ब्रेकिंग
अमळनेर तालुका कुस्ती निवड चाचणी ६ डिसेंबरला जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी तालुक्यातील पैलवानांची निवड होणार

 

अमळनेर प्रतिनिधी : सन २०२६-२७ या वर्षासाठी होणाऱ्या जळगाव जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेकरिता अमळनेर तालुक्याची निवड चाचणी स्पर्धा रविवार, दि. ६ डिसेंबर २०२६ रोजी क्रीडा संकुल, अमळनेर येथे आयोजित करण्यात आली आहे. अमळनेर तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीने ही माहिती देण्यात आली.

 

स्पर्धेसाठी सकाळी ८.३० ते १० वाजेपर्यंत वजनकाटा होणार असून, सकाळी १०.३० वाजता कुस्त्यांना सुरुवात होईल. या निवड चाचणीतून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र पैलवानांची निवड करण्यात येणार आहे.

 

विविध वयोगटांत स्पर्धा

 

स्पर्धेत १५ वर्षांखालील कुमार गट, १७ वर्षांखालील मुले, २० वर्षांखालील फ्री स्टाईल व ग्रीको रोमन तसेच वरिष्ठ ग्रीको रोमन पुरुष गटांचा समावेश आहे.

 

वजन गट पुढीलप्रमाणे :

 

– १५ वर्षांखालील कुमार गट : ३८, ४१, ४४, ४८, ५२, ६७, ६८, ७५ व ८५ किलो.

– १७ वर्षांखालील मुले : ४५, ४८, ५१, ५५, ६०, ६५, ७१, ८०, ९२ व ११० किलो.

– २० वर्षांखालील फ्री स्टाईल : ५७, ६१, ६५, ७०, ७४, ७९, ८६, ९२, ९७ व १२५ किलो.

– २० वर्षांखालील ग्रीको रोमन : ५५, ६०, ६३, ६७, ७२, ७७, ८२, ८७, ९७ व १३० किलो.

– वरिष्ठ महाराष्ट्र केसरी ग्रीको रोमन पुरुष : ५५, ६०, ६३, ६७, ७२, ७७, ८२, ८७ व ९७ किलो.

– ग्रीको रोमन महाराष्ट्र केसरी : ८७ ते १३० किलो.

 

आवश्यक कागदपत्रे सोबत आणण्याचे आवाहन

 

कुमार गटातील स्पर्धकांनी जन्मतारीख दाखला, वैद्यकीय प्रमाणपत्र व पालकांचे संमतीपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. तसेच स्पर्धेसाठी येताना पासपोर्ट, आधार कार्ड, जन्म प्रमाणपत्र व शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र आणावे. सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रतींसह प्रत्येकी एक छायांकित प्रत सादर करावी.

स्पर्धेचे आयोजन तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष विश्वास संतोष पाटील (बाळू), संजय कौतिक पाटील, हाजी शब्बीर पैलवान, प्रताप अशोक शिंपी, संजय पैलवान, रावसाहेब पाटील, भरत पवार व प्रवीण कुमार पाटील (तांत्रिक समिती) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.

 

अधिक माहितीसाठी ९९७०९३६५१०, ९०२८३०५७३० व ९६०४४३३७१४ या क्रमांकांवर संपर्क साधावा. अमळनेर तालुक्यातील जास्तीत जास्त पैलवानांनी निवड चाचणी स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *