आंतरराष्ट्रीय योग दिन मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे योग, मोफत मोतीबिंदू शिबिर
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 14 hours ago
लिनेस क्लबचा प्रेरणादायी उपक्रम; प्रताप हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 3 days ago
महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
श्री मंगळग्रह मंदिरात आरोग्याबाबत जनजागृती विविध योगप्रकारांचा झाला सराव; आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शिबिर
अमळनेर : दरवर्षीप्रमाणे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिर परिसरात रविवार, दि. २१ जून रोजी सकाळी ७ ते १० या वेळेत विशेष योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात मंगळग्रह सेवा संस्थेचे विश्वस्त मंडळ, मंगल सेवेकरी तसेच मंदिराच्या सेवेकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सकाळच्या प्रसन्न वातावरणात पार पडलेल्या या उपक्रमामुळे आरोग्याबाबत जनजागृती होण्यास मदत झाली.
शिबिराची सुरूवात योग प्रार्थनेने करण्यात आली. त्यानंतर योग मार्गदर्शक तथा मंगळग्रह सेवा संस्थेचे सहसचिव दिलीप बहिरम व खजिनदार गिरीश कुलकर्णी यांनी उपस्थितांना विविध योगासने, प्राणायाम, ध्यानधारणा तसेच श्वसनक्रिया यांचे प्रात्यक्षिक करून दाखविले. सहभागी सर्वांनी ताडासन, वृक्षासन, भुजंगासन, वज्रासन, अनुलोम-विलोम, कपालभाती आदी योगप्रकारांचा सराव केला.
यावेळी मार्गदर्शक बहिरम यांनी योगाचे महत्त्व विशद करताना सांगितले, की योग ही केवळ व्यायाम पद्धती नसून शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधणारी जीवनशैली आहे. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक तंदुरुस्ती वाढते, मानसिक ताणतणाव कमी होतो आणि व्यक्तीची एकाग्रता सुधारते. आधुनिक धावपळीच्या जीवनात वाढत्या ताणतणावामुळे अनेक शारीरिक व मानसिक समस्या निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीत योग हा आरोग्यपूर्ण जीवनासाठी प्रभावी उपाय ठरतो.
योगाच्या फायद्यांविषयी माहिती देताना कुलकर्णी यांनी सांगितले, की नियमित योग केल्याने रक्ताभिसरण सुधारते, स्नायू व सांधे मजबूत होतात, लठ्ठपणा नियंत्रणात राहतो तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकार यांसारख्या आजारांचा धोका कमी होण्यास मदत होते. याशिवाय ध्यान आणि प्राणायामामुळे मन शांत राहते, सकारात्मक विचारसरणी विकसित होते आणि झोपेची गुणवत्ता सुधारते.
शिबिरात उपस्थित मान्यवरांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व अधोरेखित करत योगाला दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनविण्याचे आवाहन केले. तसेच योगाच्या माध्यमातून निरोगी समाज आणि सशक्त राष्ट्र उभारण्यास हातभार लागेल, असे मत व्यक्त केले.


खा,शि.मंडळ संचलित द्रौ.रा.कन्या शाळेत जागतिक योग दिवस योगासने प्रात्यक्षिक व त्यांचे महत्व विषद करुन उत्साहाच्या व आनंदाच्या वातावरणात संपन्न.
अमळनेर : खा.शि.मंडळ संचलित श्रीमती द्रौंपदीबाई रांमचंद्र शेठ कन्या शाळेत जागतिक योग दिवस – योगासने व त्यांचे प्रात्यक्षिक आणि त्यांचे मानवी जीवनात असणारे अनन्य साधारण महत्व या सर्व बाबीवर प्रकाश टाकीत उत्साहाच्या व आनंदाच्या वातावरणात संपन्न संपन्न झाला.
कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन शुभारंभ शाळेच्या मुख्याध्यापिका सौ एस एस सुर्यवंशी मॕडम ,पर्यवेक्षक श्री एस पी वाघ सर ,जेष्ठ क्रीडा शिक्षक श्री के आर बाविस्कर , जेष्ठ शिक्षिका सौ एस बी उपासनी अश्या मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीदेवीला माल्यार्पण व दिप प्रज्वलन करण्यात आले.
त्यांच सोबत आज कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रक अतिथी म्हणुन योग तज्ञ , योग आचार्य रामदेवजी बाबा यांचे अनुयायी शिष्य योग तज्ञ श्री गजानन माळी सर हे उपस्थित होते. त्यांनी मानवी जीवनात योग व्यक्तीला व्याधीमुक्त , रोगमुक्त, सशक्त कणखर व दीर्घाष्युशी बनवतो.तसेच विद्यार्थीना तो चिंतन मनन व अध्यापन प्रती ओढ व आस्था निर्माण करतो.आजच्या या योग कार्यक्रम मध्ये चक्रासन ,ताडासन ,व्रजासन , शवासन , सुर्यनमस्कार अश्या नाना विविध स्वरुपाचे योग सादर करुन त्यांचे दुरगामी सकारात्मक परिणाम अश्या विविध बाबीवर उत्तम स्वरुपात प्रकाशज्ञोत टाकला.
सदर कार्यक्रमासाठी अनमोल सहकार्य शालेय समिती चेअरमन श्री जितेंद्र भाऊ जैन ,मुख्याध्यापिका सौ एस एस सुर्यवंशी मॕडम , पर्यवेक्षक श्री एस पी वाघ , जेष्ठ शिक्षक श्री के आर बाविस्कर ,जेष्ठ शिक्षिका सौ एस बी उपासनी ,सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी वृंद वर्ग यांचे लाभले.


आंतरराष्ट्रीय योग दिन मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे योग, मोफत मोतीबिंदू शिबिर
अमळनेर : येथील मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे जागतिक योग दिनानिमित्त रविवार, दि. 21 जून 2026 रोजी नागरिकांच्या आरोग्य संवर्धनासाठी विशेष योग शिबिर व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. श्री मंगळग्रह मंदिरात सकाळी 7 ते 10 या वेळेत योग शिबिर होईल. या उपक्रमातून आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देण्यासोबतच नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.
योग शिबिरात आरोग्यदायी जीवनशैली, तणावमुक्ती, प्राणायाम तसेच ध्यान याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. योगामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते, याबाबतही उपस्थितांना माहिती दिली जाईल. तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली मोफत तपासणी, आवश्यक औषधोपचार आणि मोफत शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे गरजू व ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या दोन्ही शिबिरांत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोफ्लदवावा, असे आवाहन मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्यासह समस्त विश्वस्त मंडळाने केले आहे.



