🏆 राज्यस्तरीय “सर्वोत्कृष्ट गृह संकुल” पुरस्काराने ग्रामपंचायत गांधलीचा गौरव
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 2 days ago
Top 10 News
🏆 राज्यस्तरीय “सर्वोत्कृष्ट गृह संकुल” पुरस्काराने ग्रामपंचायत गांधलीचा गौरव
हॉटेल चिन्मय ला लागली आग, शेतातील चारा जळून खाक
अमळनेर तालुक्यात उष्णतेचा कहर पाच जणांचा उष्माघाताने मृत्यू : प्रशासन सतर्क
अमळनेर नगरपालिकेचा पाणीपुरवठा उशिराने होणार
पाणीप्रश्नी आमदारांवर गंभीर आरोप; “अमळनेरकरांची दिशाभूल करून पाणी अडविण्याचे राजकारण”
महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
खरीप हंगाम तोंडावर; एटीएममध्ये ‘कॅश’चा दुष्काळ, शेतकरी हवालदिल किसान काँग्रेसचे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; अग्रणी बँकेला तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश
जळगाव : खरीप हंगाम अगदी तोंडावर आला असताना आणि शेतातील कामांना वेग आला असताना जिल्ह्यातील बहुतांश एटीएममध्ये पैशांचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. पीक कर्ज मंजूर होऊनही प्रत्यक्ष हातात रोकड मिळत नसल्याने खते, बियाणे खरेदीसह शेतीची अनेक कामे रखडली असून शेतकरी अक्षरशः हवालदिल झाला आहे. या गंभीर प्रश्नावर तातडीने तोडगा काढावा, या मागणीसाठी जळगाव जिल्हा किसान काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांना निवेदन देण्यात आले.
दरवर्षीप्रमाणे मार्चअखेर कर्जफेड करून नव्या हंगामाच्या आशेने शेतकरी पीक कर्जाची प्रतीक्षा करत होता. २० एप्रिलनंतर कृषी एटीएम कार्डद्वारे पीक कर्जाचे वाटप सुरू झाले असले, तरी गेल्या महिनाभरापासून शेतकऱ्यांना एटीएमसमोर हेलपाटे मारावे लागत आहेत. अनेक एटीएममध्ये रोख रक्कम उपलब्ध नसते, तर काही ठिकाणी कृषी कार्डच कार्यरत नसल्याच्या तक्रारी आहेत. परिणामी, शेतीसाठी अत्यावश्यक असलेली खते, बियाणे खरेदी आणि उसनवारी फेडणेही कठीण झाले आहे.
विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील अनेक अशिक्षित शेतकऱ्यांना एटीएम व्यवहार करता येत नसल्याने त्यांना पैसे काढण्यासाठी दुसऱ्यांची मदत घ्यावी लागत आहे. काही ठिकाणी तर भाड्याने माणूस सोबत आणण्याची वेळ येत असून, आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांवर अतिरिक्त खर्चाचा बोजा पडत आहे.
या निवेदनाची निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांनी गंभीर दखल घेत तात्काळ जिल्ह्याची अग्रणी बँक असलेल्या सेंट्रल बँकेचे व्यवस्थापक सुनील दोहरे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला. एटीएममधील रोकड टंचाईचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
यानंतर किसान काँग्रेसच्या शिष्टमंडळाने अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांची भेट घेत शेतकऱ्यांच्या अडचणींचे सविस्तर निवेदन सादर केले. यावेळी बँक प्रशासनाने, “रिझर्व्ह बँकेकडे पुरेशा कॅशची मागणी करण्यात आली असून लवकरच परिस्थिती सुधारेल,” असे आश्वासन दिले.
दरम्यान, जिल्हा बँकेमार्फत किमान निम्मे पीक कर्ज तरी थेट रोखीने देण्यात यावे, अशी मागणी किसान काँग्रेसकडून यापूर्वीच करण्यात आली आहे. हे निवेदन जळगाव जिल्हा किसान काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष सुकलाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष दिनेश पवार यांच्यासह पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.


🏆 राज्यस्तरीय “सर्वोत्कृष्ट गृह संकुल” पुरस्काराने ग्रामपंचायत गांधलीचा गौरव
अमळनेर प्रतिनिधी — अमळनेर तालुक्यातील ग्रामपंचायत गांधली यांनी शासनाच्या महा आवास अभियान अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण 2023-24 मध्ये राज्यस्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत “सर्वोत्कृष्ट गृह संकुल” या गटात तृतीय क्रमांकाचा मानाचा पुरस्कार पटकावला आहे. ग्रामपंचायतीच्या या यशामुळे संपूर्ण अमळनेर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
हा प्रतिष्ठेचा पुरस्कार सातारा येथे आयोजित भव्य राज्यस्तरीय सोहळ्यात केंद्रीय मंत्री श्री शिवराजसिंह चौहान, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री श्री शंभूराज देसाई, माननीय उदयनराजे भोसले व माननीय नामदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
सदर पुरस्कार स्वीकारण्यासाठी अमळनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री एन. आर. पाटील, ग्रामपंचायत गांधलीचे प्रथम नागरिक तथा आदर्श सरपंच श्री भैय्यासाहेब नरेंद्र पाटील, ग्रामपंचायत अधिकारी श्री प्रमोद पाटील, श्री गुणवंत सोनवणे व श्री नितीन पाटील उपस्थित होते.
ग्रामपंचायत गांधलीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सरपंच श्री भैय्यासाहेब नरेंद्र पाटील, ग्रामपंचायत अधिकारी श्री प्रमोद पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. गावाच्या विकासासाठी केलेल्या सामूहिक प्रयत्नांना मिळालेली ही राज्यस्तरीय पावती असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
घरकुल योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती करिष्मा नायर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सोमवंशी साहेब तसेच प्रकल्प संचालक लोखंडे साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती करिष्मा नायर यांनी सर्व संबंधितांचे अभिनंदन केले.
गृह संकुल उभारणीच्या कार्यात ग्रामपंचायत गांधली येथील लाभार्थी, ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, घरकुल कक्षातील अभियंते व ऑपरेटर यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या एकजुटीच्या व सामूहिक प्रयत्नांच्या बळावरच ग्रामपंचायत गांधलीला राज्यस्तरावरील हा मानाचा पुरस्कार मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.


