संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन तर्फे उद्या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
अमळनेर :- संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन दिल्ली च्या अमळनेर शाखेतर्फे दिनांक 14 जून रोजी सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. संत निरंकारी सत्संग भवन सिंधी कॉलनी, चोपडा रोड, अमळनेर येथे हे शिबिर होणार आहे. यावेळी ज्ञान प्रचारक आ. म. श्री. राजकुमार वाणी जी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
तरी जास्तीत जास्त रक्तदान करून कोणाचे तरी प्राण वाचविण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन संत निरंकारी सत्संग मंडळातर्फे आयोजकांनी केले आहे.


