वावडे येथे वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
अमळनेर : तालुक्यातील वावडे येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत मणिलाल लोटन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
मणिलाल लोटन पाटील हे वावडे हायस्कूलचे सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त वावडे विकास सोसायटीचे चेअरमन दीपक पाटील यांनी आपल्या वडिलांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. या उपक्रमातून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लावण्याचा प्रयत्न केला.
या कार्यक्रमास रडावण येथील लोकनियुक्त सरपंच भैय्यासाहेब पाटील, राजेंद्र प्रल्हाद ठाकरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र फकिरा पाटील, आवास संस्थेचे अध्यक्ष अशफाक शेख, लिलाधर माळी, किशोर ठाकरे यांच्यासह शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता बाबुलाल बिऱ्हाडे, उपशिक्षक समाधान छगन खैरनार, कविता मोतीलाल खैरनार, पाकिजा बाबुलाल पिंजारी आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरतात. वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याच्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.


