ढोल-ताशांच्या गजरात माहेरवाशिणींचे औक्षणासह स्वागत! गजरा, मेंदी, बांगड्यांच्या साजशृंगाराने नटल्या अमळनेरच्या लेकी
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 11 minutes ago
सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ. मोहन बच्छाव यांचा ‘आरोग्यरत्न’ पुरस्काराने गौरव
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 15 minutes ago
गांधली या गावात बाल वाङ्मय विभागाचा शुभारंभ; रोटरीतर्फे विद्यार्थ्यांना वाचनाचे आवाहन
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 1 day ago
ईद मिलादुन्नबी निमित्त मानवतेचा संदेश; अमळनेरमध्ये रुग्ण व गरजूंना फळवाटप
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 2 days ago
अमळनेरचे सुप्रसिद्ध सर्जन डॉ. अनिल शिंदे यांना ‘आरोग्य रत्न २०२६’ पुरस्कार
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 2 days ago
महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
अमळनेर नगरपरिषद अंतर्गत पथविक्रेता तक्रार निवारण व विवाद निर्णय समिती स्थापन अध्यक्षपदी न्यायाधीश व्ही.ए.वाजे तर सदस्यपदी नितीन कोल्हे व चेतन राजपुत
अमळनेर:-जिल्हाधिकारी जळगाव यांचेमार्फत अमळनेर नगरपरिषद अंतर्गत “पथविक्रेता तक्रार निवारण व विवाद निर्णय समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीत अध्यक्षपदी न्या.व्ही.ए.वाजे(सह. दिवानी न्यायाधीश कनिष्ठ स्तर अमळनेर) तर सदस्य पदी अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत व मॉडर्न इन्स्टिट्यूटचे संचालक नितीन कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
याबाबत जळगाव जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे पत्र अमळनेर नगरपरिषदेला दिनांक 26 ऑगस्ट 2026 रोजी प्राप्त झाले आहे.या समितीचा कार्यकाळ 5 वर्षाचा असणार आहे.दरम्यान
पथविक्रेता (उपजीविकेचे संरक्षण व पथविक्रीचे विनियमन) अधिनियम, 2014 अंतर्गत प्रत्येक स्थानिक प्राधिकरणासाठी “तक्रार निवारण व विवाद निर्णय समिती” गठीत करण्यासंदर्भात मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी दिलेले आदेश.महाराष्ट्र शासन, नगरविकास विभागाचा शासन निर्णय यां अनुषंगाने सदर समिती गठीत करण्यात आली आहे.
केंद्र शासनाने पथविक्रेता (उपजीविकेचे संरक्षण व पथविक्रीचे विनियमन) अधिनियम, 2014 दिनांक 05 मार्च 2014 रोजी लागू केला असून, सदर अधिनियमाच्या कलम 36(1) अन्वये महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र पथविक्रेता (उपजीविकेचे संरक्षण व पथविक्रीचे विनियमन) नियम, 2016 दिनांक 03 ऑगस्ट 2016 रोजी अधिसूचित केले आहेत.सदर अधिनियमाच्या कलम 20 तसेच महाराष्ट्र पथविक्रेता (उपजीविकेचे संरक्षण व पथविक्रीचे विनियमन) नियम, 2016 मधील नियम 3 व 4 नुसार प्रत्येक स्थानिक प्राधिकरणासाठी “तक्रार निवारण व विवाद निर्णय समिती” स्थापन करणे आवश्यक आहे.त्यानुषंगाने, मा. उच्च न्यायालयाने दिलेले आदेश तसेच शासनाच्या निर्देशांची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने जळगाव जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद/नगरपंचायतींसाठी ही स्वतंत्र “तक्रार निवारण व विवाद निर्णय समिती” गठीत करण्यात आली आहे.


ढोल-ताशांच्या गजरात माहेरवाशिणींचे औक्षणासह स्वागत! गजरा, मेंदी, बांगड्यांच्या साजशृंगाराने नटल्या अमळनेरच्या लेकी
अमळनेर : माहेरच्या अंगणातील बालपणीच्या आठवणींना उजाळा देत, सासर-माहेर दोन्ही कुटुंबांना आपल्या कर्तृत्वाने आणि मायेने समृद्ध करणाऱ्या अमळनेरच्या लेकींचा स्नेहमेळा अर्थात ‘माहेरचा पारिजात’ या उपक्रमाची आज शनिवार, दि. 29 ऑगस्ट रोजी श्री मंगळग्रह मंदिरात सकाळच्या मंगलमय आणि अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात सुरूवात झाली. आजपासून तीन दिवस अर्थात सोमवार, दि. 31 ऑगस्ट 2026 पर्यंत रंगणाऱ्या या स्नेहमेळ्याचे येथील अमळनेर महिला मंच ट्रस्टतर्फे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी मंगळग्रह सेवा संस्थेचे त्यांना विशेष सहकार्य लाभले आहे.
माहेरच्या अंगणात जाऊन पुनश्च बालपण अनुभवता यावे, जुन्या आठवणींना उजाळा मिळावा आणि मैत्रिणींसोबत मनमोकळेपणाने गप्पागोष्टींची मैफल रंगावी, हा या स्नेहमेळ्याचा मुख्य उद्देश आहे.
या स्नेहमेळ्यांतर्गत सकाळी नऊ वाजता अमळनेर महिला मंच ट्रस्टतर्फे माहेरवाशिणींचे हळद-कुंकवाने औक्षण करीत ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांना मोत्यांचे दागिने व गजरे भेट देण्यात आले. त्यानंतर श्री मंगळग्रह देवांची सामूहिकरित्या महाआरती झाली. साडेनऊ वाजता सर्व माहेरवाशिणींनी एकत्रित येत स्वयंपरिचय करून दिला. त्यानंतर सर्वांच्या हातावर कु. आकांक्षाताई, मयुरीताई व दीप्तीताई यांनी मेंदी रेखाटून त्यांना सौ. पूजाताई मोराणकर यांनी बांगड्यांसह सौभाग्याचे वाण देण्यात आले. दुपारी सव्वाबारा वाजता सर्व माहेरवाशिणींनी श्री मंगळग्रह देवांचा सामूहिक महाअभिषेक केला. तसेच पाहुणचार अर्थात खानदेशची खासियत असलेले पुरणपोळीचे भोजन घेतले. त्यानंतर दोन ते तीन या वेळेत सागर गोटे, काचा-कवड्या, चौपट, आट्यापाट्या, तळ्यात-मळ्यात, उभा खो-खो आदी पारंपरिक खेळ खेळण्यात आले. यावेळी माहेरवाशिणींनी झोक्यांवर बसून गाणी गात खऱ्या अर्थाने माहेरचा आनंद लुटला. सायंकाळी साडेपाच वाजता सामूहिक चहापानानंतर श्री मंगळग्रह देवांची सामूहिक सायंआरती करण्यात आली. त्यानंतर खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, शहर विकास आघाडीच्या गटनेत्या सौ. जयश्रीताई पाटील व मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या प्रमुख उपस्थितीत अमळनेरच्याच माहेरवाशिणी सहाय्यक कर निरीक्षक सौ. हर्षाताई साळुंखे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यानंतर सामूहिकरित्या मंगळागौरचे खेळ खेळण्यात आले. त्यानंतर रात्री उशिरा सामूहिक भोजनानंतर आजच्या दिवसाची सांगता झाली.
यावेळी अमळनेर महिला मंच ट्रस्टच्या अध्यक्षा सौ. कांचनताई शहा, उपाध्यक्षा सौ. तिलोत्तमाताई पाटील, सौ. सरोजताई भांडारकर, सचिव सौ. वसुंधराताई लांडगे व कोशाध्यक्षा प्रा. सौ. शीलाताई पाटील यांच्यासह कार्यकारी मंडळातील सदस्या उपस्थित होते.


सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ. मोहन बच्छाव यांचा ‘आरोग्यरत्न’ पुरस्काराने गौरव
सिन्नर : सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय, समर्पित आणि परिणामकारक कार्य केल्याबद्दल सिन्नर पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन सिताराम बच्छाव यांना प्रतिष्ठेच्या ‘पुढारी आरोग्यरत्न पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री माननीय प्रकाशजी आबिटकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
ग्रामीण व सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत कार्यरत राहून नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे, आरोग्यविषयक विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करणे तसेच आरोग्य यंत्रणेला अधिक सक्षम करण्यासाठी डॉ. बच्छाव यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हा सन्मान देण्यात आला.
आरोग्य क्षेत्रातील त्यांच्या सातत्यपूर्ण योगदानाबद्दल मिळालेला हा पुरस्कार त्यांच्या कार्याची पोचपावती मानली जात आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत जबाबदारीने कार्य करताना लोकाभिमुख आरोग्यसेवेला प्राधान्य देणाऱ्या डॉ. बच्छाव यांच्या या गौरवामुळे सिन्नर तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
या पुरस्काराबद्दल डॉ. मोहन सिताराम बच्छाव यांचे आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, सहकारी, मित्रपरिवार तसेच विविध स्तरांतून अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

