महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात अमळनेरमध्ये १७ सप्टेंबरपासून उपोषणाचा एल्गार!
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 23 hours ago
जागरूक नागरिक, सुरक्षित डिजिटल भारत! जळगावात सायबर अवेअरनेस इम्पॅक्ट
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 2 days ago
सायबर सुरक्षेचा संकल्प; सारा मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये विशेष जनजागृती
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 2 days ago
Top 10 News
महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात अमळनेरमध्ये १७ सप्टेंबरपासून उपोषणाचा एल्गार!
बसस्थानकात सायबर सुरक्षिततेबाबत जनजागृती
जागरूक नागरिक, सुरक्षित डिजिटल भारत! जळगावात सायबर अवेअरनेस इम्पॅक्ट
सायबर सुरक्षेचा संकल्प; सारा मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये विशेष जनजागृती
महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
मातीतून आकारला बाप्पा, अमळनेरकर विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश – रोटरी क्लब अमळनेरचा स्तुत्य उपक्रम*
*अमळनेर, दि. १२ सप्टेंबर २०२६ :* रोटरी क्लब अमळनेर आणि सी. आर. पाटील इंटरनॅशनल स्कूल, तांबेपुरा, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. १२ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता शाळेच्या परिसरात पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे महत्त्व समजावून सांगतानाच त्यांच्या कलागुणांना व सर्जनशीलतेला वाव देण्यात आला.
विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत शाडू मातीपासून आकर्षक गणेशमूर्ती तयार केल्या. स्वतःच्या हाताने मूर्ती तयार करण्याचा अनुभव विद्यार्थ्यांसाठी आनंददायी व प्रेरणादायी ठरला. ‘मातीची मूर्ती घडवूया, पर्यावरणाचे रक्षण करूया’ हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे होणारे जलप्रदूषण टाळण्यासाठी शाडू मातीच्या मूर्तींचा वापर करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
या सुंदर व विधायक उपक्रमासाठी रोटे. महेश पाटील (अध्यक्ष), रोटे. प्रशांत निकम (सचिव), रोटे. सुबोध पाटील (प्रकल्प प्रमुख) आणि रोटे. अजय रोडगे यांनी विशेष मार्गदर्शन केले. तसेच शाळेचे शिक्षक, विद्यार्थी आणि रोटरी क्लबचे सदस्य रोटे. किरण कुंभार, रोटे. मनोज पाटील यांनी उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले.
*अशी बातमी मकसूद बोहरी कळवितात.
महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात अमळनेरमध्ये १७ सप्टेंबरपासून उपोषणाचा एल्गार!
अमळनेर (प्रतिनिधी):
शहर व परिसरात महावितरण कंपनीकडून बसवण्यात आलेल्या नवीन वीज मीटरनंतर येणाऱ्या प्रचंड आणि फुगवलेल्या अवाजवी बिलांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. महावितरणच्या या मनमानी कारभाराची चौकशी करून ग्राहकांना दिलासा द्यावा, अन्यथा १७ सप्टेंबर २०२६ पासून उपविभागीय अधिकारी (SDO) कार्यालयाच्या आवारात तीव्र उपोषण छेडण्याचा कडक इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे.

हे आंदोलन मा. आमदार शिरीषदादा चौधरी तसेच शिवसेना तालुका प्रमुख तथा नगरसेवक गुलाब बापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवासेना उपजिल्हा प्रमुख प्रविण पुरुषोत्तम पाटील यांच्या नेतृत्वात पुकारण्यात आले आहे.
🛑अवाजवी बिलांचा फटका आणि मुख्य मागण्या:
२१ हजारांचे फुगवलेले बिल: नवीन मीटर बसवल्यानंतर प्रत्यक्षात वीज वापर अतिशय कमी असतानाही हजारो रुपयांची बिलांची आकारणी केली जात आहे. अगदी एका पंख्याचा वापर असणाऱ्या दुकानात तब्बल २१,००० रुपयांचे वीजबिल आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
सोलर बिलिंगमधील गोंधळ: सौरऊर्जा (Solar) प्रकल्प बसवलेल्या ग्राहकांच्या मीटर रीडिंग तसेच आयात-निर्यात (Import/Export) प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर त्रुटी असून, त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे.
🛑मीटर सक्तीस मज्जाव: नागरिकांवर नवीन वीज मीटर बसवण्यासाठी केली जाणारी अवाजवी सक्ती तात्काळ थांबवावी.
आंदोलनात सहभागी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते:
प्रविण पुरुषोत्तम पाटील (उपजिल्हा प्रमुख,युवासेना) पंकज संतोष शेटे (विधानसभा क्षेत्र प्रमुख) राहुल कंजर (युवासेना तालुका प्रमुख),अमन जाकीर खाटिक (युवासेना उपशहर प्रमुख),मोहित नितिन पाटील (युवासेना उपशहर संघटक),पंकज अरुण चौधरी (युवासेना शहर संघटक)
जयेश रविंद्र चव्हाण (युवासेना उप-तालुका प्रमुख)
भूषण गोपिचंद कोळी (युवासेना),गणेश रमेश जाधव (सरपंच),खंडू सोमाजी कोळी (सरपंच / उपतालुका प्रमुख),विजय महाजन ,जयेश ठाकरे , अथर्व डेरे, किरण बडगुजर, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश अंधा पाटील (युवासेना गणप्रमुख),दिनेश ज्ञानेश्वर पाटील (शिवसैनिक),राहुल साहेबराव पाटील (उपतालुका प्रमुख).निवेदन सादर करताना उपस्थित होते
निवेदनाची गंभीर दखल घेत उपविभागीय अधिकाऱ्यांनी महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यांना तात्काळ चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
बसस्थानकात सायबर सुरक्षिततेबाबत जनजागृती
जळगाव | प्रतिनिधी
डिजिटल व्यवहारांचा वाढता वापर आणि त्यासोबत वाढणाऱ्या सायबर फसवणुकीच्या घटनांबाबत नागरिकांना सतर्क करण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (KBCNMU), जळगाव आणि Quick Heal Foundation यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव बसस्थानकात सायबर सिक्युरिटी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमात बस वाहकांना विविध सायबर फ्रॉडबाबत माहिती देण्यात आली. फसवणुकीपासून वाचण्यासाठी आवश्यक खबरदारी, संशयास्पद कॉल्स आणि लिंक ओळखण्याचे मार्ग तसेच सायबर गुन्ह्याची घटना घडल्यास कोणती तातडीची पावले उचलावीत, याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान बस वाहकांना डिजिटल व्यवहार सुरक्षितपणे करण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. तसेच OTP, PIN, पासवर्ड आणि बँक खात्याशी संबंधित गोपनीय माहिती कोणासोबतही शेअर करू नये, याबाबत जागरूक करण्यात आले.
या उपक्रमात स्नेहल पाटील आणि वैष्णवी पाटील यांनी सक्रिय सहभाग घेत जनजागृती केली. बस वाहकांनीही या उपक्रमाला चांगला प्रतिसाद देत सायबर सुरक्षेबाबत माहिती जाणून घेतली. या कार्यक्रमासाठी Dr. R. B. Amale Sir यांचे मार्गदर्शन लाभले.

