजेंद्र साळुंखे (शहराध्यक्ष), माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम बापू पाटील, धनगर दला पाटील, मनोज दाजीबा पाटील, संदीप घोरपडे, रज्जाक शेख, सईद तेली, प्रताप पाटील, रोहिदास दाजी पाटील, श्याम पवार, अशोक पवार, पी. वाय. पाटील, दिनेश पवार, मयूर पाटील, हरिभाऊ मारवडकर, बाळा आप्पा पाटील, राजेंद्र भाट, हर्षल जाधव, तौसिफ तेली, अशोक पारधी, नरेश चव्हाण, प्रशांत चव्हाण, हिमांशू पाटील, प्रशांत बाविस्कर, मयंक चव्हाण, हर्षल बडगुजर, आकाश भिल, बंटी खैरनार, प्रवीण पाटील आदी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मक्याच्या शेताला आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने अनर्थ टळला
अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर शहरातील नांदगाव रस्त्यालगत असलेल्या मक्याच्या शेताला सोमवारी (दि. १९ ऑक्टोबर) सकाळी १० वाजेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग पूर्णपणे आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.
प्रकाश नवलं पाटील, ज्ञानेश्वर बळीराम पाटील आणि सुधाकर काशिनाथ पाटील यांच्या मक्याच्या शेताला आग लागल्याची माहिती नगरसेवक मुक्तार खाटीक यांनी नगरपरिषदेला दिली. माहिती मिळताच अग्निशमन अधिकारी गणेश गोसावी यांनी नगरपरिषदेचे अग्निशमन वाहन तातडीने घटनास्थळी रवाना केले.
अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तत्परतेने प्रयत्न करून आग पूर्णपणे विझवली. परिसरात आजूबाजूला मका पिकासह कुरण असल्याने आग पसरल्यास मोठे नुकसान होण्याची शक्यता होती. मात्र, अग्निशमन दलाच्या वेळीच केलेल्या कारवाईमुळे संभाव्य धोका टळला.
या मोहिमेत वाहनचालक सत्यन संदानशिव आणि फायरमन मच्छिंद्र चौधरी यांनी सहभाग घेतला.


