अमळनेरकरांसाठी आनंदाची बातमी: भाविक आणि प्रवाशांच्या सुविधेसाठी ‘मंगळग्रह मंदिर स्टॉप’ एसटी विनंती थांब्याचे अनावरण!
अमळनेर (प्रतिनिधी) : ग्रामीण व शहरी भागातील प्रवाशांची, विशेषतः सुप्रसिद्ध मंगळग्रह मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांची आणि स्थानिक नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. एसटी महामंडळाची बस या ठिकाणी थांबून प्रवाशांना योग्य सुखसुविधा मिळावी या उद्देशाने आज या भागात ‘मंगळग्रह मंदिर स्टॉप’ (एसटी विनंती थांबा) चे अधिकृत बोर्ड लावून लोकार्पण करण्यात आले.
हे जनहिताचे काम युवासेना शिवसेना अमळनेर शहर तीर्थक्षेत्र प्रमुख मा. श्री. मनिष हरिश्चंद्र चौधरी यांच्या प्रमुख पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले आहे. नागरिकांना आणि भाविकांना येण्या-जाण्यासाठी हक्काचा थांबा मिळावा यासाठी मनिषभाऊंनी विशेष लक्ष देऊन हा प्रश्न मार्गी लावला.
प्रमुख मान्यवरांची उपस्थिती
याप्रसंगी गावातील आणि परिसरातील प्रमुख नागरिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कामात मोलाचे सहकार्य आणि उपस्थिती लाभलेले मान्यवर खालीलप्रमाणे:
१) श्री. मनिष हरिश्चंद्र चौधरी (युवासेना शिवसेना अमळनेर शहर तीर्थक्षेत्र प्रमुख)
२) श्री. मोहन मनोरे (आम आदमी पार्टी)
३) श्री. महेंद्र साळुंखे (भाग्यलक्ष्मी लॅब, आम आदमी पार्टी)
४) श्री. रामकृष्ण चिंतामण पाटील – देवरे साहेब (आम आदमी पार्टी)
५) श्री. राजेंद्र बाळकृष्ण जाधव
६) श्री. नागोराज राजाराम धनगर
७) श्री. अमोल नागोराज धनगर
८) श्री. हितेश चौधरी
९) श्री. इंजि. निखिल चौधरी
प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा
या नवीन ‘मंगळग्रह मंदिर स्टॉप’ मुळे आता परिसरातील प्रवाशांना, महिलांना, वृद्ध नागरिकांना आणि दूरवरून येणाऱ्या भाविकांना बससाठी ताटकळत उभे राहावे लागणार नाही. प्रवाशांच्या सुखसुविधेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे आणि मनिषभाऊ चौधरी यांचे समस्त अमळनेरकर नागरिकांकडून मनःपूर्वक आभार व्यक्त केले जात आहेत.
“लोकांचे हित, हेच आमचे कर्तव्य!” या भावनेतून हे कार्य पूर्ण झाल्याचे याप्रसंगी कार्यकर्त्यांनी सांगितले.


