सक्षम तरुण, समृद्ध भारत! ‘नशामुक्त युवा’ अभियानांतर्गत व्याख्यान संपन्न
Featured general Latest- Est 0 min
- 0 Views
- 1 day ago
जी. एस. हायस्कूलचा खो-खो संघ जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी रवाना
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 2 days ago
डी. आर. कन्या शाळेत वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा
Featured general Latest- Est 0 min
- 0 Views
- 2 days ago
महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
सुरक्षित बालपण, सुरक्षित कार्यस्थळ! ‘पॉक्सो’ अन् ‘पॉश’ कायद्यांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
भडगाव प्रतिनिधी : बालकांचे संरक्षण आणि कार्यस्थळावरील महिलांच्या सुरक्षिततेविषयी कायदेशीर जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने भडगाव येथील सौ. र. ना. देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात गुरुवार, दि. १६ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘पॉक्सो’ आणि ‘पॉश’ या महत्त्वपूर्ण कायद्यांवर विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात भडगाव सत्र न्यायालयातील वकील ॲड. नीलेश तिवारी यांनी विद्यार्थ्यांना दोन्ही कायद्यांविषयी सविस्तर व अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. त्यांनी बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण करणारा पॉक्सो कायदा आणि कार्यस्थळावरील महिलांच्या लैंगिक छळास प्रतिबंध करणारा पॉश कायदा यांची माहिती सोप्या व प्रभावी भाषेत समजावून सांगितली. कायद्याच्या तरतुदींसोबतच त्यांचा सामाजिक संदर्भ स्पष्ट करत त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये कायद्याविषयी जागरूकता निर्माण केली.
व्याख्यानादरम्यान विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना ॲड. तिवारी यांनी समर्पक उत्तरे देत त्यांच्या शंकांचे निरसन केले. सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी कायद्याची माहिती असणे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे आणि प्रत्येकाने आपल्या अधिकारांसोबत कर्तव्यांचीही जाणीव ठेवणे आवश्यक असल्याचा संदेश या मार्गदर्शनातून देण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय भैसे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. देवेंद्र मस्की यांनी करून दिला. सूत्रसंचालन डॉ. चित्रा पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. बी. एस. भालेराव यांनी मानले. राष्ट्रगीताने या मार्गदर्शन शिबिराची सांगता झाली.
कायद्याची माहिती, सुरक्षिततेची जाणीव आणि सामाजिक जबाबदारीचा संदेश देणारे हे शिबिर विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरले.

सेवा संकल्प अभियानातून गरजुना तात्काळ आणि सहज लाभ – माजी नगराध्यक्ष जयश्री पाटील अमळनेर तालुक्यात ९६० लाभार्थ्यांना लाभ वाटप
अमळनेर : सेवा संकल्प अभियानातून गरजू आणि पात्र लाभार्थ्यांना सहजपणे शासनाच्या विविध योजनांचे लाभ मिळत आहेत. खऱ्या अर्थाने जनतेपर्यंत शासकीय योजना पोहचत आहेत. काही योजना नोंदी न आढळल्याने वयाच्या दाखल्याबाबत अडचणी येतात या अभियानातून शासनाने मार्ग काढून ऑफ लाईन दाखल्याची सुविधा द्यावी अशी अपेक्षा माजी नगराध्यक्ष जयश्री पाटील यांनी इंदिरा भुवन मध्ये सेवा संकल्प अभियानात बोलताना व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदास २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल १६ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर दरम्यान सेवा संकल्प अभियान राबवण्यात येत आहे. अमळनेर तालुक्यातील सर्व विभागांचे सेवा संकल्प अभियान १६ रोजी इंदिरा भुवन येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी सुमारे ९६० लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष जयश्री पाटील , उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे , तहसीलदार डॉ उमा ढेकळे , निवासी नायब तहसीलदार सी यु पाटील , तालुका कृषी अधिकारी सी आर ठाकरे , बालविकास प्रकल्प अधिकारी प्रेमलता पाटील ,भूमिअभिलेख उपअधिक्षक सीमा गावित , मुख्याधिकारी गणेश शिंदे , नायब तहसीलदार अजय कुलकर्णी,पुरवठा निरीक्षण अधिकारी रुकसाना शेख हजर होते.
जयश्री पाटील पुढे म्हणाल्या की प्रशासन जनसेवेसाठी तत्पर आहे गतिमान झाले आहे. काही तांत्रिक अडचणी आल्यास प्रशासन व आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन देखील जयश्री पाटील यांनी केले.
या अभियानात नवीन शिधापत्रिका २२ ,दुबार शिधापत्रिका ८ , नाव कमी करणे १८ ,धान्य लाभार्थी ५५० ,राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य धनादेश ६ ,३५ लोकांची डीबीटी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. हयात प्रमाणपत्रे ८० , संजय गांधी योजना ११० , इंदिरा गांधी योजना २२ , श्रावण बाळ योजना २४ , १३४ प्रकरणे फेरफार निकाली काढले , १४ प्रकरणे सात बारा दुरुस्ती , ८ अ ची आठ प्रकरणे , ८४ जणांना ७-१२ वाटप करण्यात आले , ४९ उत्पन्नचे दाखले वितरण करण्यात आले. राष्ट्रीय प्रमाणपत्र वितरण १९ , रहिवासी प्रमाणपत्र ४१ , जातीचे दाखले वितरण १६ , आधार नोंदणी ८ व आधार दुरुस्ती सहा , ५० लाभार्थ्यांना बेबी किट तर १२ विविध प्रकारचे खाद्य नमुने , ८ महिला बचत गट , ४ जणांना अवजार वाटप , ४९ महिलांना शेतकरी प्रमाणपत्र , १० जणांना नवीन वीज कनेक्शन देण्यात आले , २६ जणांना आयुष्यमान कार्ड वाटप करण्यात आले , ६० महिलांना मोफत पास , २६ जणांचे बचत खाती , ८ महिलांना सन्मान निधी , १ मुद्रांक शुल्क आणि १० के वाय सी असे एकूण ९६० लाभार्थ्यांना लाभ देण्यात आले.
यावेळी प्रास्ताविक प्रांताधिकारी मयुर भंगाळे यांनी तर सूत्रसंचालन आणि आभार संजय पाटील यांज मानले. शिबीर यशस्वीतेसाठी मंडळाधिकारी नरेंद्रकुमार धनराळे , ग्राम महसूल अधिकारी अशपाक पिंजारी , जगदीश पाटील , विद्या पाटील , दीपक बोरसे , सूर्यवंशी , सचिन निकम यांनी सहकार्य केले.
कल्पकतेला लाभले व्यासपीठ; विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने सायरदेवी बोहरा सेंट्रल स्कूलचे प्रदर्शन ठरले लक्षवेधी! आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते आर्ट अँड क्राफ्ट एक्झिबिशनचे उद्घाटन; चिमुकल्यांच्या सृजनशीलतेचे मान्यवरांकडून कौतुक
अमळनेर प्रतिनिधी : विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला सृजनशीलतेची जोड मिळाली, मेहनतीतून कलाकृती साकारल्या आणि विविध विषयांवरील नाविन्यपूर्ण प्रकल्पांतून बालप्रतिभेचा अनोखा आविष्कार घडला. अशा उत्साहपूर्ण वातावरणात अमळनेर येथील सायरदेवी बोहरा सेंट्रल स्कूलमध्ये आयोजित आर्ट अँड क्राफ्ट एक्झिबिशन लक्षवेधी ठरले. आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर आधारित प्रकल्प, आकर्षक कलाकृती आणि कल्पकतेतून साकारलेल्या प्रतिकृतींचे सुंदर सादरीकरण केले. लहान वयातच विद्यार्थ्यांनी दाखवलेली कलात्मक दृष्टी, कल्पनाशक्ती, मेहनत आणि विषयांची मांडणी उपस्थितांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. प्रत्येक कलाकृतीतून विद्यार्थ्यांची जिज्ञासा, निरीक्षणशक्ती आणि काहीतरी वेगळे निर्माण करण्याची धडपड दिसून आली.
आमदार अनिल पाटील यांनी प्रदर्शनाची पाहणी करून विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विविध प्रकल्पांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारे आणि त्यांच्या सृजनशीलतेला हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणारे असे उपक्रम शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी इतक्या लहान वयात कल्पकतेने आणि मेहनतीने साकारलेल्या कलाकृती पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.
केवळ पाठ्यपुस्तकांपुरते शिक्षण मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणे, त्यांच्यातील सर्जनशीलता विकसित करणे आणि स्वतःच्या कल्पना प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याची संधी उपलब्ध करून देणे, हा या प्रदर्शनाचा महत्त्वपूर्ण पैलू ठरला. विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांना व्यासपीठ मिळाल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढण्यासही मदत झाली.
या प्रसंगी शाळेचे चेअरमन सुरेंद्रकुमार बोहरा, रोटरी क्लबचे अध्यक्ष महेश पाटील, शेतकी संघाचे संचालक विक्रांत पाटील, शाळेचे प्राचार्य जितेंद्र सिंग, पारोळा शाळेच्या प्राचार्या रियांका अरझरे, चित्रकार आधार बिऱ्हाडे, प्रवीण संदानशिव, हृदयनाथ मोरे, शरद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रदर्शनाच्या यशस्वितेसाठी शाळेच्या कला विभागाने महत्त्वपूर्ण सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या कल्पनांना कलात्मक स्वरूप देण्यासाठी कला विभागाने घेतलेले प्रयत्न या प्रदर्शनातून ठळकपणे दिसून आले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारा आणि शिक्षणासोबतच सृजनशीलतेचे महत्त्व अधोरेखित करणारा हा उपक्रम उपस्थितांसाठी विशेष आकर्षण ठरला.

