रोटरी क्लब अमळनेरतर्फे डॉक्टर्स डे व सीए डे निमित्त अभिष्टचिंतन
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 6 hours ago
खान्देशातील वारकऱ्यांसाठी आषाढी एकादशीनिमित्त उधना–मिरज विशेष रेल्वे; खासदार स्मिता वाघ
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 6 hours ago
अमळनेरात पोलिसांची मोठी कारवाई, भल्या पहाटे राबविले कोंबिंग ऑपरेशन
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 1 day ago
अमळनेर मुसळधार पाऊस, पिंपळे रस्त्यावर साचले पाणीच पाणी
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 2 days ago
संत सखाराम महाराज वाडीला भीषण आग, संकटाचा क्षणी हिंदू- मुस्लिम ऐक्याचे दर्शन
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 2 days ago
समाजसेवेचा गौरवशाली सोहळा : लायन्स क्लब अमळनेरकडून डॉक्टर, सीए आणि प्रगतशील शेतकऱ्यांचा भव्य सत्कार
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 3 days ago
Top 10 News
रोटरी क्लब अमळनेरतर्फे डॉक्टर्स डे व सीए डे निमित्त अभिष्टचिंतन
खान्देशातील वारकऱ्यांसाठी आषाढी एकादशीनिमित्त उधना–मिरज विशेष रेल्वे; खासदार स्मिता वाघ
अमळनेरात पोलिसांची मोठी कारवाई, भल्या पहाटे राबविले कोंबिंग ऑपरेशन
अमळनेर मुसळधार पाऊस, पिंपळे रस्त्यावर साचले पाणीच पाणी
संत सखाराम महाराज वाडीला भीषण आग, संकटाचा क्षणी हिंदू- मुस्लिम ऐक्याचे दर्शन
समाजसेवेचा गौरवशाली सोहळा : लायन्स क्लब अमळनेरकडून डॉक्टर, सीए आणि प्रगतशील शेतकऱ्यांचा भव्य सत्कार
महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
महात्मा फुले जन्म द्विशताब्दी वर्षानिमित्त अमळनेरमध्ये वर्षभर ‘विशेष वक्ता’ उपक्रम महात्मा फुले यांच्या विचारांचा जागर; प्रत्येक सहभागीला प्रमाणपत्र, बक्षीस व सन्मान
अमळनेर, प्रतिनिधी : “गुलामगिरीतून मुक्त व्हा” असा क्रांतिकारी संदेश देणारे समाजक्रांतिकारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जन्म द्विशताब्दी वर्षानिमित्त (2026–2027) युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेर यांच्या वतीने वर्षभर ‘विशेष वक्ता’ हा अभिनव आणि प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात येणार आहे. हा उपक्रम 5 जुलै 2026 पासून सुरु होणार आहे.
एप्रिल 2027 पर्यंत प्रत्येक रविवारी महात्मा फुले यांच्या जीवनकार्य, सामाजिक क्रांती आणि विचारांचा अभ्यास करून त्यावर आधारित 10 मिनिटांचे प्रभावी मनोगत सादर करणाऱ्या प्रत्येक सहभागीचा विशेष प्रमाणपत्र, आकर्षक बक्षीस आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी पाच मिनिटांचा कालावधी ठेवण्यात आला आहे.
या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे ही स्पर्धा नसून पहिलीतील विद्यार्थ्यांपासून ते 90 वर्षांपर्यंतचे ज्येष्ठ नागरिक यामध्ये सहभागी होऊ शकतात. सहभागी होणाऱ्या प्रत्येकाची अमळनेर तालुक्यात ‘विशेष वक्ता’ म्हणून नोंद करण्यात येणार असून, भविष्यात विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व प्रबोधनपर कार्यक्रमांमध्ये वक्ता म्हणून संधी उपलब्ध करून देण्याचा प्रतिष्ठानचा मानस आहे.
उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी दर रविवारी सकाळी 9.30 वाजेपर्यंत ‘अभ्यासिका’, प्रा. अशोक पवार, 28, विठ्ठल नगर, पिंपळे रोड, अमळनेर येथे उपस्थित राहावे. या उपक्रमासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नसून समाजातील सर्व घटकांनी या ऐतिहासिक उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अशोक पवार यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : 9422278256


रोटरी क्लब अमळनेरतर्फे डॉक्टर्स डे व सीए डे निमित्त अभिष्टचिंतन
अमळनेर, दि. १ जुलै २०२६ – रोटरी क्लब अमळनेरच्या वतीने १ जुलै रोजी डॉक्टर्स डे व सीए डे निमित्त शहरातील मान्यवर डॉक्टर व चार्टर्ड अकाउंटंट यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ. राहुल मुठ्ठे डॉ. कौस्तुभ वानखेडे, डॉ. प्रसन्ना जोशी, डॉ. शरद बाविस्कर, डॉ. जी.एम. पाटील, डॉ. विशाल जोशी, डॉ. प्रीतम जैन, डॉ. किरण बडगुजर, डॉ. अनिल वाणी, डॉ. सौरभ जैन, डॉ. निलेश जैन या डॉक्टरांसह सीए आकाश वर्मा, कीर्ती कोठारी, यांचा गौरव करण्यात आला.
कोरोना काळापासून आजपर्यंत अहोरात्र सेवा देणाऱ्या डॉक्टरांच्या कार्याला सलाम करण्यासाठी आणि आर्थिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या सीएंना प्रोत्साहन देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी नूतन अध्यक्ष महेश पाटील व नूतन सचिव , उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, चेलारामसैनानी, सनी कोठारी ,कीर्ती कुमार कोठारी, अविनाश अमृतकर,प्रतीक शाह विनोद थोरात आदि रोटरी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते .अशी बातमी मकसूद बोहरी कळवितात.


खान्देशातील वारकऱ्यांसाठी आषाढी एकादशीनिमित्त उधना–मिरज विशेष रेल्वे; खासदार स्मिता वाघ
जळगांव,प्रतिनिधी : आषाढी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या खान्देशातील वारकऱ्यांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने उधना–मिरज–उधना विशेष रेल्वे (क्र. 09071/09072) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघातील वारकरी, भाविक व प्रवाशांच्या सोयीसाठी ही विशेष रेल्वे सुरू करण्यात यावी, यासाठी खासदार स्मिताताई वाघ यांनी रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळाल्याने आषाढी वारीसाठी ही विशेष रेल्वे उपलब्ध झाली आहे.
रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, क्र. (09071)उधना–मिरज विशेष ही गाडी 23 व 24 जुलै 2026 रोजी उधना येथून सकाळी 6.45 वाजता सुटणार आहे. तर क्र. (09072) मिरज–उधना विशेष ही गाडी 24 व 25 जुलै 2026 रोजी मिरज येथून सकाळी 8.40 वाजता उधनाकडे प्रस्थान करणार आहे. या विशेष रेल्वेच्या स्लीपर वर्गाचे आरक्षण 4 जुलै 2026 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होणार असून, वारकरी व प्रवाशांनी वेळेत आरक्षण करून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ही विशेष रेल्वे उधना, बारडोली, व्यारा, नवापूर, नंदुरबार, दोंडाईचा, सिंदखेडा, नरडाणा, अमळनेर, धरणगाव, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड, कुर्डुवाडी, पंढरपूर मार्गे मिरज अशी धावणार असून, या गाडीला एकूण 24 डबे असतील.
आषाढी वारीसाठी जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण खान्देशातील हजारो वारकऱ्यांना या विशेष रेल्वेचा मोठा लाभ होणार आहे. त्यामुळे भाविकांनी वेळेत आरक्षण करून आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. खासदार स्मिताताई वाघ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही विशेष रेल्वे सुरू झाल्याने खान्देशातील वारकरी, भाविक व नागरिकांनी समाधान व्यक्त करत त्यांचे आभार मानले आहेत.



