ब्रेकिंग
डांगर उर्फ उदयनगरला टँकरने पाणी 

 

अमळनेर तालुक्यातील डांगर उर्फ उदयनगर हे विद्यमान खासदार सौ स्मिताताई उदय वाघ यांचे गाव. या गावाला सुमारे 25 वर्षापासून पिण्याचे पाणी टँकरने पुरवावे लागत आहे. गेल्या पंचवीस तीस वर्षापासून सौ स्मिताताई या जळगाव जिल्ह्यातील राजकारणात सक्रिय आहेत. त्यांचा राजकीय प्रवास, जळगाव जिल्हा परिषद सदस्य, जळगाव जिल्हा परिषद अध्यक्ष, विधान परिषद आमदार आणि आता खासदार पक्षाच्या जिल्हा व राज्य पातळीवर पदाधिकारी शिवाय अनेक समित्यांवर कार्यरत, उत्कृष्ट संसद पटू म्हणून पुरस्कार इत्यादी सौ स्मिता ताईंना अनेक सत्ते ची पदे मिळाली,मानसन्मान मिळाला परंतु डांगर उर्फ उदयनगरच्या ग्रामस्थांना कोणत्याही योजनेतून कायमस्वरूपी पिण्याचे पाणी मिळाले नाही. आजही डांगर उर्फ उदयनगरला टॅंकरने पाणीपुरवठा होत आहे. ही बाब योग्य नाही.सामान्य माणसाला प्रश्न पडतो की सत्ता कोणासाठी वापरली जात आहे? व कोणते प्रश्न सुटत आहेत.?

. पाण्यासाठी टँकर सुरू केल्याने शासनाचा प्रचंड खर्च वाढतो. ग्रामस्थांना पुरेसे पाणी मिळत नाही.पाण्याच्या शुद्धतेबाबत कोणतीही गॅरंटी देता येत नाही ग्रामस्थांना दूषित पाण्यामुळे आजार होतात.सरकारी दवाखाने ही व्हेंटिलेटरवर असल्याने खाजगी डॉक्टरांचा खर्च ग्रामस्थांना परवडत नाही, परंतु खर्च करावाच लागतो,प्रसंगी काहींना दैनंदिन खर्चासाठी कर्जही काढावे लागते, याचा अर्थ टँकरचे पाणी एका अर्थाने विकतच मिळते. लोकप्रतिनिधींचे जनतेच्या वेदनाशी कोणते नाते आहे.?असे म्हणता येईल?

. सौ स्मिताताई बद्दल व्यक्तिगत आकस व द्वेष नाही. यात राजकारण नाही. त्या मोठ्या आजाराशी झुंज देत आहे. तरीही काम करीत आहे. परंतु काम कोणासाठी करीत आहेत? त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भाजप अशा संघटनांमध्ये गेल्या 40 वर्षापासून क्रियाशील असताना, प्रचंड अभ्यास, अनुभव आणि सत्तेची पदे असतानाही डांगर उर्फ उदयनगरच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न का सुटला नाही? डांगरच उदयनगर झालं पण ग्रामस्थांना पाणी मिळालं नाही. 12 वर्षापासून राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता असताना सौ स्मिता ताईंना!स्वतःच्या गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न का सोडवता आला नाही? इथे स्वतःच्या गावाच्या ग्रामस्थांना पाणी देता येत नाही, तिथे शेतीला पा7णी, उद्योग,नोकरी या गोष्टी तर खूपच लांब राहिल्या. सत्ता ग्रामीण, गरीब, वंचित आणि शेतकऱ्यांसाठी वापरावी ही अपेक्षा. अशा आशयाचे पत्रक प्रा अशोक पवार, उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस( शरद पवार गट )जळगाव जिल्हा यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *