ब्रेकिंग
अमळनेरात आज रंगणार हिंदी हास्य व्यंग कवी संमेलन  मराठी वाङ् मय मंडळाचा उपक्रम 

 

अमळनेर ( प्रतिनिधी ) येथील मराठी वाङ् मय मंडळाच्या अमृत महोत्सवानिमित्त हिंदी हास्य व्यंग कवी संमेलन शनिवार दिनांक 23 रोजी रात्री आठ वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजित करण्यात आले आहे.

           या कवी संमेलनात देशभरातील प्रसिद्ध कवी व शायर सहभागी होणार असून त्यामध्ये घनश्याम अग्रवाल ( हास्य – व्यंग अकोला), सरिता सरोज ( गीत गजल नागपूर ), कवीपुष्पक देशमुख ( वीर रस, मुलताई ), कपिल जैन ( यवतमाळ) आणि शायर दीपक मोहिते ( वर्धा) यांचा समावेश आहे.

                 रसिकांच्या मनाला खळखळून हसवणारा, विचारांना हलकेच चिमटे काढणारा आणि साहित्यिक आनंदाची अनुभूती देणारा हा कार्यक्रम अमळनेर करांसाठी खास आकर्षण ठरणार आहे.

             कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, उपाध्यक्ष विवेकानंद भांडारकर, डॉ. रवींद्र कुलकर्णी, कार्यवाह भैय्यासाहेब मगर, प्रा. श्याम पवार, प्रदीप साळवी, कोषाध्यक्ष प्रा. डॉ. उदय देशपांडे, तसेच कार्यकारिणी सदस्य बन्सीलाल भागवत, सोमनाथ ब्रम्हे, स्नेहा एकता रे, संदीप घोरपडे, ऍड. के. व्ही. कुलकर्णी, वसुंधरा लांडगे, डॉ. महेश पाटील, कांचन शहा, प्रा. डॉ. विजयकुमार तुंटे, अजय केले, प्रा. डॉ. सुरेश माहेश्वरी, अनिल सोनार आयोजनात सक्रिय आहेत.

             कार्यक्रमासाठी तिकीट विक्री मराठी वाङ्मय मंडळ च्या कार्यालयात सुरु असून तिकीट दर रुपये 1500, रुपये 1000, रुपये सातशे, आणि रुपये 400 असे ठेवण्यात आले आहेत. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश दिला जाणार असल्याने रसिकांनी आपली जागा त्वरित निश्चित करावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *