ब्रेकिंग
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ५० लाखांच्या भव्य प्रवेशद्वाराचे भूमिपूजन! धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न

अमळनेर (प्रतिनिधी) — धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून मंगळवार, दि. २० ऑक्टोबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर उभारण्यात येणाऱ्या भव्य प्रवेशद्वाराचा भूमिपूजन सोहळा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला. या प्रवेशद्वाराच्या उभारणीसाठी आमदार निधीतून ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून, या माध्यमातून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी एक भव्य वास्तू उभारण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे.

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी पर्वावर पार पडलेल्या या भूमिपूजन सोहळ्याला विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आणि बौद्ध समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपण्याच्या आणि त्यांच्या कार्याला अभिवादन करण्याच्या दृष्टीने या प्रवेशद्वाराच्या उभारणीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

या प्रसंगी अमळनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे, डॉ. दिगंबर महाले, प्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव, नगरसेवक देवेंद्र कांबळे, विजय पाटील, सचिन पाटील, नंदा संदनशिव, नरेंद्र संदनशिव, शोभाबाई कढरे, ॲड. श्रावण ब्रह्मे, प्रा. विजय खैरनार, अशोक बिऱ्हाडे, गौतम मोरे, प्रा. डॉ. विजय तुंटे, चिंधू वानखेडे, डॉ. योगेश नेतकर, समाधान मैराळे, हृदयनाथ मोरे, सोमचंद संदनशिव आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. राहुल निकम यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषद, सिद्धार्थ व्यायामशाळा आणि बौद्ध समाजबांधव यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

५० लाखांच्या निधीतून साकार होणारे हे भव्य प्रवेशद्वार अमळनेरच्या सामाजिक व सांस्कृतिक वैभवात भर घालणारे ठरेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *