दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर व आदिवासींच्या न्याय्य हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना २२ विविध मागण्यांचे निवेदन; तहसीलदार डॉ. उमा ढेकळे यांच्यामार्फत सादर
अमळनेर (प्रतिनिधी) : दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी तसेच वंचित घटकांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने राज्यव्यापी निवेदन देण्यात आले. मोर्चाच्या राष्ट्रीय नेत्या प्रतिभाताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्न आणि मागण्यांसंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून २२ विषयांचे निवेदन तहसीलदार डॉ. उमा ढेकळे यांच्यामार्फत सादर करण्यात आले.
दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतमजुरांच्या अडचणी, आदिवासी बांधवांचे हक्क आणि वंचित घटकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधणे, हा या निवेदनामागील प्रमुख उद्देश आहे. संबंधित मागण्यांवर शासनाने गांभीर्याने विचार करून तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
या वेळी लोकसंघर्ष मोर्चाचे पन्नालाल मावळे, निलाबाई भिल, आनंद पवार, शरद पाटील, शंकर भिल, गणेश माळी, राजेंद्र पारधी, मधुकर चव्हाण, गणेश पारधी, संजय बारेला, जयदेव पारधी, शांताराम पारधी, हेमंत दाभाडे, भुरा पारधी, धनराज पारधी आदी उपस्थित होते.
दुष्काळग्रस्त आणि वंचित घटकांच्या प्रश्नांवर शासनाने तातडीने लक्ष देऊन त्यांच्या न्याय्य हक्कांची पूर्तता करावी, अशी मागणी लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने करण्यात आली.

