श्रीमंत शिवाजीराव होळकर महाराज अमळनेर ला येणार.
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 2 hours ago
राखी पौर्णिमेनिमित्त कष्टकरी सफाई कामगारांचा सन्मान
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 2 hours ago
डि आर कन्या शाळांमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला..
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 2 days ago
सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ. मोहन बच्छाव यांचा ‘आरोग्यरत्न’ पुरस्काराने गौरव
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 2 days ago
महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
🌱 अमळनेर मुस्लिम कब्रस्तानात अल खिदमत ट्रस्टतर्फे २५ वृक्षांची लागवड
अमळनेर : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत अल खिदमत ट्रस्ट, अमळनेर यांच्या तर्फे अमळनेर मुस्लिम कब्रस्तान परिसरात २५ वृक्षांची लागवड करण्यात आली.
या वृक्षारोपण उपक्रमास अमळनेर मुस्लिम कब्रस्तान व ईदगाह ट्रस्टचे हाजी सत्तार भाया साहब तसेच अल खिदमत ट्रस्ट अमळनेरचे सदस्य उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
विशेष म्हणजे या उपक्रमात लहान मुलांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला. मुलांच्या हातून वृक्षारोपण करून घेत त्यांना झाडांचे आपल्या जीवनातील महत्त्व, पर्यावरणाचे संरक्षण आणि भविष्यातील पिढीसाठी हिरवाई जपण्याची गरज याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
“आज लावलेले एक झाड म्हणजे उद्याच्या पिढीसाठी दिलेली जीवनाची भेट आहे,” या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. कब्रस्तान परिसर अधिक हिरवागार आणि सुंदर करण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला.



श्रीमंत शिवाजीराव होळकर महाराज अमळनेर ला येणार.
अमळनेर : राजमाता अहिल्याबाई होळकर महेश्वर (मध्य प्रदेश) संस्थांचे प्रमुख व 17 वे वंशज श्रीमंत शिवाजीराव होळकर महाराज( रिचर्ड महाराज) यांची महेश्वर येथे जाऊन भेट घेऊन चर्चा केली व त्यांना अमळनेर येथील कार्यक्रमासाठी आमंत्रित केले व सदरचे आमंत्रण त्यांनी स्वीकारले लवकरच त्यांच्या कार्यक्रमाची तारीख जाहीर करण्यात येईल. . बन्सीलाल भागवत,अध्यक्ष, उत्तर महाराष्ट्र, ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ महेश्वर येथे गेले होते त्यात प्रा अशोक पवार, डी ए पाटील, अचलबाई भागवत, एडवोकेट तिलोत्तमा पाटील, सौ. मीनाक्षी पवार,एस सी तेले, संजय पाटील, चिंधू वानखेडे, सुनंदा तेले, प्रतिभा पाटील, सीमा पाटील, प्रमिला वाघ, एडवोकेट क्रांती ठाकरे आदींचा समावेश होता.
राजमाता अहिल्याबाई होळकर घराण्याचे महेश्वर संस्थान प्रेरणादायी ठिकाण म्हणून नावारूपाला आणणाऱ्या श्रीमंत शिवाजीराव होळकरांचे शिष्टमंडळाने अभिनंदन केले याप्रसंगी (रिचर्ड होळकर )महाराजांनी राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या कर्तृत्वाविषयी माहिती सांगितली. ही भेट घडवून आणण्यासाठी राजे अमरजीत बारगळ जहांगीरदार,,तळोदा यांनी खूप मोलाची मदत केली. महेश्वर गादीचे 17 वे वंशज श्रीमंत शिवाजीराव होळकर महाराज यांची साधी राहणी व उच्च विचार विचारसरणी असल्याने खऱ्या अर्थाने देवी अहिल्याबाई होळकर यांचे ते सामाजिक,वैचारिक वारसदार आहेत याची खात्री पटली.



राखी पौर्णिमेनिमित्त कष्टकरी सफाई कामगारांचा सन्मान
अमळनेर : राखी त्या हातांना जे रोज आपल्या शहराचे रोगराई पासून रक्षण करतात.कष्टकरी सफाई कर्मचारी हे समाजाचे रक्षक आहेत. अमळनेर नगर परिषदेच्या कष्टकरी सफाई कामगारांचा सन्मान करण्यासाठी राखी पौर्णिमेच्या निमित्ताने कामगारांना राखी बांधण्याचा कार्यक्रम, संविधान जागर अभियान व युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेर तर्फे छत्रपती शिवाजी गार्डन अमळनेर येथे करण्यात आला. कार्यक्रमापूर्वी समतेवर आधारित गीते सुनीता मोरे, दिशा संदानशिव, उषा देवरे, माधुरी पाटील, योगिता पांडे, निवेदिता कापडणे कर यांनी सादर केले व कामगारांना राखी बांधली याप्रसंगी प्रा अशोक पवार यांनी कामगारांच्या कामाविषयी व त्यांच्या त्यागाविषयी मनोगत व्यक्त केले.
सफाई कामगार महिलांनी सामाजिक कार्यकर्त्यांना राखी बांधली तर सफाई कामगारांना सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांनी राखी बांधून कामगारांचा सन्मान केला. याप्रसंगी कामगारांना मिठाई वाढण्यात आली . अमळनेरच्या सांस्कृतिक इतिहासात प्रथमच अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . याप्रसंगी अमळनेर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक किरण खंडारे, हृदयनाथ मोरे, अनिल बाविस्कर, अनिल बेंडवाल, भैय्या मोरे, नितीन बिऱ्हाडे, डि ए पाटील, संजय पाटील व सफाई कामगार बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




