ब्रेकिंग
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी

म.वा.मंडळात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती साजर

अमळनेर-येथिल मराठी वाड्•मय मंडळात राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची ३०१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी बन्सीलाल भागवत,डॉ एन डी ओसवाल,डॉ.सुरेश माहेश्वरी, प्रा.डॉ विजय तुंटे यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. या प्रसंगी मा.गोविंद पाटील, हेमंत बाळापुरे,जगदीश कुलकर्णी आदी उपस्थित होते.

 

द्रौ. रा. कन्या शाळेत राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी….

अमळनेर…खा.शि.मं. संचलित श्रीमती द्रौपदीबाई रामचंद्र शेठ कन्या शाळेत ३०१ वी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करण्यात आली.

       यावेळी शाळेत व स्मारक येथे पुण्यराजमाता च्या प्रतिमेस माल्यार्पन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ एस एस सुर्यवंशी मॕडम , पर्यवेक्षक श्री एस पी वाघ सर , जेष्ठ लिपिक श्री शामभाऊ पवार , प्रयोगशाळा सहाय्यक श्री सतिश लाडगे सर .जेष्ठ शिक्षिका श्रीमती आर एस सोनवणे , जेष्ठ शिक्षक श्री एस एस माळी सर यांनी पुजन केले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *