ब्रेकिंग
दिवाळी सुट्टीचा सदुपयोग; तरुणांचे श्रमदानातून रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम

 

प्रगणे डांगरी ता अमळनेर : दिवाळीची सुट्टी मौजमजा आणि मनोरंजनात घालविण्याऐवजी सामाजिक कार्यासाठी उपयोगात आणत प्रगणे डांगरी येथील तरुणांनी स्तुत्य उपक्रम राबविला. प्रगणे डांगरी ते मारवड या रस्त्याची झालेली दुरवस्था लक्षात घेऊन गावातील तरुणांनी एकत्र येत श्रमदानातून रस्त्यावरील मोठमोठे खड्डे बुजविले. तरुणांच्या या पुढाकाराचे परिसरातून कौतुक होत आहे.

 

प्रगणे डांगरी ते मारवड या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः रुग्ण, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि नियमित प्रवास करणाऱ्या ग्रामस्थांना या खराब रस्त्याचा त्रास सहन करावा लागत होता. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघाताचा धोकाही निर्माण झाला होता.

 

ही समस्या लक्षात घेऊन दिवाळीच्या सुट्टीनिमित्त गावी आलेल्या तरुणांसह स्थानिक युवकांनी पुढाकार घेतला. शासकीय यंत्रणेची प्रतीक्षा न करता एकत्र येत श्रमदानातून खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले. स्वतः वेळ देऊन आणि सामूहिक प्रयत्नांतून तरुणांनी रस्त्याची सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या उपक्रमामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.

 

या श्रमदान उपक्रमात रणधीर पाटील, वीरभूषण पाटील, हर्षल पाटील, संदीप पाटील, संजय पाटील, दिनेश पाटील, हिलाल कोळी, लक्ष्मण पाटील, सचिन कोळी, सुनील वाडीले, निलेश पाटील, हंसराज पाटील, समाधान पाटील, सागर भोई, स्वप्निल कोळी, गोपाल पाटील, गजानन पाटील, दुर्गेश पाटील (राज), रोहित पाटील, राज वाघ, विशाल वाघ, जयेश कोळी, तुषार (ऋषि) पाटील, कल्पेश पाटील, हितेश पाटील, सौरव पाटील (ओम), यशोदीप पाटील (यश), आदित्य पाटील, गौरव (गोलू) कोळी, सार्थक पाटील, शिवा कोळी आणि धिरज कोळी आदी तरुणांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

 

दिवाळीच्या सुट्टीत तरुणांनी दाखविलेली एकजूट आणि सामाजिक जाणिवेचे सर्वत्र कौतुक होत आहे. गावाच्या समस्या केवळ प्रशासनापुढे मांडण्यापुरत्या मर्यादित न ठेवता, शक्य तेथे स्वतः पुढाकार घेऊन त्यावर उपाययोजना करता येतात, हा सकारात्मक संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *