ब्रेकिंग
श्री मंगळग्रह मंदिर डिजिटल नोटीस बोर्डची यशस्वी चाचणी! आधुनिक तंत्रज्ञानाच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल!

 

अमळनेर : येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिरातील डिजिटल नोटीस बोर्डसाठी शनिवार, दि. २१ नोव्हेंबर २०२६ रोजी अँड्रॉईड टीव्हीवर पर्मनन्ट ऑटो कंट्रोल ॲप इन्स्टॉल करण्यात आले. मंदिराच्या या व्यवस्थेसाठी ‌‘मंगल टीव्ही ॲप‌’ वापरण्यात येत आहे. या ॲपच्या माध्यमातून मंदिरातील विविध माहिती टीव्ही स्क्रीनवर प्रदर्शित करणे सुलभ झाले आहे.

 

ॲपद्वारे उपलब्ध केलेली माहिती व सुविधा

१) मंदिरातील डिजिटल नोटीस व महत्त्वाच्या सूचना

२) महाप्रसाद काऊंटिंग व प्रतीक्षा माहिती

३) अभिषेक पूजा बुकिंग व वेटिंग

४) हवनात्मक शांतीपूजा वेटिंग

५) विविध पूजा व धार्मिक विधींची माहिती

६) जाहिराती व प्रायोजकांची माहिती

७) यु-ट्यूब व्हिडिओ व इतर व्हिडिओ लिंक्स

८) मंदिराशी संबंधित विविध डिजिटल माहिती

आज मंदिरासमोरील टीव्हीवर या ॲपची प्रत्यक्ष चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाली असून, ॲप व्यवस्थित कार्यरत असल्याचे दिसून आले. यामुळे मंदिरातील भाविकांना आवश्यक माहिती एकाच ठिकाणी डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे पडले आहे. मंदिर व्यवस्थापन अधिक आधुनिक, सुसूत्र आणि तंत्रज्ञानाधारित करण्याचा हा एक महत्त्वाचा प्रयत्न आहे, असे मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे कळविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *