तालुका विज्ञान मेळावा उत्साहात; मयुरी महाजन प्रथम, मोहक साळुंखे द्वितीय तर सोहम भोसले तृतीय
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 1 day ago
डी. आर. कन्या शाळेच्या मयुरी महाजन हिचा तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्यात प्रथम क्रमांक
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 1 day ago
सरस्वती शिशुवाटीका येथे ८० वा स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी साजरा
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 1 day ago
हॉटेल पायलच्या गोडाऊनला आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 2 days ago
विश्व हिंदू परिषद जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी डॉ. संजय शाह; सहसंयोजकपदी मितेश कामदार
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 2 days ago
Top 10 News
तालुका विज्ञान मेळावा उत्साहात; मयुरी महाजन प्रथम, मोहक साळुंखे द्वितीय तर सोहम भोसले तृतीय
डी. आर. कन्या शाळेच्या मयुरी महाजन हिचा तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्यात प्रथम क्रमांक
सरस्वती शिशुवाटीका येथे ८० वा स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी साजरा
हॉटेल पायलच्या गोडाऊनला आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला
विश्व हिंदू परिषद जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी डॉ. संजय शाह; सहसंयोजकपदी मितेश कामदार
महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
पत्रकार, विक्की जाधव यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अमळनेर तालुका उपअध्यक्षपदी नियुक्ती
अमळनेर : पत्रकारितेच्या माध्यमातून जनसामान्यांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडणारे पत्रकार विक्की जाधव यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई विभागाच्या अमळनेर तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा पत्रकार संवाद यात्रेचे शिल्पकार वसंतराव मुंडे, कार्याध्यक्ष प्रविण सपकाळे यांच्या सूचनेनुसार आणि तालुकाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली. पत्रकारांच्या हितासाठी काम करण्याची नवी जबाबदारी जाधव यांच्या खांद्यावर सोपविण्यात आल्याने पत्रकार वर्तुळातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
स्थानिक प्रश्नांवर निर्भीड भूमिका, डिजिटल आणि प्रिंट च्या माध्यमातून प्रभावी मांडणी आणि जनहिताच्या विषयांचा सातत्याने पाठपुरावा ही पत्रकार विक्की जाधव यांच्या कार्याची ठळक वैशिष्ट्ये मानली जातात.* तालुक्यातील पत्रकारांच्या विविध अडचणी, हक्क आणि प्रश्नांना संघटनात्मक व्यासपीठ मिळवून देण्यासोबतच पत्रकारांमध्ये समन्वय वाढविणे, संघटनेचा विस्तार करणे आणि पत्रकारिता अधिक सक्षम करण्यासाठी प्रभावीपणे कार्य करण्याची जबाबदारी त्यांच्यावर राहणार आहे.
या नियुक्तीचे पत्रकारिता, सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातून स्वागत करण्यात येत आहे. यावेळी नव्या जबाबदारीबाबत पत्रकार विक्की जाधव यांनी संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांच्या हितासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांच्या नियुक्तीमुळे अमळनेर तालुक्यातील पत्रकारांना एकत्रित व्यासपीठ मिळण्यासह पत्रकारांच्या प्रश्नांना अधिक संघटित आणि प्रभावी आवाज मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


डॉ. समाधान मैराळे यांची राज्य पत्रकार संघाच्या खान्देश विभागीय अध्यक्षपदी निवड जळगाव, धुळे व नंदुरबारमधील पत्रकार संघटन बळकट करण्यावर भर
अमळनेर : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईच्या खान्देश विभागीय अध्यक्षपदी डॉ. समाधान एकनाथ मैराळे यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी ही नियुक्ती जाहीर केली.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष निलेश सोमाणी, प्रदेश संघटक संजय भोकरे, प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे आणि संघटन सरचिटणीस किशोर रायसाकडा यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मैराळे यांच्यावर खान्देश विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
खान्देश विभागात जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यांचा समावेश होतो. या तिन्ही जिल्ह्यांतील पत्रकारांना संघटित करून त्यांच्या व्यावसायिक, सामाजिक आणि संघटनात्मक प्रश्नांना प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे आगामी काळातील प्रमुख उद्दिष्ट राहणार आहे.
पत्कारितेच्या बदलत्या स्वरूपाच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक पत्रकारितेसोबतच डिजिटल मीडिया, सोशल मीडिया, मोबाईल पत्रकारिता, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), माहितीची पडताळणी, फेक न्यूज आणि पत्रकारितेतील आधुनिक तंत्रज्ञान या विषयांवर प्रशिक्षण उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. नवोदित पत्रकारांना मार्गदर्शन तसेच कार्यरत पत्रकारांसाठी विविध कार्यशाळा घेण्यावरही भर दिला जाणार आहे.
पत्रकारांच्या स्थानिक पातळीवरील अडचणी, शासकीय यंत्रणांशी समन्वय, पत्रकारांच्या व्यावसायिक कौशल्यविकासाच्या संधी आणि पत्रकारिता क्षेत्रातील बदल यावर विभागीय पातळीवर सातत्याने संवाद साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
“खान्देशातील पत्रकारांना एकत्रित करून पत्रकारितेची गुणवत्ता, विश्वासार्हता आणि व्यावसायिकता वाढविण्यासाठी काम करण्याचा प्रयत्न राहील. संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांच्या प्रश्नांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यास प्राधान्य दिले जाईल,” असे डॉ. समाधान मैराळे यांनी सांगितले.
डॉ. मैराळे यांच्या निवडीमुळे खान्देश विभागातील पत्रकार संघटनेच्या कार्याला अधिक व्यापक स्वरूप मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत असून, आगामी काळात विभागातील विविध जिल्हे व तालुक्यांमध्ये संघटनात्मक उपक्रम, पत्रकार संवाद आणि प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याच्या दृष्टीने नियोजन केले जाणार आहे.


आपत्ती व्यवस्थापनवर समाजकार्य महाविद्यालयात विषयी दोन दिवसाची कार्यशाळा संपन्न अनिरुध्दाज अकॅडमी ऑफ डिसास्टर मॅनेजमेंट मुंबई कडून आयोजन
अमळनेर – दिनांक 17 व 18 ऑगस्ट 2026 रोजी श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटी अमळनेर संचलित पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथे आपत्ती व्यवस्थापन या विषयास अनुसरून कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
समाजकार्याचा प्रशिक्षण
घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपत्ती व्यवस्थापन महत्त्व याविषयी मुंबई येथील अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट या संस्थेकडून कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
सदर कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानी संस्थेच्या संचालिका सौ अनुरुपा अभिजीत भांडारकर यांनी भूषविले. विभाग प्रमुख डॉ. जगदीश सोनवणे, कार्यशाळेसाठी साधन व्यक्ती आशिष वाणी, वसंत पाटील हे विचार मंचावर उपस्थित होते.
कार्यशाळेच्या सुरुवातीला रत्ना खैरनार व तेजस्विनी पाटील यांनी पाहुण्यांचे स्वागत स्वागत गीताने केले.
प्रथम सत्राचे मार्गदर्शक आशिष वाणी यांनी नैसर्गिक आपत्ती, मानवनिर्मित आपत्ती, याविषयी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. आपत्ती व्यवस्थापन मूलभूत बचाव तंत्र, आग आणि प्रतिबंध, प्रतिसाद, प्रथमोपचार, यावर सखोल मार्गदर्शन केले. आपत्कालीन व्यवस्थापन चक्र समजून सांगितले की, सज्जता, प्रतिबंध, प्रतिसाद, विमोचन , विकास व पुनरुत्थान, आपत्ती व्यवस्थापन आराखड्याची आवश्यकता महत्त्वाची आहे. तसेच आपत्तीचे प्रकार नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीला कसे सामोरे जावं याविषयी देखील त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.
आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिक पण केले गेले.
सदर सत्राच्या सत्र समन्वयक म्हणून प्रा डॉ अस्मिता सरवैया यांनी जबाबदारी सांभाळली. दुपारच्या सत्रात डॉ. धनश्री देवरे यांनी सखोल मार्गदर्शन केले. सदर सत्राच्या सत्र समन्वयक प्रा डॉ अनिता खेडकर यांनी जबाबदारी सांभाळली. डॉ धनश्री देवरे यांनी सांगितले की, अचानक कुटुंबातील किंवा परिसरातील एखाद्या व्यक्तींवर हृदयविकाराचा झटका आल्यास, त्याला सीपीसीआर द्वारे कसे जागृत अवस्थेत आणावे, याविषयी डॉ धनश्री देवरे यांनी प्रात्यक्षिक करून दाखविले.
सदर कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी एस पाटील यांच्या मार्गदर्शनातून कार्यक्रमाचे समन्वयक तथा राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या कार्यक्रम अधिकारी डॉ अनिता खेडकर, डॉ विजयकुमार वाघमारे व विद्यार्थी विकास अधिकारी प्रा डॉ अस्मिता सरवैया, प्रा डी आर. ढगे, डॉ. एस आर चव्हाण. डॉ. भरत खंडागळे. ग्रंथपाल प्रा उदय महाजन, शिक्षकेतर कर्मचारी महेश शेलार, कोमल सूर्यवंशी, श्रीमती ज्योती सोनार यांनी सहकार्य केले. कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील बीएसडब्ल्यू व एम एस डब्ल्यू चे विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्विनी पाटील यांनी केले व आभार प्रदर्शन डॉ.अनिता खेडकर यांनी केले.




