ब्रेकिंग
केशवनगरमध्ये महिन्यांपासून पाण्याची गळती; नगरपालिकेचे दुर्लक्ष पाणीटंचाईच्या काळात लाखो लिटर पाणी वाया; नागरिकांत संताप

 

अमळनेर (प्रतिनिधी) : अमळनेर शहरातील केशवनगर भागात सोनार सर यांच्या घराजवळ गेल्या अनेक महिन्यांपासून पाणीपुरवठ्याच्या पाइपलाइनला गळती लागली असून, दररोज मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. वारंवार नगरपालिकेच्या निदर्शनास आणूनही अद्याप दुरुस्ती न झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

एकीकडे शहरातील अनेक भागांत पाणीटंचाई जाणवत असताना दुसरीकडे हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहून जात असल्याचे चित्र आहे. पाण्याची नासाडी थांबविण्यासाठी प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना होणे अपेक्षित असताना संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

 

नगरपालिका प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून पाइपलाइनची गळती कायमस्वरूपी बंद करावी. तसेच इतक्या महिन्यांपासून दुरुस्ती का झाली नाही, याची चौकशी करावी, अशी मागणी केशवनगर परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *