ब्रेकिंग
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ( शरद पवार गट ) चे शहर सरचिटणीस आप्पासाहेब चिंधु वानखेडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा 

 

अमळनेर :- येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर सरचिटणीस आप्पासाहेब शिंदे ओंकार वानखेडे , यांचा वाढदिवस पक्षाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी माजी आमदार व पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. बी एस पाटील यांच्या हस्ते वानखेडे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच आबासाहेबांनी वानखेडे यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य तसेच सामाजिक व राजकीय कार्यात यश मिळो अशा शुभेच्छा दिल्या.

             या कार्यक्रमास माजी आमदार डॉ. बी एस पाटील, उपनगराध्यक्ष तथा शहराध्यक्ष प्रशांत निकम, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. अशोक पवार, तालुकाध्यक्ष डी एम पाटील सर, शहर कार्याध्यक्ष जाकिर शेख, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष मकसूद पठाण , लोकजागर न्यूजचे संपादक हृदयनाथ मोरे, पत्रकार संदीप सोनवणे, अजय भामरे, तसेच सिद्धार्थ सोनवणे, मारुती दादा यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *