ब्रेकिंग
‘चला, गरजवंतांची दिवाळी गोड करूया’ उपक्रमाला प्रतिसाद धुळे जिल्ह्यातील लोटन पाटील व त्यांच्या मातोश्रींकडून दिवाळी फराळ सुपूर्द

 

अमळनेर (प्रतिनिधी) : गरजवंतांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, या उद्देशाने मंगळग्रह सेवा संस्थेने सुरू केलेल्या ‘चला, गरजवंतांची दिवाळी गोड करूया…’ या सामाजिक उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

धुळे जिल्ह्यातील काळखेडे येथील मूळ रहिवासी व सध्या धुळे येथे डिजिटल मार्केटिंग आणि डिझायनिंग व्यवसाय करणारे लोटन शरद पाटील (कचवे) यांनी आपल्या मातोश्री मथुराबाई पाटील यांच्यासह स्वखर्चाने दिवाळी फराळ आणून मंगळग्रह सेवा संस्थेकडे सुपूर्द केला.

संस्थेचे सचिव सुरेश बाविस्कर, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव व डी. ए. सोनवणे यांनी फराळ स्वीकारून पाटील माता-पुत्रांचा सेवाभावाबद्दल सन्मान केला.

संस्थेने दिवाळी फराळासह नवीन किंवा सुस्थितीतील कपडे, अन्नधान्य, किराणा व जीवनावश्यक वस्तू गरजूंना देण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाचे जळगाव व धुळे जिल्ह्यांतून कौतुक होत असून अनेकांनी मदतीसाठी पुढाकार घेण्याची तयारी दर्शवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *