ज्ञानदीप अभियानातून १,००० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आधार; आणखी ५० विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेणार
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 19 hours ago
अमळनेरच्या सर्वांगीण विकासासाठी प्रसंगी जीव ओवाळून टाकेल : डॉ. दिगंबर (राजू) महाले
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 2 days ago
अमळनेर नगरपरिषदेत सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर आढावा बैठक संपन्न
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 3 days ago
“युवा वर्गाला रोटरीच्या माध्यमातून मार्गदर्शनाची गरज” -खासदार अॅड. उज्ज्वल निकम
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 4 days ago
महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
वस्त्रकलेचे आद्य निर्माते भगवान श्री जिव्हेश्वर महाराज : साळी समाजाच्या आराध्यदैवताचा जन्मोत्सव आज उत्साहात
अमळनेर | प्रतिनिधी
साळी समाजाचे आराध्यदैवत, वस्त्रकलेचे आद्य निर्माते आणि समाजाचे प्रेरणास्थान असलेल्या भगवान श्री जिव्हेश्वर महाराज यांचा जन्मोत्सव मंगळवार, दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात येत आहे. भगवान श्री जिव्हेश्वर महाराज हे साळी समाजाचे आद्य पुरुष मानले जात असून, त्यांच्या जन्मकथेचा आणि वस्त्रनिर्मितीच्या परंपरेचा समाजाच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाशी अतूट संबंध आहे.
मानवाची लज्जा झाकण्यासाठी भगवान जिव्हेश्वरांची निर्मिती
साळी समाजाच्या श्रद्धेनुसार, सृष्टीच्या निर्मितीनंतर मानवाच्या अंगावर वस्त्र नसल्याने त्याची लज्जा झाकण्याची आवश्यकता निर्माण झाली. मानवाची लज्जा झाकण्यासाठी आणि त्याला वस्त्र उपलब्ध करून देण्यासाठी भगवान शंकरांनी आपल्या जिव्हेतून भगवान श्री जिव्हेश्वर महाराजांची निर्मिती केली, अशी आख्यायिका आहे.
भगवान शंकरांच्या जिव्हेतून निर्माण झालेले भगवान श्री जिव्हेश्वर महाराज हे वस्त्रकलेचे आद्य पुरुष मानले जातात. त्यांनी मानवासाठी वस्त्रनिर्मितीची कला विकसित केली आणि पुढे ही कला समाजाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली. त्यामुळे भगवान जिव्हेश्वर महाराज हे केवळ साळी समाजाचे आराध्यदैवत नसून मानवाची लज्जा झाकण्यासाठी वस्त्रकलेचा पाया घालणारे आद्य पुरुष म्हणून श्रद्धेने स्मरण केले जातात.
वस्त्रकलेला मिळाले धार्मिक आणि सांस्कृतिक अधिष्ठान
वस्त्र ही मानवाची मूलभूत गरज आहे. शरीराचे संरक्षण करण्याबरोबरच मानवी प्रतिष्ठा आणि लज्जेचे रक्षण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य वस्त्र करते. त्यामुळे वस्त्रनिर्मितीची कला ही केवळ उपजीविकेचे साधन नसून मानवसेवेशी जोडलेली पवित्र कला असल्याचे भगवान श्री जिव्हेश्वर महाराजांच्या परंपरेतून दिसून येते.
विणकाम, हातमाग आणि वस्त्रनिर्मितीची कला पिढ्यान्पिढ्या पुढे चालत आली. आपल्या कष्ट, कौशल्य आणि मेहनतीच्या जोरावर समाजाच्या वस्त्रांच्या गरजा पूर्ण करणाऱ्या साळी समाजाने या गौरवशाली परंपरेचा वारसा आजवर जपला आहे.
जन्मोत्सवाला विशेष धार्मिक महत्त्व
भगवान श्री जिव्हेश्वर महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त समाजबांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. विविध ठिकाणी पूजाविधी, अभिषेक, आरती, धार्मिक कार्यक्रम, मिरवणूक, प्रबोधनपर उपक्रम तसेच सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करून आराध्यदैवताला अभिवादन केले जाते.
हा जन्मोत्सव केवळ धार्मिक उत्सव नसून आपल्या पूर्वजांनी दिलेल्या कष्ट, कौशल्य, प्रामाणिकपणा आणि सेवाभावाच्या परंपरेचे स्मरण करण्याचा पवित्र दिवस आहे.
कष्ट, कौशल्य आणि सेवाभावाचा संदेश
भगवान श्री जिव्हेश्वर महाराजांशी जोडलेली वस्त्रनिर्मितीची परंपरा समाजाला कष्टाला प्रतिष्ठा आणि कौशल्याला सन्मान देण्याचा संदेश देते. हाताने कष्ट करून निर्माण केलेल्या वस्त्रातून मानवाची गरज पूर्ण करण्याचे कार्य साळी समाजाने केले आहे.
भगवान जिव्हेश्वर महाराजांच्या परंपरेचा खरा वारसा म्हणजे प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडणे, ज्ञानाचा सन्मान करणे, गुरुजन व माता-पित्यांचा आदर करणे, समाजबांधवांना सहकार्य करणे आणि मानवतेची सेवा करणे होय.
आधुनिक पिढीने परंपरेचा गौरवशाली वारसा जपावा
आज वस्त्रनिर्मितीच्या क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. हातमाग आणि पारंपरिक विणकामाच्या पद्धतींमध्येही काळानुरूप बदल झाले आहेत. मात्र, या कलेमागील इतिहास, परंपरा आणि संस्कृतीचा वारसा विसरता कामा नये.
भगवान श्री जिव्हेश्वर महाराजांचा जन्मोत्सव हा नव्या पिढीला आपल्या समाजाच्या गौरवशाली इतिहासाची आणि परंपरेची ओळख करून देण्याची महत्त्वपूर्ण संधी आहे. आपल्या आद्य पुरुषाने मानवाची लज्जा झाकण्यासाठी दिलेल्या वस्त्रकलेच्या परंपरेचा अभिमान बाळगून हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे ही प्रत्येक समाजबांधवाची जबाबदारी आहे.
मानवतेचा संदेश देणारे आराध्यदैवत
भगवान श्री जिव्हेश्वर महाराजांच्या जन्मकथेत मानवकल्याणाचा व्यापक विचार दडलेला आहे. मानवाची लज्जा झाकण्यासाठी वस्त्राची निर्मिती करण्याची संकल्पना ही मुळात मानवाच्या सन्मानाशी जोडलेली आहे. त्यामुळे त्यांच्या स्मरणातून समाजात प्रेम, बंधुभाव, समानता, परस्पर सहकार्य आणि मानवतेची भावना अधिक दृढ करण्याचा संदेश मिळतो.
भगवान श्री जिव्हेश्वर महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त त्यांच्या चरणी नतमस्तक होताना केवळ पूजा-अर्चना न करता त्यांच्या परंपरेतील कष्ट, कौशल्य, सेवा आणि मानवकल्याणाचा विचार आचरणात आणणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
मंगळवार, दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी साजरा होणारा भगवान श्री जिव्हेश्वर महाराजांचा जन्मोत्सव हा साळी समाजाच्या गौरवशाली परंपरेचा आणि मानवसेवेसाठी निर्माण झालेल्या वस्त्रकलेचा स्मृतिदिन ठरत आहे. भगवान शंकरांच्या जिव्हेतून निर्माण झालेले आद्य पुरुष भगवान श्री जिव्हेश्वर महाराज यांच्या विचारांचा वारसा जपत समाजात एकोपा, बंधुभाव, कष्टाची प्रतिष्ठा आणि मानवतेची भावना वृद्धिंगत करण्याचा संकल्प या पवित्र दिनी करूया.
|| भगवान श्री जिव्हेश्वर महाराज की जय ||
ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर अमळनेर शहरात पोलिसांचा भव्य रूट मार्च संवेदनशील भागांत पोलिसांचे शक्तिप्रदर्शन; ११ अधिकारी, १२५ अंमलदारांसह दंगा नियंत्रण पथक व QRT तैनात
अमळनेर | प्रतिनिधी
आगामी ईद-ए-मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर अमळनेर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अमळनेर पोलिसांकडून आज दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.०० ते ११.२० वाजेच्या दरम्यान शहरातील संवेदनशील भागांत भव्य रूट मार्च काढण्यात आला. या रूट मार्चमुळे शहरात पोलिसांची दक्षता आणि सुरक्षा व्यवस्थेचे प्रभावी दर्शन घडले.
हा रूट मार्च मा. श्री. श्रीकांत धिवरे सो., पोलीस अधिक्षक, जळगाव, मा. श्री. अशोक नखाते सो., अपर पोलीस अधिक्षक, चाळीसगाव परिमंडळ तसेच मा. श्री. विनायक कोते सो., उपविभागीय पोलीस अमळनेर भाग, अमळनेर यांच्या उपस्थितीत घेण्यात आला.
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पाच कंदील चौक, दगडी दरवाजा, सराफ बाजार, पानखिडकी, वाडी चौक, कसाली डी.पी., आखाडा मकान, झामी चौक, पवन चौक, तिरंगा चौक आणि गांधलीपुरा चौकी आदी संवेदनशील भागांतून हा रूट मार्च काढण्यात आला.
रूट मार्चसाठी अमळनेर पोलीस स्टेशनचे ०६ अधिकारी व ४८ अंमलदार, मारवड पोलीस स्टेशनचे ०२ अधिकारी व १५ अंमलदार, एरंडोल पोलीस स्टेशनचे ०१ अधिकारी व १० अंमलदार, धरणगाव पोलीस स्टेशनचे ०१ अधिकारी व ०३ अंमलदार, चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे ०३ अंमलदार, चोपडा शहर पोलीस स्टेशनचे ०३ अंमलदार, तसेच पोलीस मुख्यालयाकडील ०३ दंगा नियंत्रण पथके आणि ०१ QRT पथक सहभागी झाले होते.
अशाप्रकारे एकूण ११ अधिकारी व १२५ अंमलदार रूट मार्चमध्ये सहभागी झाले. यासोबतच पोलीस मुख्यालय, जळगावकडील बँड पथक देखील उपस्थित होते.
ईद-ए-मिलाद सण शांततेत, उत्साहात आणि सलोख्याच्या वातावरणात पार पडावा, यासाठी पोलिस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. शहरातील संवेदनशील भागांतून काढण्यात आलेल्या या रूट मार्चमुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचा स्पष्ट संदेश नागरिकांना देण्यात आला.
रूट मार्चदरम्यान पोलिसांचा शिस्तबद्ध ताफा पाहून नागरिकांचेही लक्ष वेधले गेले. सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता, सामाजिक सलोखा आणि बंधुभाव कायम राखण्यासाठी नागरिकांनीही प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.


श्री मंगळग्रह मंदिरात भक्तीमय वातावरणात रुद्र महाभिषेक श्रावणानिमित्त आयोजन; उपनगराध्यक्ष प्रशांत निकम सपत्नीक होते पूजेचे विशेष मानकरी
अमळनेर : श्रावण पर्वानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिरात आज सोमवार, दि. 24 ऑगस्ट रोजी भक्तीमय वातावरणात रुद्र महाभिषेक झाला. शहराचे उपनगराध्यक्ष प्रशांत निकम व सौ. सोनालीताई निकम हे दाम्पत्य रुद्र महाभिषेक पूजेचे विशेष मानकरी होते. त्यांनी मंदिरातील श्री मंगळेश्वर महादेवांच्या पिंडीवर विधिवत रुद्र महाभिषेकासह पूजा-अर्चना व बिल्वार्चना केली. भगवान महादेवांच्या उपासनेसाठी विशेष पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावणातील या धार्मिक विधीमुळे मंदिर परिसरात चैतन्य आणि भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी श्रावण पर्वानिमित्त रुद्र महाभिषेकाचे आयोजन करण्यात येते. यंदाही पारंपरिक धार्मिक विधींचे पालन करीत रुद्र महाभिषेक झाला. शिवपिंडीवर जल, दुग्ध आदींच्या अभिषेकासह मंत्रोच्चार करण्यात आले. यावेळी भाविकांनी भगवान महादेवांचे दर्शन घेत पूजा-अर्चा केली.
हिंदू धर्मातील धार्मिक परंपरेत श्रावण पर्वाला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात भगवान महादेवांची उपासना, रुद्र महाभिषेक, महामृत्युंजय मंत्रजप आणि शिवनामस्मरण करण्याची प्रथा आहे. ‘रुद्र’ हे भगवान महादेवांचे तेजस्वी व उग्र स्वरूप मानले जाते. रुद्र महाभिषेकाच्या माध्यमातून शिवतत्त्वाचे स्मरण, अंतःकरणाची शुद्धी आणि आध्यात्मिक समाधान प्राप्त होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
रुद्र महाभिषेकानंतर झालेल्या महाआरतीने सोहळ्याची सांगता झाली. याप्रसंगी झालेले घंटानाद, शंखनाद आणि मंत्रोच्चारांनी मंदिर परिसर दुमदुमला. उपस्थित भाविकांनी ‘हर हर महादेव’चा जयघोष करीत आरतीत सहभाग नोफ्लदविला. महाआरतीवेळी संपूर्ण परिसरात भक्तीमय आणि प्रसन्न वातावरण अनुभवायला मिळाले. मंदिराचे पुरोहित शुभम वैष्णव व परशुराम शर्मा, गणेश जोशी यांनी रुद्र महाभिषेकाचे पौरोहित्य केले. त्यांना ढोलकीवर चंद्रकांत जोशी यांच्यासह उमेश पाठक यांनी सहकार्य केले. या धार्मिक सोहळ्यावेळी मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर यांच्यासह मंगल सेवेकरी, भाविक व मंदिरातील सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री मंगळग्रह मंदिरात आज श्री सत्यनारायण महापूजा
अमळनेर : श्रावण पर्वानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिरात मंगळवार, दि. 25 ऑगस्ट रोजी श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे. महापूजेचे विशेष मानकरी नगरसेवक श्रीराम चौधरी व त्यांच्या धर्मपत्नी सौ. सुरेखाताई चौधरी या दाम्पत्याच्या हस्ते सकाळी साडेनऊच्या सुमारास या महापूजेची मंत्रोपचारांसह विधिवत सुरूवात होईल. श्रावण पर्वातील भगवान विष्णूंच्या सत्यनारायण स्वरूपाची महापूजा करणे अतिशय पवित्र व पुण्यफल प्राप्तीचे मानले जाते. या काळात वातावरण पूर्णपणे सात्त्विक असते. त्यामुळे या पवित्र महापूजेवेळी शहरासह परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनासह तीर्थप्रसादासाठी सकाळी 9 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत यावे, असे आवाहन मंगळग्रह सेवा संस्थेच्या विश्वस्त मंडळातर्फे करण्यात आले आहे.



