अखेर अमळनेर न्यायालयाने घेतला मोकळा श्वास न्यायालयाच्या निर्देशानुसार पालिकेने काढले अतिक्रमण
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 3 days ago
पोहण्यासाठी गेलेल्या सिंधी कॉलनीतील तीन मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 5 days ago
महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
लोकसहभागातून ११ हजार झाडांचे संवर्धन; साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानचा हरित उपक्रम ठरतोय प्रेरणादायी संरक्षणासाठी कंपाउंड ची लोकप्रतिनिधींकडे मागणी
अमळनेर (प्रतिनिधी): पर्यावरण संवर्धन आणि हरित भविष्याच्या दिशेने साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानने हाती घेतलेला महत्त्वाकांक्षी वृक्षसंवर्धन उपक्रम सध्या वेगाने सुरू आहे. लोकसहभागातून उपलब्ध झालेल्या जागेवर तब्बल ११ हजार झाडांचे संवर्धन व संगोपन करण्यात येत असून, हा उपक्रम परिसरासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
लोकसहभागातून उभारलेल्या आणि सुमारे अकरा हजार झाडांचे संवर्धन संगोपन सुरू असलेल्या साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानच्या परिसराला संरक्षण कंपाऊंड उभारण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या दर्शना पवार यांनी केली आहे. कंपाउंड नसल्यामुळे समाजकंटकांकडून दोन वेळा परिसरात आग लावण्यात आली असून त्यात अनेक झाडांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. पर्यावरण संवर्धनासाठी उभारलेल्या या हरित उपक्रमाचे संरक्षण करणे ही प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचे सामाजिक जबाबदारी असून तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकाळात कंपाऊंडच्या कामाला सुरुवात होऊन 25 टक्के काम पूर्ण झाले होते. मात्र त्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार अनिल पाटील यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करूनही उर्वरित कामाला गती मिळाली नाही पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या या प्रकल्पाकडे दुर्लक्ष का केली जात आहे असा सवाल उपस्थित करून यासाठी आता जनमत तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही दर्शना पवार यांनी नमूद केले आहे.


स्मार्ट मीटर सक्ती विरोधात वीज ग्राहकांनी जागरूक रहावे. सुस्थितीत असलेल्या वीज मीटर बदलण्याची सक्ती थांबवा ग्राहकांना निवडीचा अधिकार: अखिल भारतीय ग्राहक पंचायत
अमळनेर:- महावितरण कडून वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविण्याबाबत एसएमएस व इतर माध्यमातून सूचना दिल्या जात असून ग्रामीण भागातील ग्राहकांमध्ये संभ्रम व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुस्थितीत असलेले अचूक रीडिंग देणारे विद्यमान मीटर बदलून स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती करू नये, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत, मध्य महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष बाळासाहेब औटी यांनी केली आहे.
वीज ग्राहक हा सेवाग्राही असून त्याला योग्य माहिती, पारदर्शकता आणि निवडीचा अधिकार मिळणे आवश्यक आहे. वीज कायदा 2003, ग्राहक संरक्षण कायदा 2019 आणि संविधानिक अधिकारांचा विचार करूनच कोणतेही प्रक्रिया राबविणे गरजेचे आहे, असे औटी यांनी सांगितले.
वीज ग्राहकांनी काय करावे ?
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने वीज ग्राहकांना आवाहन केले आहे की, आपले सध्याचे मीटर व्यवस्थित चालू असेल व योग्य रीडिंग घेत असेल तर त्याची नोंद ठेवावी. स्मार्ट मीटर बसविण्यापूर्वी महावितरण कडून लेखी माहिती व स्पष्टीकरण मागावे. कोणतेही सक्ति किंवा दबाव निर्माण झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांकडे लेखी अर्ज करावा ग्राहकांनी आपल्या हक्कांबाबत जागरूक राहावे व कोणतीही कारवाई कायदेशीर मार्गाने करावी.
” महावितरणच्या भूमिकेबाबत ग्राहक पंचायतीची भूमिका “
स्मार्ट मीटर तंत्रज्ञानाबाबत ग्राहकांना योग्य माहिती, सुरक्षा व्यवस्था, तपासणी सुविधा, डेटा संरक्षण आणि भविष्यातील आर्थिक परिणाम याबाबत स्पष्टता देणे आवश्यक आहे. ग्राहकांच्या शंकांचे समाधान न करता सक्तीची प्रक्रिया राबविणे योग्य नाही. विशेषतः स्मार्ट मीटर नातवृत्त झाल्यास त्याची निष्पक्ष तपासणी करण्यासाठी मान्यता प्राप्त प्रयोगशाळा पारदर्शक व्यवस्था आणि ग्राहक संरक्षणाची हमी आवश्यक आहे.
” विजय ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करणे ही ग्राहक पंचायतीची भूमिका आहे. तंत्रज्ञानाला विरोध नाही, मात्र ग्राहकांच्या संमतीशिवाय व पुरेशी माहिती न देता कोणतीही सक्ती मान्य केली जाणार नाही. ग्राहकांच्या हक्कांसाठी लोकशाही व कायदेशीर मार्गाने संघर्ष करण्यात येईल “
अखिल भारतीय ग्राहक पंचायत सर्व वीज ग्राहकांना आवाहन करते की त्यांनी घाबरून न जाता जागरूक राहावे आपल्या हक्कांची माहिती घ्यावी आणि कोणती अडचण आल्यास ग्राहक संघटनेची संपर्क साधावा.


दुःखातून समाजप्रबोधनाचा नवा आदर्श! धरणगावातील वाघ परिवाराने सत्यशोधक पद्धतीने पार पाडले उत्तरकार्य; दिवंगत श्रद्धाच्या स्मृतीप्रित्यर्थ १०० गरजू विद्यार्थ्यांना गणवेश, उपस्थितांना ‘शिवाजी कोण होता?’ ग्रंथ भेट
धरणगाव प्रतिनिधी :
धरणगाव : वैयक्तिक दुःखालाही समाजजागृतीची दिशा देत धरणगावातील वाघ परिवाराने एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. पुरोगामी विचारांचे पुरस्कर्ते रमेश व सतिष जगन्नाथ वाघ यांची पुतणी आणि ललिता व आबासाहेब राजेंद्र वाघ यांची कन्या दिवंगत श्रद्धा (ताऊ) हिच्या स्मृतिप्रीत्यर्थ दशपिंड, गंधमुक्ती व उत्तरकार्याचा संपूर्ण विधी सत्यशोधक पद्धतीने पार पाडण्यात आला. अंधश्रद्धा आणि कर्मकांडाला फाटा देत विवेक, समता आणि समाजप्रबोधनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाची धरणगावसह परिसरात मोठी चर्चा होत असून, विविध स्तरांतून वाघ परिवाराच्या या निर्णयाचे कौतुक केले जात आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संत, महापुरुष आणि महामाता यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सत्यशोधक समाजाचे विधीकर्ते शिवदास महाजन यांनी सत्यशोधक समाजाची प्रार्थना म्हणत साधेपणा, विवेक आणि मानवतावादी मूल्यांवर आधारित विधी संपन्न केला. कोणत्याही अनिष्ट चालीरीती, कर्मकांडशिवाय पार पडलेल्या या कार्यक्रमाने उपस्थितांवर सकारात्मक ठसा उमटविला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माळी समाजाचे सचिव आर डी महाजन यांनी केले. तद्नंतर सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी. डी. पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, ” महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांनी दिलेला समता, शिक्षण आणि विज्ञाननिष्ठ विचारांचा वारसा जपणे ही आजच्या समाजाची गरज आहे. अंधश्रद्धा आणि कर्मकांडापेक्षा मानवसेवा, शिक्षण आणि सामाजिक परिवर्तन हाच खरा धर्म आहे. शोषणमुक्त समाज निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने सत्यशोधक विचार स्वीकारले पाहिजेत.”
यावेळी आबासाहेब राजेंद्र वाघ यांनी आपल्या दिवंगत कन्या श्रद्धाच्या पवित्र स्मृतीप्रित्यर्थ आर्थिकदृष्ट्या दुर्बल व होतकरू १०० विद्यार्थ्यांना शालेय गणवेश देण्याची घोषणा केली. त्यांच्या या समाजहिताच्या निर्णयाचे उपस्थितांनी उत्स्फूर्त स्वागत केले. दुःखाचे रूपांतर समाजोपयोगी कार्यात करण्याचा हा संदेश अनेकांच्या मनाला स्पर्शून गेला.
पुरोगामी चळवळीचे नेते तुळशीराम बापू आणि भाजप नेते ॲड. संजय महाजन यांनी आपल्या मनोगतात जगन्नाथ खंडू वाघ यांच्या परिवाराने अनेक वर्षांपासून पुरोगामी, परिवर्तनवादी आणि सत्यशोधक विचारांची परंपरा जपली असून, “बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले” ह्या उक्तीनुसार वाघ परिवाराचे निरंतर कार्य असून, श्रद्धाच्या स्मृतीतून समाजासाठी प्रेरणादायी कार्य करण्याचा घेतलेला निर्णय हा संपूर्ण समाजासाठी अनुकरणीय असल्याचे सांगत ॲड. महाजन यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
कार्यक्रमातील आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम म्हणजे उपस्थित सर्वांना ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता?” या विचारप्रवर्तक १०० ग्रंथाचे मोफत वितरण करण्यात आले. वाचनसंस्कृती, विवेकवादी विचार आणि सामाजिक प्रबोधनाचा संदेश अधिक व्यापकपणे पोहोचावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
याप्रसंगी शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ, भाजप नेते ॲड. संजय महाजन, ॲड. व्ही.एस.भोलाणे, शिवसेना नेते पी. एम. पाटील, नगरसेवक विनय भावे, गटनेते कैलास माळी, नगरसेवक लक्ष्मणराव पाटील, लक्ष्मण महाजन, हेमंत महाजन, किरण अग्निहोत्री, भूषण धनगर, महेंद्र तायडे, भरत शिरसाठ, गुलाब महाजन, हरी महाजन, महेंद्र महाजन, राहुल रोकडे, रामकृष्ण चौधरी, गोरख देशमुख, हेमंत माळी, कविराज पाटील, प्रल्हाद महाजन, दिनेश महाजन, मयुर भामरे यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, क्रीडा, साहित्य, राजकीय क्षेत्रातील मान्यवर, विविध संघटनांचे पदाधिकारी, आप्तेष्ट आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिवंगत श्रद्धाच्या स्मृतीतून समाजसेवा, विवेकवाद, शिक्षण आणि समतेचा संदेश देणारा हा उपक्रम केवळ एका कुटुंबाचा वैयक्तिक कार्यक्रम न ठरता समाजाला नवी दिशा देणारा आणि परिवर्तनवादी विचारांना बळ देणारा ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.



