ब्रेकिंग
डॉ. समाधान मैराळे यांना ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार’

 

अमळनेर : पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल अमळनेर येथील युवा पत्रकार डॉ. समाधान एकनाथ मैराळे यांना आनंदी युनिव्हर्स फाउंडेशनच्या वतीने प्रतिष्ठेचा ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला.

 

नाशिक येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ‘कोण होणार करोडपती’ फेम शरद राजपूत आणि अभिनेत्री रिया चित्ते यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.

 

पत्रकारिता, सामाजिक कार्य आणि समाजहिताच्या उपक्रमांमधील योगदानाची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. या सन्मानाबद्दल डॉ. मैराळे यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *