ब्रेकिंग
अमळनेरात पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन! मैदानी व लेखी परीक्षेसह आवश्यक कागदपत्रांबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन; ५ नोव्हेंबरला प्रताप महाविद्यालयात शिबिर

 

अमळनेर (प्रतिनिधी) : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या अमळनेर शहर व तालुक्यातील उमेदवारांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन गुरुवार, दि. ५ नोव्हेंबर २०२६ रोजी करण्यात आले आहे. या शिबिरात पोलीस भरती क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून उमेदवारांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले जाणार आहे.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते (चाळीसगाव) आणि अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित (जळगाव) यांच्या संकल्पनेतून या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

पोलीस भरती प्रक्रियेत यश मिळविण्यासाठी आवश्यक असलेली मैदानी परीक्षा, लेखी परीक्षा तसेच भरतीसाठी लागणारी विविध कागदपत्रे याबाबत उमेदवारांना सविस्तर माहिती दिली जाणार आहे. मैदानी परीक्षेची तयारी कशी करावी, लेखी परीक्षेचे स्वरूप व अभ्यासाचे नियोजन कसे असावे, तसेच अर्ज प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता कशी करावी, याबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

हे प्रशिक्षण शिबिर गुरुवार, दि. ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता कै. काकासाहेब शंकरराव राणे सभागृह, प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथे होणार आहे.

अमळनेर शहर व तालुक्यातील पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व इच्छुक उमेदवारांनी या शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होऊन तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *