ब्रेकिंग
डी. आर. कन्या शाळेची कबड्डीत जिल्हास्तरावर झेप! १४ व १७ वर्षांखालील मुलींच्या संघांचे दुहेरी विजेतेपद; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र

 

अमळनेर प्रतिनिधी : खान्देश शिक्षण मंडळ संचलित श्रीमती द्रौ. रा. कन्या शाळेच्या विद्यार्थिनींनी शासकीय शालेय कबड्डी स्पर्धेत दमदार कामगिरी करत १४ व १७ वर्षांखालील अशा दोन्ही वयोगटांत विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यांत प्रतिस्पर्धी संघांना पराभूत करून शाळेच्या मुलींनी दुहेरी विजेतेपदाचा मान मिळविला असून, दोन्ही संघांनी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या आयोजनाखाली ही स्पर्धा पार पडली. १४ वर्षांखालील गटाच्या अंतिम सामन्यात डी. आर. कन्या शाळेच्या संघाने ललिता पाटील स्कूलच्या संघावर मात केली, तर १७ वर्षांखालील गटात आश्रमशाळा, रणाईचे या संघाला पराभूत करून विजेतेपद मिळविले. या यशामुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील लौकिकात भर पडली आहे.

दोन्ही विजेत्या संघांतील खेळाडू

१४ वर्षांखालील मुलींचा संघ : कर्णधार जिंकरा शेख शाकिर, भैरवी पाटील, कृतीका वाडेकर, आराध्या पाटील, श्रावणी साळुंखे, लावण्या पाटील, दिव्या पाटील, कावेरी अहिरे, हिमानी पाटील, रीदा फातेमा सादिक आणि हिमानी पाटील.

१७ वर्षांखालील मुलींचा संघ : कर्णधार अश्मिरा शाकिर शेख, कावेरी पाटील, पुनवी निकम, कल्याणी पारधी, केतकी देशपांडे, इशा पाटील, मयुरी पवार, लीना गुरव, कामिनी सोनवणे, वैष्णवी पाटील, समीक्षा जाधव, रिशिका गोयल, स्नेहल पाटील आणि मोनिका भोई.

तहसीलदारांच्या हस्ते खेळाडूंचा सन्मान

दोन्ही संघांनी मिळविलेल्या यशाबद्दल अमळनेरच्या तहसीलदार डॉ. उमा ढेकळे यांच्या हस्ते खेळाडूंना विजयी चषक व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

या संघांना क्रीडा विभागप्रमुख श्रीमती आर. एस. सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या परिश्रमांमुळे आणि खेळाडूंच्या मेहनतीमुळे शाळेला हे दुहेरी यश मिळाले.

शालेय समितीचे चेअरमन भाऊसाहेब जितेंद्र जैन, मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी, उपमुख्याध्यापक श्री. एस. आर. शिंगाणे, पर्यवेक्षक श्री. एस. पी. वाघ, शिक्षक प्रतिनिधी सौ. पी. पी. जोशी, कार्यालयप्रमुख श्री. शाम पवार, श्री. एस. एस. माळी, श्रीमती आर. एस. सोनवणे आणि श्री. किरण सनेर यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले.

आता दोन्ही संघ जिल्हास्तरीय स्पर्धेत आपले कौशल्य दाखविण्यासाठी सज्ज झाले आहेत. ही स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे होणार असून, शाळेच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *