ब्रेकिंग
खा शि मं. श्रीमती द्रौ ,रा. कन्या शाळेत आंतरराष्ट्रीय आॕलिम्पिंक दिवस साजरा …

 

अमळनेर : नामवंत खा.शि मं संचलित श्रीमती द्रौपदीबाई रामचंद्रशेठ कन्या शाळेत आज २३ जुन हा दिवस आंतरराष्ट्रीय आॕलिम्पिंक दिवस म्हणुन साजरा करण्यात आला.

   या वेळी कार्यक्रम अध्यक्ष स्थानी विदयालयाच्या मुख्याध्यापिका सौ एस एस सुर्यवंशी मॕडम होत्या.तर या वेळी माधुरी राणे प्राथ.शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती भारती आठवले मॕडम , पर्यवेक्षक श्री एस पी वाघ सर , शिक्षक प्रतिनिधी सौ पी पी जोशी ,जेष्ठ शिक्षक श्री एस एस माळी , जेष्ठ क्रीडा शिक्षिका श्रीमती आर एस सोनवणे , जेष्ठ शिक्षक श्री के आर बाविस्कर , श्रीमती एस एस देवरे यांनी आॕलिम्पिंक सुवर्ण पदक प्राप्त करुन देशाचा मान वाढवणारे मेजर ध्यांनचंद यांच्या प्रतिमेचे व क्रीडा साहित्यांचे पुजन करुन मशाल पेटवुन आजचा दिवस साजरा करण्यात आला.

    या निमित्ताने शाळेत जंम्प रोप व धावण्यांच्या स्पर्धा घेण्यात आल्या.शाळेच्या मुख्याध्यापिका सौ एस एस सुर्यवंशी मॕडमांनी आॕलिम्पिंक दिवसा विषयी बोलतांना सांगितले की ,पहिला आलिम्पिंक दिवस २३ जुन 1948ला साजरा करण्यात आला होता. जगातील अतिशय महत्वांची स्पर्धा आॕलिम्पिंक स्पर्धा आहे. ह्या दर चार वर्षांनी होतात. जगात खेळाचे महत्व वाढावे व सर्व जगाने गुणा गोविंदाने वागावे आॕलिम्पिंक दिन प्रामुख्याने हलका , शिका आणि शोधा तीन स्तंभावर आधारीत आहे.निरोगी जीवन शैलीला प्रोत्साहन देणारी व दैनंदिन व्यायामाला महत्त्व देणारी आॕलिम्पिंक स्पर्धा आहे.भारता मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जेचे खेळाडू तयार व्हावेत.त्यांनीआपल्या देशाचे प्रतिनिधीत्व वेग वेगळ्या खेळात करावे या अनुषंगाने शालेय स्तरावर विद्यार्थीची खेळा प्रती आवड व रुची वाढावी व येणाऱ्या काळात- अधीका अधीक पदके भारताने जिंकावीत हा एक उदात्त भावना यामागे दडलेली आहे.खेळामध्ये अधीका अधीक विद्यार्थीनींनी सहभाग नोंदवित त्यांनी येणाऱ्या काळात खेळाला सुगीचे दिवस प्राप्त झालेले असेल अशी सामुहीक शपथ घेतली.या कार्यक्रमाचे प्रास्तवीक संयोजन नियोजन संकल्पना पर्यवेक्षक ,श्री एस पी वाघ सरांनी केले.

या स्पर्धेतुन अनेक खेळ खेळुन खेळ भावना , स्नेह आप आपली संस्कृती जोपासली जाते असे विद्यार्थीनींना आपल्या भाषनातुन सांगितले.

    सदर कार्यक्रमासाठी अनमोल सहकार्य शालेय समिती चेअरमन श्री जितेंद्र भाऊ जैन , व सर्व शिक्षक , शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी यांचे लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *