ब्रेकिंग
स्व. परेश भाऊ सोनवणे स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेचा २६ नोव्हेंबरपासून थरार! पराग स्पोर्ट्सतर्फे प्रताप कॉलेज मैदानावर भव्य आयोजन; सहा संघांचा सहभाग

 

अमळनेर प्रतिनिधी : पराग स्पोर्ट्सतर्फे स्वर्गीय परेश भाऊ सोनवणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, दि. २६ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता प्रताप कॉलेज मैदान, अमळनेर येथे या स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे.

 

या स्पर्धेला प्रमुख उपस्थिती म्हणून उद्योगपती गिरीश जैन (चेन्नई), भावेश जैन (मनुदेवी कोल्ड स्टोरेज व अन्वी ट्रेडर्स), आकाश पवार (कुसुमाई बिझनेस ग्रुप), सामाजिक कार्यकर्ते शरद सोनवणे, प्रा. डॉ. हर्षवर्धन जाधव (प्रताप कॉलेज), योगेश मुंदडे (संचालक, खानदेश शिक्षण मंडळ) आणि अक्षय चव्हाण (ए.के. कन्स्ट्रक्शन) उपस्थित राहणार आहेत.

 

या स्पर्धेत महात्मा फुले क्रिकेट क्लब, एन.बी. ब्लास्टर, बाहुबली चॅम्पियन, पवार अँड सन्स, महावीर अवेंजर्स आणि शिवराणा इलेव्हन असे सहा संघ सहभागी होणार आहेत.

 

क्रिकेटप्रेमींना दर्जेदार सामन्यांचा आनंद घेता यावा आणि स्वर्गीय परेश भाऊ सोनवणे यांच्या स्मृती जपता याव्यात, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अमळनेरमधील क्रिकेटप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन पराग स्पोर्ट्सतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *