ब्रेकिंग
जय योगेश्वर विद्यालयाचा दहावीच्या निकालात झंझावाती यश; ९८.६० टक्के निकालाने उज्वल परंपरा कायम!  जयेश कोळी प्रथम, दीपक पारधी द्वितीय तर नैतिक पाटील तृतीय

 

प्रतिनिधी | अमळनेर

अमळनेर येथील *जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने* एस.एस.सी. बोर्ड परीक्षा मार्च–२०२६ मध्ये दैदिप्यमान यश संपादन करत *९८.६० टक्के निकालाची भव्य नोंद* केली आहे. विद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा यंदाही कायम राहिली असून विद्यार्थी, शिक्षक व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यावर्षी इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी विद्यालयातील *एकूण ९४ विद्यार्थी प्रविष्ट* झाले होते. त्यापैकी बहुसंख्य विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवत विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले.

या परीक्षेत *जयेश दत्तू कोळी* याने *९४ टक्के गुण* मिळवत विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. *दीपक सुनील पारधी* याने *९३ टक्के गुणांसह द्वितीय* क्रमांक मिळविला, तर *नैतिक केशवराव पाटील* याने *९०.४० टक्के गुणांसह तृतीय* क्रमांक संपादन करून यशाची त्रिसूत्री पूर्ण केली.

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष *नानासाहेब डी. डी. पाटील*, उपाध्यक्ष तथा प्राचार्य *रावसाहेब के. डी. पाटील*, सचिव *दादासो. राधेश्याम पाटील*, खजिनदार *दादासो. शैलेंद्र दत्तात्रेय पाटील*, संचालिका *प्रा. डॉ. नयना कैलास पाटील*, संचालक *बापूसो. नंदकुमार डी. पाटील* तसेच सर्व संचालक मंडळाने यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक करत या यशामागील पालकांच्या सहकार्याचाही गौरव केला. विद्यालयाच्या या नेत्रदीपक निकालामुळे अमळनेर परिसरात संस्थेचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

test
casino utan svensk licens