पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जयंतीनिमित्त अमळनेरात रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ‘ आप ‘ च्या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

अमळनेर ( प्रतिनिधी) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त अमळनेर तालुका आम आदमी पार्टी च्या वतीने एका भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार स्मिताताई वाघ, आमदार अनिल पाटील, डॉ. अनिल शिंदे, भैरवी वाघ पलांडे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. यावेळी उपस्थितांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या लोककल्याणकारी कार्याचे स्मरण केले आणि रक्तदान शिबिराच्या उपक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे आयोजन आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष महेंद्र साळुंखे, दीक्षा महेंद्र साळुंखे, यांनी केले होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष रामकृष्ण पाटील, वंदना रामकृष्ण पाटील, सल्लागार मोहन मोरे, सुधाकर गजे, राजेंद्र बाळकृष्ण जाधव, ललित सातपुते, राजू धनगर, शेजत खाटीक यांनी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी पक्षाचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


