भाऊराव श्रीपत चव्हाण यांची सामाजिक न्याय विभागाच्या अमळनेर शहराध्यक्षपदी निवड
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 3 hours ago
सिद्धांत राहुल निकम याची सुवर्णझेप! 🌹 एम. फार्मसी परीक्षेत विद्यापीठात प्रथम; सुवर्णपदकाने सन्मानित
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 1 day ago
🌱 अमळनेर मुस्लिम कब्रस्तानात अल खिदमत ट्रस्टतर्फे २५ वृक्षांची लागवड
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 2 days ago
श्रीमंत शिवाजीराव होळकर महाराज अमळनेर ला येणार.
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 2 days ago
राखी पौर्णिमेनिमित्त कष्टकरी सफाई कामगारांचा सन्मान
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 2 days ago
Top 10 News
महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
⭕ एसटीच्या NCMC कार्डचा ‘रिचार्ज’ प्रश्न ऐरणीवर; लाखो ज्येष्ठ व महिलांना गैरसोयीचा फटका कार्डसाठी ₹२०० भरले, आता रिचार्जसाठीही फेऱ्या; ऑनलाइन रिचार्जची सुविधा देण्याची मागणी….
अमळनेर:- महाराष्ट्र शासनाने एसटी प्रवासात महिलांना निम्म्या दरात, तर ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या दरात प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी NCMC कार्डची व्यवस्था केली आहे. मात्र, हे कार्ड वापरणाऱ्या नागरिकांना रिचार्जच्या किचकट प्रक्रियेमुळे मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याची तक्रार पुढे आली आहे.
NCMC कार्ड मिळविण्यासाठी नागरिकांना ₹२०० शुल्क भरावे लागते. तसेच एसटी प्रवासाचे तिकीट काढण्यासाठी कार्डमध्ये किमान ₹१०० शिल्लक असणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे कार्डचा वापर सुरू ठेवण्यासाठी नागरिकांना वेळोवेळी रिचार्ज करणे अपरिहार्य ठरते.
मात्र, विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग आणि ग्रामीण भागातील नागरिकांसाठी रिचार्जची प्रक्रिया त्रासदायक ठरत आहे. प्रत्येक वेळी कार्ड रिचार्ज करण्यासाठी एसटी बसस्थानकावर जावे लागत असल्याने वयोवृद्ध नागरिकांची गैरसोय होत आहे. अनेक ग्रामीण भागातील नागरिकांना केवळ रिचार्जसाठी बसस्थानक गाठणे वेळखाऊ आणि खर्चिक ठरत आहे.
शासनाने नागरिकांना सवलतीचा प्रवास उपलब्ध करून दिला असला, तरी त्या सुविधेचा लाभ घेण्यासाठीच वारंवार बसस्थानकाच्या फेऱ्या माराव्या लागत असतील, तर ही सुविधा खऱ्या अर्थाने ‘सुलभ’ कशी म्हणायची?, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
NCMC कार्डसाठी UPI, नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग किंवा अन्य ऑनलाइन माध्यमातून थेट रिचार्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्यास नागरिकांची मोठी गैरसोय दूर होऊ शकते. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना याचा मोठा फायदा होईल.
एसटी प्रशासनाने या समस्येची तातडीने दखल घेऊन NCMC कार्डसाठी ऑनलाइन रिचार्जची सुविधा सुरू करावी, अशी मागणी प्राध्यापक प्रकाश धर्माधिकारी यांनी केली आहे.


भाऊराव श्रीपत चव्हाण यांची सामाजिक न्याय विभागाच्या अमळनेर शहराध्यक्षपदी निवड
अमळनेर प्रतिनिधी :
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या अमळनेर शहराध्यक्षपदी भाऊराव श्रीपत चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या संघटनात्मक कार्यातील योगदानाची दखल घेत त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली.
दिनांक 31 ऑगस्ट 2026 रोजी झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पंडितजी कांबळे (मुंबई), सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष अरुण धर्माळे, प्रदेश उपाध्यक्ष प्रतिभाताई शिरसाठ, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश बहारे, जळगाव जिल्हाध्यक्ष सुरेश पगारे तसेच जिल्हा सरचिटणीस चंद्रमणी सांगवीकर यांच्या उपस्थितीत ही नियुक्ती करण्यात आली.
यावेळी मान्यवरांनी भाऊराव चव्हाण यांचे अभिनंदन करून पुढील सामाजिक व संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून समाजातील वंचित, दुर्बल व उपेक्षित घटकांच्या प्रश्नांसाठी प्रभावीपणे कार्य करत पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
चव्हाण यांच्या निवडीबद्दल अमळनेर तालुकाध्यक्ष डी. एम. पाटील तसेच पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार डॉ. बी.एस.पाटील यांनीही अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. त्यांच्या नियुक्तीचे पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात येत आहे.


प्रशांत निकम यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण! डॉ. बी. एस. पाटील यांच्या हस्ते सत्कार; केक कापून व पुस्तक भेट देत पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी दिल्या मनःपूर्वक शुभेच्छा
अमळनेर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट)चे अमळनेर शहराध्यक्ष तथा अमळनेर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांच्या वाढदिवसानिमित्त पक्षाच्या वतीने नाविन्य हॉस्पिटल येथे उत्साहपूर्ण वातावरणात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रशांत निकम यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांच्या हस्ते प्रशांत निकम यांचा शाल, पुष्पगुच्छ व पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे केक कापून वाढदिवसाचा आनंद द्विगुणित केला. पुस्तक भेट देत सामाजिक व वैचारिक बांधिलकीचा संदेश देत वाढदिवस साजरा करण्यात आला, ही या कार्यक्रमाची विशेष बाब ठरली.
दरम्यान, पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते रेहान शेख व मारुती पवार यांचाही वाढदिवस असल्याने त्यांचाही यावेळी डॉ. बी. एस. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तिघांनाही उपस्थित मान्यवरांनी पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी मार्गदर्शन करताना उपस्थित मान्यवरांनी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांची एकजूट, जनसामान्यांशी असलेला सातत्यपूर्ण संपर्क आणि सामाजिक बांधिलकी यांचे महत्त्व अधोरेखित केले. प्रशांत निकम यांच्या नेतृत्वाखाली अमळनेर शहरात पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या प्रसंगी डॉ. चंद्रकांत पाटील, तालुकाध्यक्ष डी. एम. पाटील, शहर सरचिटणीस चिंधु आप्पा वानखेडे, जाकीर शेख, संदीप सोनवणे, विवेक पाटील, जितेंद्र पाटील, खालील पठाण, नाशिक गणेश, धोंडू पाटील, श्यामकांत भावसार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला राजकीय उत्साहासोबतच आपुलकी आणि जिव्हाळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.



