ब्रेकिंग
राणी लक्ष्मीबाई चौकात आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने आग आटोक्यात नगरसेवक पंकज चौधरी यांच्या सूचनेनंतर अग्निशमन दलाची तातडीने धाव; मोठा अनर्थ टळला

 

अमळनेर : शहरातील राणी लक्ष्मीबाई चौकातील जुनी साठे बिल्डिंग येथे आज सायंकाळी ७ वाजून ३७ मिनिटांनी आग लागल्याची घटना घडली. याबाबत नगरसेवक पंकज चौधरी यांनी अग्निशमन दलाला माहिती दिली.

माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्परतेने कार्यवाही करत आग पूर्णपणे विझवली. अग्निशमन दलाच्या वेळेवर केलेल्या कारवाईमुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले.

या मोहिमेत अग्निशमन दलाचे कर्मचारी दिनेश बिऱ्हाडे, फारुक शेख, जफर पठाण, सत्येन संदानशिव आणि विजय भोई यांनी सहभाग घेतला. त्यांच्या तत्परतेमुळे संभाव्य धोका टाळण्यास मदत झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *