ब्रेकिंग
जनआक्रोश आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमळनेरचे भाजीपाला मार्केट उद्या बंद! कत्तलखाना कायमस्वरूपी बंद करण्याच्या मागणीला भाजीपाला असोसिएशनचा पाठिंबा; शेतकऱ्यांनी माल विक्रीस आणू नये

 

अमळनेर (प्रतिनिधी) : येथील कत्तलखाना कायमस्वरूपी बंद करावा, यासह विविध मागण्यांसाठी विश्व हिंदू परिषद व बजरंग दल, अमळनेर यांच्या वतीने उद्या शुक्रवार, दि. २७ नोव्हेंबर २०२६ रोजी जनआक्रोश आंदोलन व बेमुदत आमरण उपोषण करण्यात येणार आहे. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून अमळनेर येथील भाजीपाला मार्केट उद्या बंद ठेवण्याचा निर्णय भाजीपाला असोसिएशनने घेतला आहे.

 

या निर्णयानुसार उद्या भाजीपाला लिलाव मार्केटही पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपला भाजीपाला विक्रीसाठी मार्केटमध्ये आणू नये, असे आवाहन किरकोळ भाजीपाला विक्रेता असोसिएशन व भाजीपाला अडत असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या निर्णयामुळे उद्या अमळनेरच्या भाजीपाला बाजारपेठेतील व्यवहार बंद राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *