पोहण्यासाठी गेलेल्या सिंधी कॉलनीतील तीन मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू
अमळनेर :- शहरातील चोपडा रस्त्यावर असलेल्या खदानीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या सिंधी कॉलनीतील तीन अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी घडली असून या घटनेमुळे सिंधी कॉलनी परिसर तसेच संपूर्ण अमळनेर शहरावर शोक कडा पसरली असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मृत पावलेल्या मुलांची नावे अनुक्रमे मानव बंटी रत्नांनी, कार्तिक विकी उधवानी, आणि दिनेश विजय पंजवानी अशी आहेत. आज दुपारच्या सुमारास हे तिघेही मित्र खदानित एकत्र पोहण्यासाठी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याचा अंदाज आहे.
घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी तसेच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच संबंधित यंत्रणा आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली. या दुर्दैवी घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.



