ब्रेकिंग
साने गुरुजी विद्यामंदिरमध्ये पहिलीच्या विद्यार्थ्यांना ओळखपत्रांचे वाटप विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ओळखपत्र महत्त्वाचे – मुख्याध्यापक संजीव पाटील

 

अमळनेर, प्रतिनिधी : अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित साने गुरुजी विद्यामंदिर, अमळनेर (जि. जळगाव) येथे इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक संजीव बन्सीलाल पाटील यांच्या हस्ते ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले.

 

शाळेतील इयत्ता पहिलीच्या पाचही तुकड्यांमधील विद्यार्थ्यांना ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक संजीव पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत ओळखपत्र दररोज शाळेत सोबत आणण्याचे आवाहन केले. ओळखपत्र हे केवळ विद्यार्थ्यांची ओळख दर्शविणारे साधन नसून त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. शाळेत येताना आणि जाताना विद्यार्थ्यांची ओळख पटविण्यासाठी ओळखपत्र उपयुक्त ठरते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

या कार्यक्रमाला इन्चार्ज मुख्याध्यापिका सौ. गीतांजली घोरपडे, इन्चार्ज मुख्याध्यापक श्री. योगेश मोरे, शाळा शिक्षक प्रतिनिधी श्री. संजय जगताप, श्री. अनिल पाटील, श्री. पंडित क्षीरसागर, श्रीमती पूजा सरनाईक, श्री. धीरज कोठवाल, श्री. विजय निकम, श्रीमती अभिलाषा तायडे, श्री. बापुराव पाटील (ठाकरे) तसेच श्रीमती स्नेहल लांडगे उपस्थित होते.

 

विद्यार्थ्यांमध्ये शालेय शिस्त, जबाबदारी आणि सुरक्षिततेविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *