ब्रेकिंग
सरकारने जाचक अटी रद्द करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट ) पक्षाची मागणी  

 

 

 अमळनेर :- राज्य सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेतील जाचक अटी व शर्ती रद्द करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट ) पक्षाने निवेदनाद्वारे केली आहे.

               तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या तीन वर्षातील नैसर्गिक आपत्ती, सततची नापिकी, शेतमालाचे घसरलेले भाव व खतांच्या वाढत्या किमतींमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत जाहीर करण्यात आलेली कर्जमाफी योजनेतील जाचक अटींमुळे लाखो शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता असून ही योजना कर्जमाफी पेक्षा कर्ज वसुलीचे वाटत असल्याचे टीका यावेळी करण्यात आली. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने योजनेतील सर्व जाचक अटी तात्काळ रद्द करून सर्व पात्र शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी लागू करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

               यावेळी पक्षाचे तालुकाध्यक्ष डी एम पाटील, शहराध्यक्ष प्रशांत निकम, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. अशोक पवार, किसान सेल तालुकाध्यक्ष मनोहर पाटील, दिव्यांग सेल जिल्हाध्यक्ष शांताराम कोळी, शहर सरचिटणीस चिंधू वानखेडे, तालुका उपाध्यक्ष वसुदेव मामा, दीपक जगन्नाथ पाटील, पंजाबराव पाटील यांसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *