ब्रेकिंग
तालुका विज्ञान मेळावा उत्साहात; मयुरी महाजन प्रथम, मोहक साळुंखे द्वितीय तर सोहम भोसले तृतीय

 

भारतीय ऊर्जा क्षेत्र २०४७ : भवितव्य (संधी) व आव्हाने’ विषयावर विद्यार्थ्यांची चुरशीची स्पर्धा

अमळनेर : समग्र शिक्षा जिल्हा परिषद गटसाधन केंद्र, पंचायत समिती अमळनेर यांच्या वतीने अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा २०२६ उत्साहात संपन्न झाला. साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात आयोजित या मेळाव्यात तालुक्यातील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. ‘भारतीय ऊर्जा क्षेत्र २०४७ : भवितव्य (संधी) व आव्हाने’ या विषयावर विद्यार्थ्यांनी आपले विचार प्रभावीपणे मांडले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री. प्रमोद पाटील होते. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सुनील पाटील सर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून साने गुरुजी कन्या हायस्कूलच्या मुख्याध्यापिका अनिता बोरसे व डी. ए. धनगर सर उपस्थित होते.

स्पर्धेत सहभागी प्रत्येक विद्यार्थ्याला आपले विचार मांडण्यासाठी सहा मिनिटांचा कालावधी देण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी ऊर्जा क्षेत्रातील भविष्यातील संधी, आव्हाने आणि भारताच्या ऊर्जा विकासाची दिशा यावर प्रभावीपणे मते मांडल्याने स्पर्धा अत्यंत चुरशीची झाली.

स्पर्धेचे परीक्षक म्हणून सौ. नंदा पाटील मॅडम व श्री. आकाश पाटील यांनी कामकाज पाहिले. या स्पर्धेत डी. आर. कन्या हायस्कूल, अमळनेरच्या मयुरी संदीप महाजन हिने प्रथम क्रमांक पटकावला. साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय, अमळनेरच्या मोहक मुकेश साळुंखे याने द्वितीय क्रमांक मिळविला, तर पीबीए इंग्लिश मीडियम स्कूलच्या सोहम अमोल भोसले याने तृतीय क्रमांक पटकावला. एस. एस. पाटील हायस्कूल, लोंढवेच्या जयेश निंबा पाटील याची उत्तेजनार्थ पारितोषिकासाठी निवड करण्यात आली.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री. प्रमोद पाटील सर होते. प्रमुख पाहुणे म्हणून अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे सचिव दादासाहेब संदीप घोरपडे, मुख्याध्यापक सुनील पाटील, मुख्याध्यापिका अनिता बोरसे व डी. ए. धनगर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी, शिक्षक व परीक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या यशाबद्दल खानदेश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष व शाळेचे शालेय समिती चेअरमन भाऊसो जितेंद्रजी जैन, मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी मॅडम, उपमुख्याध्यापक श्री. एस. आर. शिंगाणे, पर्यवेक्षक श्री. एस. पी. वाघ सर, शिक्षक प्रतिनिधी सौ. पी. पी. जोशी मॅडम, श्रीमती आर. एस. सोनवणे मॅडम, श्री. एस. एस. माळी सर, श्री. के. पी. सनेर, श्री. श्याम पवार सर, श्रीमती एस. एस. कसबे मॅडम तसेच सर्व विज्ञान व गणित शिक्षिका, सर्व शिक्षक आणि कर्मचारी बंधू-भगिनी यांनी मयुरी महाजन हिचे अभिनंदन केले.

विज्ञान मंडळाचे अध्यक्ष निरंजन पेंढारे यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. भाग्यश्री वानखेडे मॅडम यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. यशोदीप बागल यांनी केले.

तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटील, सचिव संदीप घोरपडे, मुख्याध्यापक सुनील पाटील, मुख्याध्यापिका अनिता बोरसे, गणित मंडळाचे अध्यक्ष डी. ए. धनगर, नंदा पाटील व आकाश पाटील यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी विज्ञान शिक्षक श्री. दीपक महाजन सर, सौ. वैशाली पाटील मॅडम, श्री. हर्षल पवार, सौ. भारती पाटील मॅडम, एन. डी. पाटील, सौ. एस. एस. कसबे मॅडम, सौ. डिंपल देसाई मॅडम उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, जिज्ञासा आणि संशोधनवृत्ती निर्माण करण्याच्या दृष्टीने हा विज्ञान मेळावा प्रेरणादायी ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *