ब्रेकिंग
डॉ. ईश्वर पाटील यांची राज्यस्तरीय ‘आयडॉल शिक्षक’ म्हणून निवड

 

पारोळा : सहजीवन शिक्षण प्रसारक मंडळ (टेहू), पारोळा संचलित राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालयातील महाराष्ट्र शासन आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त डॉ. ईश्वर एस. पाटील यांची महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या निवड प्रक्रियेत राज्यस्तरीय ‘आयडॉल शिक्षक’ म्हणून निवड झाली आहे.

डॉ. पाटील यांनी शैक्षणिक, सामाजिक, विद्यार्थी विकास, अध्यापन कौशल्य, शैक्षणिक गुणवत्ता वृद्धी, शिक्षक प्रशिक्षण तसेच विविध शासकीय शैक्षणिक योजनांच्या जनजागृतीसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची या निवडीद्वारे दखल घेण्यात आली आहे.

या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील, उपप्राचार्य डॉ. वंदना एस. पाटील, संस्थेचे अध्यक्ष वसंतराव मोरे, संचालक ॲड. रोहन मोरे, पराग मोरे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी डॉ. पाटील यांचे अभिनंदन केले. त्यांच्या या निवडीमुळे संस्थेसह महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *