अमळनेर तालुका प्राथमिक शिक्षक संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर! अध्यक्षपदी अशोक रघुनाथ पाटील, तर सरचिटणीसपदी विजय आनंदा पाटील यांची सर्वानुमते निवड
अमळनेर : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ (संभाजीराव गट) अमळनेर तालुका शाखेची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, अध्यक्षपदी श्री. अशोक रघुनाथ पाटील, तर सरचिटणीसपदी श्री. विजय आनंदा पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष जयवंतराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी राजू देवचंद पाटील, ग.स.चे माजी अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष विलासराव नेरकर, जिल्हा संघाचे नेते व उपाध्यक्ष वाल्मिक मराठे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाध्यक्ष विलास नेरकर यांनी नूतन कार्यकारिणीची अधिकृत घोषणा केली.
नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :
अध्यक्ष : अशोक रघुनाथ पाटील
सरचिटणीस : विजय आनंदा पाटील
कार्याध्यक्ष : राहुल भगवान सोनवणे
कोषाध्यक्ष : समाधान खैरनार
उपाध्यक्ष : योगेश्वर भाऊराव पाटील, दत्तात्रय बारकू सोनवणे, हिंमत चौधरी, ज्ञानेश्वर कुवर.
सहसचिव : हिरालाल धर्मा सैंदाणे, योगेश भदाणे, प्रीतम रत्नपारखी.
ज्येष्ठ मार्गदर्शक : जगदीश भटू पाटील, किशोर देसले, रियाज शेख, रवींद्र प्रभाकर पाटील.
तंत्रस्नेही मार्गदर्शक : सुधाकर पाटील, शंकर बोरसे, नामदेव अहिरे, संदीप सूर्यवंशी, भरत जाधव, निलेश मोतीलाल पाटील.
संघटक : विजय बिर्हाडे, सुनील देवरे, जिजाबराव पाटील, हेमंत शिंदे, विलास मोरे, प्रशांत पाटील, कमलेश मोरे, कुणाल पोतदार, सुधीर पाटील, संदीप गुलाबराव पाटील, राजेंद्र संभाजीराव पाटील, अरुण पवार.
शिक्षकांच्या प्रश्नांसाठी संघटितपणे काम करण्याचा निर्धार!
बैठकीत तालुक्यातील शिक्षकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी शिक्षक संघाची भूमिका आग्रही राहील, असा निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनांना सोबत घेऊन समन्वयाने व एकजुटीने भविष्यातील कामकाज करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
यावेळी अमळनेरचे गटविकास अधिकारी मा. एन. आर. पाटील यांनी स्वतः उपस्थित राहून नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
बैठकीस माजी सरचिटणीस मोहन ताडे, भटू आप्पा शिरसाठ, अमळनेर तालुका शिक्षक समन्वय समितीचे अध्यक्ष मधुकर चौधरी, प्राथमिक शिक्षक संघाचे (शिवाजीराव गट) अध्यक्ष संदीप वाघ, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुणाल पवार यांच्यासह विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच ज्येष्ठ केंद्रप्रमुख किरण शिसोदे, शरद सोनवणे, चंद्रकांत साळुंखे, वाल्मिक भदाणे, महेश पाटील, सचिन पाटील व ग्रेडेड मुख्याध्यापक छगन पाटील यांचीही उपस्थिती होती.
बैठकीच्या शेवटी उपस्थित मान्यवर व शिक्षकांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

